1 Best Calcium दुर्लक्ष नको काळजी घ्या
हे पदार्थ खा- कॅल्शियम Calcium मिळेल भरपूर, फॅक्चरचा टळेल धोका
Calcium हे पदार्थ खा- कॅल्शियम मिळेल भरपूर, फॅक्चरचा टळेल धोका. हे कसे करता येईल, कॅल्शियमने खच्चून भरलेत पदार्थ कोणते आहेत. हाडांना मजबुती मिळेल आणि तिशीनंतरही यंग कसे राहता येईल, याविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
Calcium धकाधकीच्या जीवनात तिशीनंतर हाडं मजबूत राहणे अत्यंत गरजेचं आहे. डॉ. भास्करराव मापारी यांच्या मतांनुसार , मुख्य म्हणजे जवळपास तिशीनंतर अनेकांची हाडे ठिसूळ होयला सुरुवात होते . असे झाल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते . भविष्यात होणारा त्रास टाळण्यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ असायलाच हवे . यामुळे आपल्याला कॅल्शियमयुक्त फळ-भाज्या तसेच पदार्थ विषयी माहिती असणे आवश्यक आहे .
धावपळीच्या युगात दररोजची दगदग-कामासाठी धापवळ यामुळे जवळपास अनेकांना शरीराला थकवा जाणवतो . हा थकवा कमी करण्यासाठी शरीराला आयर्न , प्रोटीन्स यांसारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते .
डॉक्टरांच्या मतांनुसार सांगायचे झाले तर कॅल्शियम Calcium असे एक मिनरल आहे जे हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते . याव्यतिरिक्त ब्लड क्लॉट , नर्व्हस सिस्टीमध्ये सुधारणा , हार्ट रेट नॉर्मल करण्यासाठीही साहाय्यक ठरते .आपल्या शरीरात जवळपास 99 टक्के कॅल्शियम हे हाडांमध्ये जमा असते आणि 1 टक्का कॅल्शियम हे मांसपेशींमध्ये असते .
डॉक्टरांच्या मतानुसार अंदाजे 19 ते 50 वर्षवयोगटातील महिलांना रोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची Calcium आवश्यकता असते . तर 50 वर्षांपुढील वयोगटातील महिलांना 1200 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते . 19 ते 50 वर्ष वयोगटातील पुरूषांना 1000 मिलीग्राम कॅल्शियमची Calcium आवश्यकता असते .
शरीरात कॅल्शियमची Calcium कमतरता निर्माण झाली असेल तर काय होऊ शकते , या विषयी माहिती घेऊ . कॅल्शियमच्या कमतरतेने हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपेरोसिससारखे आजार उद्भवू शकतात . इतकंच नाही तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांच्या समस्या , रक्त कमी होणं , नखं कमकुवत पडणं , एकाग्रता कमी होणं असे त्रास उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही .
Calcium कॅल्शियम ची कमतरता होऊ नये , यासाठी दूधासह इतर डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते , जे आपण दररोजच्या आहारात घेऊ शकतो . तसेच रोजच्या जेवणातील भाज्याही आपल्याला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम देऊ शकतात . बऱ्याच जणांना दूध प्यायलाही आवडत नाही तसेच दुधापासून बनविलेले पदार्थ खाण्यास टाळतात . अशावेळी कॅल्शियमयुक्त फळ- भाज्यांचा आहारात घेणे आवश्यक आहे.
हिवाळ्याच्या दिवसात होणारा त्रास कमी करण्यासाठी कॅल्शियमयुक्त भाज्यांचा समावेश केल्यास हाडांचे त्रास टाळता येऊ शकतो तसेच सांधेदुखीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होऊ शकते . डेअरी प्रोडक्ट् मध्ये ज्याप्रमाणे कॅल्शियम असते त्याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात शेंगा , ड्रायफ्रुट्स आणि स्टार्चयुक्त भाज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते .
केल आणि ब्रोकोली केल आणि ब्रोकोली कॅल्शियमच्या उत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. एक कप कच्च्या ब्रोकोलीमध्ये 43 मिलीग्राम कॅल्शियम असते तर एक कप केलमध्ये ५३ मिलीग्राम कॅल्शियम असते .
कोलार्ड ग्रीन्स कोलार्ड ग्रीन्समध्ये जवळपास 35 मिलिग्राम कॅल्शियम असते. सॅलेडच्या स्वरूपात आपण ही भाजी खाऊ शकतो . यात आयर्नचे प्रमाणही भरपूर असते .
भेंडी भेंडीची भाजी अनेकांना आवडत नाही . पण ही भाजी कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे . भेंडीच्या भाजीत जवळपास 65 मिलीग्राम कॅल्शियम असते .
किव्ही हाय कॅल्शियम फूड्समध्ये किव्ही तर सगळ्यात वर आहे . नियमित किव्ही खाल्ल्याने शरीराला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही आणि हाडं मजबूत राहतात . यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते .
प्रत्येकांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात . त्यामुळे जांभूळ , ब्लॅकबेरी , स्ट्रॉबेरी यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे हे लक्षात असू दया . हे फळ आपण सोयीनुसार हवे तेव्हा किंवा सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकतो . यात 20 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शियम असते .
या धावपळीच्या युगात तिशीनंतर बहुतांश जणांना हाडे दुखणे तसेच दातांच्या समस्या निर्माण होताना दिसत आहे . मुख्य म्हणजे ज्या महिला तिशीनंतर गर्भवती राहतात , त्यांना कॅल्शियमची जास्त गरज असते . कारण गर्भधारणेदरम्यान कॅल्शियम आवश्यक असते .
यासंदर्भात डॉक्टरांचे म्हणणे आहे कि , महिलांना दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते . आपल्या आहारात कॅल्शियम , व्हिटॅमिन डी , प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असावा . हाडे मजबूत झाल्याने ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांची शक्यता कमी होऊ शकते . यासाठी हाडांच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे .
हाडं मजबूत करण्यासाठी आहारात कोणते 4 पदार्थ असणे आवश्यक आहे. याची माहिती जाणून घेऊ.
- पालेभाज्या
आहारात पालेभाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे . पालेभाज्या हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे . ज्यामुळे हाडंच नाहीतर , आरोग्यही सुधारते .
2. पांढरे तीळ
पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते . यासह यात फायबर आणि प्रोटीनही आढळते . आपण तीळ भाजी , मसाले किंवा इतर कोणत्याही पदार्थात मिक्स करून खाऊ शकतो .
3. पनीर
दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते . पनीरमध्ये प्रोटीन , फॉस्फरस आणि कॅल्शियम आढळते . ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते . यासह सांधेदुखीपासून आराम मिळतो .
4. बदाम
बदाम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे उत्तम स्त्रोत आहे . नियमित बदाम खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते . याशिवाय बदाम हे प्रथिने , फायबर आणि इतर जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस आहे .
टीप : वरील सर्व बाबी लोणार न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोणार न्यूज कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.