कृषीमहाराष्ट्र

1 Breaking : Buy Soybeans : उद्दिष्ट पूर्ण

देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात : पणन मंत्री जयकुमार रावल

Buy Soybeans : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार  दि.15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील 562 खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सूरू करण्यात आली आहे.

Buy Soybeans : देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात; गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 27 : राज्यात नोंदणी झालेल्या 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांकडून 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली असून ही खरेदी इतर राज्याच्या तुलनेने सर्वाधिक आहे. देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. (Buy Soybeans)

Buy Soybeansयाबाबत माध्यमांशी बोलताना पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल यासंदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. 31 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी चालू राहणार असल्याने सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. तथापि, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मुदत वाढवून मागितली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Buy Soybeans)

पणनमंत्री जयकुमार रावल म्हणाले, राज्यात नाफेड व एनसीसीएफ अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार  दि.15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील 562 खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सूरू करण्यात आली आहे. नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीची मुदत एक वेळा वाढवली. त्यानंतर सुरुवातीला सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी 2025 पर्यंत होती, मात्र या मुदतीत अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी न झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून खरेदीची मुदत दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. (Buy Soybeans)

Buy Soybeansमध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक खरेदी केली आहे. महाराष्ट्रासह या सहाही राज्याची एकूण खरेदी 18 लाख 68 हजार 914 मेट्रिक टन इतकी झाली असून यापैकी महाराष्ट्राने 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन खरेदी केली आहे. राज्यात नांदेड जिल्ह्यात 57 हजार 528 शेतकऱ्यांकडून 1 लाख 290 मेट्रिक टन इतकी सर्वाधिक सोयाबीन खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात 29 हजार 764 शेतकऱ्यांकडून 60 हजार 989 मेट्रिक टन खरेदी झाली आहे. सुरुवातीच्या काळात आलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून आजही वेगाने खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. (Buy Soybeans)

Buy Soybeansकेंद्र सरकारने सन 2024-25 करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल 4 चार 892 रुपये इतका हमीभाव घोषित केला असून त्यानुसार खरेदी सुरू आहे. हे दर मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा 292 रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहे. सन 2024-25 मध्ये लागवडीखालील क्षेत्र 50.51 लाख हेक्टर असून उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे. पीएसएस खरेदीसाठी केंद्र सरकारने 14 लाख 13 हजार 270 मे.टन (19.28 टक्के) मंजूरी दिली असल्याची माहितीही मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. (Buy Soybeans)

(Buy Soybeans) राज्यातील सोयाबीन खरेदीच्या संदर्भात ठळक मुद्दे :

❖    मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख पाच सोयाबीन उत्पादक राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने सर्वाधिक सोयाबीन खरेदी केली आहे.

❖        अजून गरज भासल्यास केंद्र सरकारला सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची विनंती करणार.

❖    राज्यात नोंदणी झालेल्या एकूण 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांपैकी 25 जानेवारी 2025 पर्यंत 3 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांकडून 7 लाख 81 हजार 447 मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली.

❖        नाफेड व एनसीसीएफ यांच्या अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सी च्या माध्यमातून दिनांक 1 ऑक्टोबर2024 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली होती, त्यानुसार 7 लाख 64 हजार 631 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

❖    मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक खरेदी केली आहे. महाराष्ट्रासह या राज्यांची एकूण खरेदी 18 लाख 68 हजार 914 मॅट्रिक टन इतकी झाली असून त्यापैकी 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन खरेदी महाराष्ट्राने केली आहे.

 ❖       दि. 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. या खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफ च्या अंतर्गत नोडल एजन्सी कडून राज्यात 562 केंद्रांवर खरेदी वेगाने सुरू आहे.

❖        सोयाबीन खरेदीची मुदत दि. 12 जानेवारी 2025 रोजी संपलेली होती, मात्र लोकप्रतिनिधी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना विनंती करून ही मुदत दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे.

❖    केंद्र शासनाने सन 2024-25 करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल 4 हजार 892 इतका हमीभाव घोषित केला आहे. या वर्षाचे दर हे मागील वर्षाच्या हमी भावापेक्षा रू 292 रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहेत.

❖        राज्यात सर्वाधिक सोयाबीन खरेदी नांदेड जिल्ह्यात झाली असून 57 हजार 528 शेतकऱ्यांकडून 1 लाख 290 मेट्रिक टन इतकी खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील 29 हजार 764 शेतकऱ्यांकडून 60 हजार 989 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे.

❖    31 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी सुरू राहणार आहे, त्यामुळे खरेदीचा आकडा अजून वाढेल. दरम्यान सोयाबीन खरेदीची आणखी गरज भासल्यास केंद्राकडून मुदत वाढवून देण्याची विनंती करणार आहे.

❖        सन 2024-25 मध्ये लागवडीखालील क्षेत्र 50.51 लाख हेक्टर व उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे.

❖    सुरुवातीला सोयाबीन खरेदीत येणाऱ्या बारदान उपलब्धता व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. त्यात खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खरेदी प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या, त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट साध्य.

❖        खरेदीनंतर बँकिंग प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यासाठी जलद गतीने कारवाईच्या सूचना नाफेड आणि यंत्रणेला दिल्या. त्यानुसार लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा झाले.

(Buy Soybeans)

बी.सी.झंवर/विसंअ/

Subcribe To Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button