1 Breaking CM Eknath Shinde’s big announcement
राज्यातील 4 लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री
1 Breaking CM Eknath Shinde’s big announcement : शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील 4 लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री
बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून 4 लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत 3 लाख 73 हजार कोटींचे करार करण्यात आले असून यातून 2 लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 2 लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अहमदनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. (CM Eknath Shinde’s big announcement)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत. (CM Eknath Shinde’s big announcement)
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे. राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. 34 जिल्ह्यातील 250 तालुक्यातील 511 गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी 50 हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. (CM Eknath Shinde’s big announcement)
प्रत्येक उद्योग व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. (CM Eknath Shinde’s big announcement)
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शिर्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना 15 दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. (CM Eknath Shinde’s big announcement)
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. 5 हजार 14 कोटींचे सामंजस्य करारातून 23 हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात 12 हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली. (CM Eknath Shinde’s big announcement)
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय ! नागरिकांसाठी राबविणार नवीन घरकुल योजना..
येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यात की, लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, काल विधिमंडळात राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, इत्यादींसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्यात. यामध्ये नवीन घरकुल योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. खरंतर राज्यात महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना अशा कल्याणकारी योजनांचा समावेश होतो. (CM Eknath Shinde’s big announcement)
एवढेच नाही तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने जाहीर केलेल्या नमो आवास योजनेचा देखील यामध्ये समावेश होतो. नमो आवास योजनेअंतर्गत राज्यातील ओबीसी समाजातील नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय, केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देखील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यांना राहण्यासाठी हक्काचे घर नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत घर उपलब्ध होत आहे. (CM Eknath Shinde’s big announcement)
दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका घरकुल योजनेची घोषणा करण्यात आली. अजित पवार यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन घरकुल योजनेची घोषणा केली आहे. ज्या दिव्यांग बांधवांना हक्काचे घर नाही अशा दिव्यांग व्यक्तींना घरकुल उपलब्ध करून दिले जाईल असे शासनाने काल जाहीर केले आहे. या घोषणेमुळे राज्यातील बेघर असलेल्या दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या योजनेचा 34 हजार 400 लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून दिला जाईल असे यावेळी वित्तमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे. (CM Eknath Shinde’s big announcement)
गाव-खेड्यातल्या महिला लखपती होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची यवतमाळमध्ये मोठी घोषणा !
महिला बचत गटाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या हस्ते हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात महिलांना लखपती करण्याच्या योजनेबाबत भाष्य केलं. मोदीने गावाच्या बहिणींना लखपती दीदी बनण्याची गॅरंटी दिली आहे. आतापर्यंत देशाच्या 1 कोटी बहिणी लखपती बनल्या आहेत. यावर्षाच्या बजेटमध्ये आम्ही घोषणा केली आहे की, 3 कोटी बहिणींना लखपती बनवायचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आता संकल्पच्या सिद्धीसाठी मी काम करत आहे. बहिणी आणि मुलींची संख्या 10 कोटींच्या पार गेली आहे. या महिलांना बँकेकडून 8 लाख कोटी रुपये दिले गेले आहेत. 40 हजार कोटी रुपयांचा फंड केंद्र सरकारने दिला आहे. महाराष्ट्रातही बचत गटाशी संबंधित महिलांना याचा फायदा झालाय. आजही 800 कोटींपेक्षा जास्त रुपयांची मदत दिली गेली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यवतमाळच्या बघिणींनी अनेक ई-रिक्षा देण्यात आल्या आहे. मी महाराष्ट्र सरकारचं या कामासाठी विशेष अभिनंदन करतोय. महिला आता ड्रोनही चालवतील. नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून बघिणींच्या समुहांना ड्रोन पायलटची ट्रेनिंग दिली जात आहे. मग सरकार या महिलांना ड्रोन देईल ज्याचा वापर शेतीच्या कामासाठी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदीने आणखी एक गॅरंटी देशाच्या शेतकऱ्यांना दिली होती. काँग्रेस सरकारने कित्येक दशक देशातील 100 मोठ्या सिंचन योजनांना लटकावून ठेवलं होतं. यापैकी 60 पेक्षा जास्त पूर्ण झाले होते. लटकलेल्या योजनांमध्ये महाराष्ट्राच्या 26 योजना होत्या. महाराष्ट्राच्या जनतेला हे जाणण्याचा अधिकार आहे की, कुणाच्या पापाची शिक्षा तुमच्या पिढ्यांना भोगावी लागत आहे. या 26 लटकलेल्या योजनांपैकी 12 योजना पूर्ण झाले आहेत. तर इतरांवरही जोरात काम सुरु आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
हे भाजपचं सरकार आहे ज्याने 50 वर्षांनी पूर्ण करुन दाखवलं आहे. कृष्णा-कोयना लिफ्ट सिंचन योजना, टेंभू लिफ्ट सिंचन योजना अनेक दशकांनी पूर्ण झालीय. गोसीखुर्द सिंचन योजना आमच्या सरकारनेच पूर्ण केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी पीएम कृषी सिंचन आणि बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत 51 प्रकल्पांचं लोकार्पण होईल. यातून 80 हजार पेक्षा जास्त हेक्टर जागेला सिंचनाची सुविधा मिळेल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.(CM Eknath Shinde’s big announcement)
2 आठवड्यातच मक्याच्या बाजारभावात 20 टक्क्यांची वाढ !
मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मक्याचे बाजार भाव तेजीत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यातच मक्याच्या बाजारभावात 20 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. यामुळे मका उत्पादकांना दिलासा मिळत असून आगामी काळात मक्याचे बाजार भाव कसे राहणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
(CM Eknath Shinde’s big announcement)
दरम्यान बाजार अभ्यासकांनी या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. खरे तर गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला. याचा परिणाम म्हणून ऊस लागवड मोठ्या प्रमाणात पिछाडली. ऊस लागवडीवर कमी पावसाचा परिणाम पाहायला मिळाला. शिवाय ज्या ठिकाणी ऊस लागवड झाली तिथे देखील अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शासनाने साखरेची उपलब्धता व्हावी यासाठी इथॅनॉल निर्मितीबाबतचे आपले धोरण काहीसे बदलले आहे. इथेनॉल निर्मितीसाठी आता अधिक प्रमाणात मका वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच उसाचा वापर हा इथेनॉल निर्मितीमध्ये कमी ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. या निर्णयामुळे मात्र मका उत्पादकांना मोठा दिलासा मिळत असून बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
(CM Eknath Shinde’s big announcement)
दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी मका आणि इतर धान्यांपासून तयार झालेल्या इथेनॉल ची किंमत पाच रुपयांहून अधिकने वाढवली आहे. त्याचा परिणाम म्हणून पोल्ट्री उद्योगात सध्या मक्याचा शॉर्टेज पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या बाजारभावात तेजी आली असून आगामी काळात देखील बाजारभाव चढेच राहणार असे पोल्ट्री उद्योगातील जाणकार लोकांनी सांगितले आहे. इथेनॉल साठी आणि पोल्ट्री उद्योगात मक्याची मागणी वाढत असल्याने आणि सध्या स्थितीला पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणात मक्याचा शॉर्टेज पाहायला मिळत असल्याने आगामी काळात सुद्धा बाजार भाव असेच तेजीत राहतील असे मत काही जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.
(CM Eknath Shinde’s big announcement)