1 Breaking Election : उमेदवार कोण ?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारी देण्यावरून राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता !
Breaking Election : मेहकर विधानसभा मतदार संघात उमेदवार देण्यावरून महाविकास आघाडीत राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Breaking Election : मेहकर विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. १५ ऑक्टोबर 2024 रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणूकी च्या मतदानाची तारीख जवळ जवळ येत आहे. त्यादृष्टीने होत असलेल्या भेटीगाठी तसेच खाजगी व सार्वजनिक कार्यक्रमातील राजकीय नेत्यांची उपस्थिती पाहता मेहकर विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न अजून गुलदस्तात असल्यामुळे यावेळेस निवडणुकीत रणधुमाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Breaking Election)
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर प्रा.डॉ. गोपाल बच्हीरे यांनी पुढाकार घेत बुलढाणा जिल्हा संघटक पद मिळविले. बुलढाणा लोकसभा निवडणूकी दरम्यान त्यांनी लोणार तालुक्यात प्रचार करता करता मेहकर तालुक्यात ही प्रचाराला सुरुवात केली. दरम्यान विद्यमान आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बच्छिरे हेच मेहकर विधानसभा मतदार संघ सक्षमपणे लढवू शकतील अशी चर्चा जोर धरू लागली.
मात्र लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेला कल पाहता मेहकर विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या हळूहळू वाढू लागली. इच्छुक उमेदवार म्हणून लोणार तालुक्यातील सुदन अंभोरे, मेहकर तालुक्यातील किसन पाटील, प्रा. सतीश ताजने, सिंदखेड राजा तालुक्यातील सिद्धार्थ खरात यांची नावे चर्चेतून समोर येत आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या अजून वाढत जाणार असल्याचे बोलले जात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारी देण्यावरून राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कडून दावेदारी केली जात असल्याची चर्चा होत आहे.
मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये राजकीय पेच निर्माण झाल्याने मतदार विभागला गेला. मेहकर विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी कडून उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याने कोणत्या पक्षाचा आणि कोण उमेदवार राहणार हा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाल्याचे चर्चेतून समोर येत आहे. त्यातच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून मेहकर विधानसभेवर दावेदारी केली जात असून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी रेटली जात असल्याची माहिती अनेक बैठकीत होत असलेल्या चर्चेतून समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून राजकीय बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Breaking Election)