स्थानिक बातम्या

1 Breaking Electricity पाऊस सुरु बत्ती गुल

महावितरणचे अधिकारी मस्त, कंत्राटी लाईनमनवर भिस्त!

Electricity : लोणार शहर आणि ग्रामीण भागात महावितरणची यंत्रणा नियोजनाभावी कोलमडली असल्याने अनेक प्रभागांत दिवसभर विजेची ये-जा सुरू असते.

Electricity महावितरणची बत्ती पावसाळ्यात गुल !

■ नियोजनाभावी यंत्रणा कोलमडली!     

■ अधिकारी मस्त, कंत्राटी लाईनमनवर भिस्त!

किशोर मापारी, लोणार न्यूज नेटवर्क.

लोणार : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, जून महिन्यात पहिल्याच आठवड्यातील पावसाने महावितरणची यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडलेली दिसत आहे. पावसामुळे शहर आणि  ग्रामीण भागातील अनेक भाग व गावांची बत्ती गुल होत आहे. यामुळे वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास ग्राहकांना दुरुत्तरे ऐकावी लागत असल्याने ग्राहकांची अवस्था जाये तो जाये कहा अशी झाली आहे.

Electricityलोणार शहर आणि ग्रामीण भागात महावितरणची यंत्रणा नियोजनाभावी कोलमडली असल्याने अनेक प्रभागांत दिवसभर विजेची ये-जा सुरू असते. थोडासाही  पाऊस-वारा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होतो. खंडित झालेल्या वीजपुरवठ्याबाबत महावितरणने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बहुसंख्य वेळेस प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर काही ग्राहकांनी अधिकारीचा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास एक तर ते भ्रमणध्वनी उचलत नाहीत उचलल्यास मला भ्रमणध्वनी करण्याऐवजी लाईनमनशी संपर्क करण्याचे सांगून ग्राहकांशी उध्दटपणे बोलत असल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत आहे. महवितरण दर महिन्याला वीजबिल वसूल करीत असताना सेवा देण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे बोलल्या जात  आहे. Electricity

Electricityलोणार शहर पर्यटन ठिकाण असून येथे जर वीज पुरवठा सुरुळीत करण्यास महावितरण अपयशी ठरत असेल तर ग्रामीण भागातील सेवेबाबत विचार न केलेला बरा. जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पडणाऱ्या पावसाने महावितरणने पावसाळ्यापूर्वी कागदावर केलेल्या कामाची पोलखोल केली आहे. शहरातील शिक्षक कॉलनी, सराफा लाईन, सहकार नगर, हिरडव रोडसह मापारी गल्ली, राम नगर, माऊली नगर, लिंबी बारव, बेशिक शाळा, गवळी पुरा, माळी पुरा, पंचायत समिती, नयी नगरी, मस्जिद चौक, प्रताप चौक, पटेल नगर, काटे नगर, वाल्मिक नगर, राम मंदिर, तहसिल परिसर, गुलाब खां मोहल्ला, घरकुल, खटकेश्वर नगर, आझाद नगर तसेच इतर ठिकाणी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला ग्राहक कंटाळले आहेत.

ग्राहकांना अखंडित सेवा देण्याच्या नावाखाली उन्हाळयात महावितरणच्यावतीने मेंटनन्स नावाखाली कधी अर्धा दिवस तर कधी पूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र त्यानंतरही खंडित वीज पुरवठ्याचा सिलसिला सुरूच राहतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कंत्राटी लाईनमनची पळापळ होत असतानाच अधिकारी मात्र या सर्व त्रासापासून अलिप्त असल्याचे दिसत आहे.

Electricityदेखभाल दुरुस्ती फसवी !

लोणार शहरात वाऱ्याची छोटी झुळुक व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तरी अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याने देखभाल दुरुस्तीचा फसवा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. चांगली सेवा देण्यास महावितरण सपशेल अपयशी ठरत असून त्याचा फटका प्रामाणिक वीज ग्राहकांना बसत असल्याचे दिसत आहे. वीजबिल वसुलीसाठी आग्रही असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सेवेबाबतही विनम्र व तत्पर राहणे गरजेचे आहे. Electricity

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button