महाराष्ट्र

1 Breaking : Mobile Forensic Van : पहिले राज्य

‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Mobile Forensic Van : पुरावे नष्ट करणे, पुरव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होवून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Mobile Forensic Van : गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 कायद्यानुसार 7 किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 जानेवारी 2025 रोजी काढले.

Mobile Forensic Vanसह्याद्री अतिथीगृह गृह येथे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फित कापून आणि हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतीनिंधीशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात एकूण 259  मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 21 पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे सग्रहीत करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.  गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. (Mobile Forensic Van)

Mobile Forensic Vanया व्हॅनमध्ये रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कार गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहे. वैज्ञानिक तज्ज्ञ व सहायक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील.  तसेच स्फोटक पदार्थ तपासणी, सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत. तसेच व्हॅन सीसीटिव्हीने सज्ज असणार आहे. या व्हॅन कनेक्टेड असणार आहेत. त्यामुळे सबंधित पोलीस स्टेशनला सबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे.

यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. पुरावे नष्ट करणे, पुरव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होवून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. (Mobile Forensic Van)

कार्यक्रमाला राज्यमंत्री गृह (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मा. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, महासचालक (न्याय व तांत्रिक) संजय वर्मा, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय संचालक डॉ. संगीता घुमटकर, उपसचिव राजेंद्र भालवणे आदीसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अशी काम करणार फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन

Mobile Forensic Vanजेव्हा गुन्हा नोंदविला जातो, तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देऊन ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याचे ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. तसेच वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरनसद्वारे संपर्क साधून पुराव्यांचे संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले करतील.  त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल. (Mobile Forensic Van)

Subcribe To Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button