2024 Important Schemes : व्ही.सी.द्वारे बैठका..
कोरोनापासून व्हीसीद्वारे बैठका घेण्याचे सुरू झालेले सत्र आता चांगलेच रुळले..
Schemes : मुख्यमंत्र्यांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत अधिकारी आता व्हीसीच घेत असल्याने आणि प्रत्येक वरिष्ठ त्यांच्या सोयीने वेळा ठेवत असल्याने यात अधिकारी, कर्मचारी कुचंबणा होत आहे.
Schemes : शासनाच्या योजना हजार, अधिकारी झालेत बेजार..
लागोपाठच्या व्हीसी, प्रत्यक्ष बैठका, अहवाल अन् आढावा…..
Reported By : सचिन गोलेच्छा, लोणार जि. बुलढाणा. www.lonarnews.com
लागोपाठ लागणाऱ्या जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील व्हिडीओ कॉन्स्फरिंगच्या बैठका, स्थानिक कार्यालये आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील बैठका या सगळ्या बैठकांसाठी तयार करण्याचे अहवाल, ज्या त्या विभागाचा आढावा आणि ऑनलाईन भरावयाची माहिती यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः बेजार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक जवळ येत आहे तसे महाराष्ट्रात ‘योजनांचा पूर आणि बैठकांतून धूर’ निघत असल्याची चर्चा होत आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सरकार गतिमान पद्धतीने चालवले जात आहे. हे दाखवण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठवत या सरकारने युद्धपातळीवर योजना राबवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र तहानभूक हरपली आहे. सद्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व इतर अधिकारी, महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, महावितरण, आरोग्य विभाग यांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिवस कधी उजाडतो आणि मावळतो हे कळेनासे झाले आहे. या सगळ्यांवरचा भार मग खाली झिरपत जाऊन त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कामासाठी वेळ अपुरा पडायला सुरुवात झाली आहे. (Schemes)
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन महिना होऊन गेला. विरोधी पक्षातील नेते म्हणतात त्यानुसार निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राबवण्यात आलेल्या या योजनेत अधिकाधिक महिलांची नोंदणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांपासून सर्वांनाच कामाला लावण्यात आले. परिणामी, राज्यभरातून कोट्यवधी महिला लाभधारक बनल्या. परंतु, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वांनाच रात्रीचा दिवस करावा लागला. आपापल्या विभागाचे दैनंदिन कामकाज, सर्व बैठका, त्यातून समोर येणारे प्रश्न, त्याची निर्गत, शासनाच्या येणाऱ्या सुधारित सूचना यातच हे अधिकारी अडकून पडले आहेत. (Schemes)
अधिकाऱ्यांची कुचंबणा…..
साहेब व्ही.सी. मध्ये आहेत. बघावे तेव्हा प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष बैठक किंवा व्ही.सी. मध्येच असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे भेटायला आलेले अभ्यागतही वैतागत आहेत. कोरोनापासून व्ही.सी. द्वारे बैठका घेण्याचे सुरू झालेले सत्र आता चांगलेच रुळले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत जे -ते आता व्ही.सी. च घेत असल्याने आणि प्रत्येक वरिष्ठ त्यांच्या सोयीने वेळा ठेवत असल्याने यात अधिकारी, कर्मचारी यांची कुचंबणा होत असल्याची चर्चा दबक्यात आवाजात सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उघडपणे कोणीही बोलायला धजत नसल्याचे एकंदरीत दिसून येते.
विधानसभेला लाभ उठवण्याचे नियोजन…..
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, लोकशाही दिन, विविध केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांचे दौरे, गणेशोत्सवाचा बंदोबस्त, ईद चा बंदोबस्त, नवरात्र उत्सवाचा बंदोबस्त, दसरा, दिवाळी, राजकीय दौरे, उपोषणे, मेळावे, विविध पक्ष व संघटणांच्या विविध मागण्या, रस्त्यांची दुरुस्ती, त्यासाठीची आंदोलने, मुख्यमंत्री योजनादूत, मतदार याद्यांचा कार्यक्रम, विधानसभा निवडणुकीची तयारी, आयटीआयमध्ये उभारण्यात आलेली संविधान मंदिरे, स्वच्छता ही सेवा योजना, पूरस्थितीवर देखरेख, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, पंतप्रधान आवास योजना आदी योजना युद्धपातळीवर राबवण्यात येत असून याचा लाभ विधानसभेसाठी उठवण्याचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले असल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांकडून बोलल्या जात आहे. (Schemes)
सही पकडे..
thank you for visit lonar news website