महाराष्ट्र

1 Breaking Akola; पार्किंगची समस्या सुटणार !

रेल्वे स्टेशनवरील पार्किंगची समस्या मार्गी लावून वाहतूकही वन वे करण्याचे निर्देश !

Breaking Akola : कृषि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खतांचा पुरवठा उपलब्ध करण्याचे  खासदार अनुप धोत्रे यांनी दिले निर्देश !

Breaking Akola अकोला रेल्वे स्टेशनवर दोन ठिकाणी होणार पार्किंग !

खासदार अनुप धोत्रे : शंभर दिवसांच्या कामाचा रोड मॅप तयार !

अकोला : दिल्ली येथील शपथविधी सोहळा आटोपून अकोल्याचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे मंगळवारी अकोल्यात परतले. अकोल्यात येताच, त्यांनी रेल्वे स्टेशनचा दौरा करून रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे स्टेशनवरील पार्किंगची समस्या मार्गी लावून वाहतूकही वन वे करण्याचे निर्देश दिले. तसेच खासदार  अनुप धोत्रे यांनी महावितरण, कृषि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खतांचा पुरवठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. महावितरणच्या अधिकाऱ्यांना सौरउर्जा योजनेच्या माध्यमातून 60 हजार शेतकऱ्यांना विज उपलब्ध करून देण्याबाबत  सूचना केल्या. Breaking Akola

 Breaking Akolaखासदार अनुप धोत्रे यांनी शंभर दिवसांच्या कामाचा रोड मॅप तयार केला असून, त्यानुसार मंगळवारी सकाळी त्यांनी रेल्वे स्थानकावर भेट देऊन रेल्वे विभागातील विद्युत, बांधकाम, पोलिस अधिकारी व वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नागरिकांच्या दृष्टीकोनातून समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला.

पोलिस अधिकारी, ऑटो चालक, रेल्वे कर्मचारी यांच्याशी चर्चा करून पार्किंगची समस्या निकाली काढण्याच्या सूचना केल्या. विकास कामांचा आढावा घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तसेच दक्षिण आणि मध्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. खासदार अनुप धोत्रे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत, शेतकऱ्यांना खतांची तुटवडा होऊ नये. त्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत जीआरपी ठाणेदार अर्चना गाढवे, आरपीएफचे ठाणेदार युनूस खान उपस्थित होते. Breaking Akola

Breaking Akolaरेल्वे स्टेशनवरील पार्किंगची समस्या मार्गी !

खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे विभागातील विविध विकास कामे व दैनंदिन कामकाजाबाबत पाहणी केली. तसेच रेल्वे स्टेशन वरील पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेतला. अधिकारी, प्रवाशी, ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यासह रेल्वे स्टेशनच्या आत व बाहेर जाण्याचा मार्ग वन वे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Lonar News YouTube Channel

खासदार अनुप धोत्रे (अकोला – भाजप) ; घराण्यातील तिसरी पिढी !

Breaking Akolaअकोल्यातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा श्यामराव धोत्रे हे आमदार होते. त्यानंतर वडील संजय धोत्रे यांची तीन दशकावून अधिक काळाची यशस्वी राजकीय कारकीर्द आहे. संजय धोत्रे यांनी सर्वप्रथम मुर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये त्यांना अकोल्यातून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. लोकसभेवर सलग चार निवडणुकांमध्ये ते विक्रमी मताधिक्याने निवडून गेले. २०१९ मध्ये त्यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. अनुप धोत्रे यांच्या मातोश्री सुहासिनी धोत्रे भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.

अनुप धोत्रे यांचा जन्म २४ मे१९८४ रोजी झाला आहे. पुणे येथील सिंबायोसिस महाविद्यालयातून बी.कॉम.चे त्यांनी शिक्षण घेतले. वडिलांच्या आजापणामुळे त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अनुप धोत्रे सक्रिय झाले. या अगोदर कधी निवडणूक लढली नसली तरी वडिलांच्या निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर नेहमी राहतच होती. सोशल मीडिया प्रभारी म्हणून पक्षात त्यांनी जबाबदारी पार पाडली. युवकांचे संघटनात्मक जाळे निर्माण केले. अनुप धोत्रे यांच्यावर २०२४ मध्ये अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देत पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टिने ते कामाला लागले. तळागाळातून जनसंपर्क वाढविण्यासोबतच पक्षसंघटन मजबूतीवर त्यांनी भर दिला. त्याचा लाभ त्यांना निवडणुकीत झाला. Breaking Akola

अकोला येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनुप धोत्रे यांचा उद्योग समूह आहे. यामध्ये इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाइप्स उत्पादन, रेपोल प्लास्टिक, थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भूविकास आदी व्यवसायांचा समावेश आहे. प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी असण्यासह कृषी विज्ञान केंद्राचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. ग्वाल्हेर येथील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते सचिव आहेत, तसेच अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. अकोला येथील नीळकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. Breaking Akola

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button