1 Breaking Climate Change थंडी वाढणार !
Climate Change पुढील पाच दिवस कसं असणार हवामान ?
Climate राज्यात महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीने डोकं वर काढलं आहे. राज्याच्या काही भागात झपाट्याने थंडी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
Climate हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या किमान तापमानाचा पारा खाली घसरत असताना पहायला मिळत आहे. मात्र, किमान तापमान डिसेंबरमध्ये असायला पाहिजे तसं त्या पातळीवर दिसत नाही किंवा अजूनही त्या पातळीवर आलेले नाही, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Climate Update
देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विदर्भात देखील किमान तापमानाचा पारा खाली घसरल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वातावरणात बदल पाहता आता खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागात थंडी सुरु झाली आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दुसरीकडे विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विदर्भात किमान तापमान 15 अंश सेल्सिअस खाली गेले असून सर्वाधिक उष्ण असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 13 अंश सेल्सिअसवर गेल्याचे पहायला मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्याच्या थंडीचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच आहे. डिसेंबरमधील थंडी ह्याच पातळीत राहील असे सांगण्यात येत आहे . सध्याचे महाराष्ट्रातील तापमान वेगवेगळ्या भागात 15 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, म्हणजे ते सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने अधिक आहे.
Climate Update
देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात हलका पाऊस पडत असल्याचंही चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील अनेक राज्यातील किमान तापमानात घट होत आहे. दिल्लीतील किमान तापमान 4.9 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. दिल्लीतील किमान तापमान शिमल्यापेक्षाही कमी आहे. शिमल्यातील एके दिवशी तर किमान तापमान 6.8 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं असल्याचे बोलले जात आहे.
हरियाणातील हिसारमध्ये 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. पंजाबमधील अनेक शहरांमध्ये दृश्यमानता घटली आहे. हरियाणातील हिसारमध्ये 4.2 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. एकापाठोपाठ एक वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात घट होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
Climate Update
हिसारबरोबरच उत्तर प्रदेशातील बरेली येथेही किमान तापमान 4.6 अंश नोंदवले गेले. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणांपेक्षा राष्ट्रीय राजधानी थंड होती. जसे की शिमला, काही दिवशी सकाळी किमान तापमान 6.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मसूरी येथे किमान तापमान 6.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राजस्थानच्या काही भागात दिल्लीपेक्षा जास्त किमान तापमान नोंदवले गेले. यापैकी चुरुमध्ये 7.4 अंश, तर जोधपूरमध्ये किमान तापमान 10.3 अंशांवर नोंदवले गेले.
Climate Update
उत्तर आणि वायव्येकडून वाहणारे थंड वारे थंडीसाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील किमान तापमान सामान्यपेक्षा कमी आहे. उत्तर आणि वायव्येकडून वाहणारे थंड वारे यासाठी कारणीभूत आहेत. हे वारे उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात पोहोचत आहेत. अंदाजानुसार, चालू आठवड्याच्या अखेरीस जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तुरळक पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दिल्लीतही तापमानात घट होण्याची खात्री आहे.
Climate Update
डिसेंबर सुरू झाला कि कोरड्या हवेसह थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. मिचाँग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर आता भारताच्या बहुतांश भागात थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्य भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. तेथील किमान तापमान 5 ते 10 अंशांवर खाली आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही. राज्यात 18 डिसेंबरपासून थंडी सुरू होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी व दाट धुके आहे. 16 डिसेंबरपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे राज्यात शीतलहरी येण्यास 18 तारीख उजाडणार आहे.
Climate Update
राज्यातील हवामान कसे राहील याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे कारण मागील काही दिवसापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात होती तसेच राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सुद्धा आला, अशा परिस्थितीमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यामुळे यापुढील हवामान अंदाज काय आहे , हे शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे असेल.
महाराष्ट्रातील हवामान अंदाज जारी केलेला आहे व त्यानुसार राज्यामधील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. मागील काही दिवसात अवकाळी पाऊस आल्याने हरभरा, द्राक्ष तसेच इतर विविध प्रकारच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने तूर व हरभरा या दोन पिकांवर मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव जाणवलेला होता त्यामध्ये अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे.
असा परिस्थितीमध्ये थंडीची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण असेल कारण रब्बी हंगामातील पिकांना थंडीची आवश्यकता असते त्यामुळे थंडी पडल्याने चांगले प्रमाणात पीक येऊ शकते, राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने 13 डिसेंबर या तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील गोंदिया, विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर तसेच गडचिरोली या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असली तरी हा पाऊस हलका ते मध्यम असेल तर थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात राज्यांमध्ये वाढ होणार आहे. अशा प्रकारचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.