
Breaking 57.12 % Polling Was Peaceful In Talani : तळणीत सरासरी 57.12 टक्के मतदान, मतदारांनी कोणाला कौल दिला याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे.
तळणीत शांततेत 57.12 टक्के मतदान !
मतदारांमध्ये उत्साह तर पक्षीय पदाधिकारी – कार्यकर्त्यांमध्ये निरउत्साह !
अमोल राऊत, तळणी, ता. मंठा, जि. जालना
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील रासपाचे उमेदवार महादेव जानकर व महाविकास आघाडीचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उमेदवार संजय ( बंडु ) जाधव यांच्यासह 32 उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी मतदानानंतर ईव्हीएममध्ये सीलबंद झाले. मतदानाच्या दिवशीही या दोन्ही उमेदवारांमध्येच अंतिम लढतीचे चित्र बघायला मिळाले. तळणीत सरासरी 57.12 टक्के मतदान झाले असून मतदारांनी कोणाला कौल दिला याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे.
परभणी लोकसभेसाठी शुक्रवारी तळणी सर्कल मध्ये शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. तळणी येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्रांवर एकुन 4 हजार 362 मतदानापैकी 2 हजार 492 एवढे मतदान झाले . तळणीत मतदारांसाठी मतदान करण्यासाठी 4 भाग केले होते. यांमध्ये पुरुष मतदार 2 हजार 267 तर स्त्री मतदार 2 हजार 95 होते. त्यामध्ये पुरुष मतदारांनी 1 हजार 317 मतदान तर स्त्री मतदारांनी 1 हजार 175 मतदान केले. (57.12 % Polling Was Peaceful In Talani)
तळणीत भागनिहाय असे झाले मतदान ….. Polling
तळणी जिल्हा परिषदेच्या शाळेत भाग क्रं 8 मध्ये 1 हजार 351 मतदानापैकी पुरुष 398 व स्त्री 434 एकुण 832 , भाग क्रं 9 मध्ये 957 मतदानापैकी पुरुष 296 व स्त्री 251 एकुन 547 ,भाग क्रं 10 मध्ये 1 हजार 11 मतदानापैकी पुरुष 337 व स्त्री 254 एकुण 591, भाग क्रं 11 मध्ये 1 हजार 43 मतदानापैकी पुरुष 286 व स्त्री 236 एकुण 522 एवढे म्हणजेच 57.12 टक्के मतदान झाले.
उमेदवार , नेत्यांसह अधिकाऱ्यांच्या केंद्राला भेटी …
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डंख , भाजपाने माजीमंत्री बबनराव लोणीकर , उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे पाटील , काँग्रेसचे अण्णासाहेब खंदारे , परतुर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांनी तळणी मतदान केंद्राला भेटी दिल्या . (57.12 % Polling Was Peaceful In Talani)
सोशल मीडियाच्या प्रचार जय – पराजयाची समीकरणे बदलणार ?
परभणी लोकसभेतील महायुतीतील रासपाचे उमेदवार महादेव जानकर यांनी ओबीसींच्या मोर्चाना लावलेली हजेरी व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय (बंडु) जाधव यांनी मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्यामुळे ओबीसी – मराठा मतदारांत सरळ सरळ फुट पडलेली दिसली. महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना मराठा व मुस्लिम मतदारांनी उघडपणे पसंती दर्शविली . त्यामुळे ओबीसी व मायक्रो ओबीसींचा महायुतीतील रासपाचे उमेदवार महादेव जानकर यांच्याकडे कल वाढलेला दिसला. यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डंख यांना दलित मते मिळवण्यात नेमकं किती यश येईल, हेही पाहावे लागेल. (57.12 % Polling Was Peaceful In Talani)
मराठा – ओबीसी , मुस्लिम – दलित मते जय -पराजयाची निर्णायक भूमिका ठरविणार आहे . यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या प्रचार, पक्षांची फाटाफूट , नेते मंडळींच्या बेडूक उड्या, बदललेले संदर्भ या साऱ्यांचा परिणाम पाहायला मिळत असून , जय-पराजयाची समीकरणे पुरती बदलून गेली आहेत.
लग्न सोहळ्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी ?
तळणीत ४ तर परिसरातील शिरपूर , गारटेकी , जाभरुण यांसह अन्य गावांत लग्न सोहळ्यामुळे कुटुंबांतील सदस्यांनी लगीन घाईत मतदानाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसून आले.
मतदारांमध्ये उत्साह तर पक्षीय पदाधिकारी – कार्यकर्त्यांमध्ये निरउत्साह !
परभणी लोकसभेच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान करुन घेण्यासाठी अपेक्षित जोर लावलेला दिसून आला नाही. पण , मतदारांनी ठरवलेल्या उमेदवारांना स्वयंपुर्तीने केंद्रांवर जाऊन मतदान केल्याचे दिसले. (57.12 % Polling Was Peaceful In Talani)
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51% टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान वर्धा लोकसभेत झाले, तर सर्वात कमी मतदानाची नोंद हिंगोली लोकसभा मतदार संघात झाली आहे.
(57.12 % Polling Was Peaceful In Talani)
मतदारसंघनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
वर्धा – 56.66 टक्के
अकोला – 52.49 टक्के
अमरावती – 54.50 टक्के
बुलढाणा – 52.24 टक्के
हिंगोली – 52.03 टक्के
नांदेड – 52.47 टक्के
परभणी -53.79 टक्के
यवतमाळ – वाशिम – 54.04 टक्के
(57.12 % Polling Was Peaceful In Talani)
लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात परभणी मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. परभणी लोकसभा मतदारसंघात सरासरी एकूण अंदाजे 60.09 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. सर्वात कमी मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात 55.17% झाले असून सर्वाधिक मतदानाची नोंद पाथरी विधानसभा मतदारसंघात 63.44%) झाली आहे.
परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 290 मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात 55.17 टक्के, परभणी 60.07 टक्के, गंगाखेड 62.02 टक्के, पाथरी 63.44 टक्के, परतुर 59.42 टक्के आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात 60.09 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. परभणी लोकसभा मतदारसंघात सरासरी एकूण 60.09 टक्के मतदान नोंद झाले आहे. (57.12 % Polling Was Peaceful In Talani)