1 Breaking Farmer : व्यथा आणि पिक कर्ज !
दुर्लक्षित शेतकरी : राज्यात पिक कर्ज वितरणात मोठी तफावत
Farmer : महाराष्ट्र राज्यातील 5 जिल्ह्यात म्हणजे 13 टक्के क्षेत्रात राज्यातील एकूण पिक कर्जाच्या 33 टक्के रक्कम वापरली जाते. उर्वरित महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यांच्या म्हणजे 87 टक्के प्रदेशाच्या वाट्याला 67 टक्के रक्कम येते आहे. त्यामुळे राज्यात पिक कर्ज वितरणात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे.
Farmer: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले कापूस पिकाचे हेक्टरी उत्पन्न ऊसापेक्षाही जास्त आहे. तरी ऊसाला मिळणारे हेक्टरी कर्ज आणि पांढऱ्या सोन्याला म्हणजे कापसाला मिळणारे हेक्टरी पिक कर्ज यांच्यात जवळपास तिपटीचा फरक दिसून येतो. अशीच स्थिती अन्य नगदी पिकांच्या बाबतीतही दिसून येते.
महाराष्ट्र राज्यात ऊस, द्राक्ष आणि केळी पिकांचे जास्त उपन्न घेणारे जवळपास पाच जिल्हे आहेत. अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात म्हणजे राज्याच्या 13 टक्के क्षेत्रात राज्यातील एकूण पिक कर्जाच्या 33 टक्के रक्कम वापरली जात असल्याचे चित्र आहे. उर्वरित राज्यातील कापूसबहुल जिल्ह्यांच्या म्हणजे 87 टक्के क्षेत्राच्या वाट्याला 67 टक्के रक्कम येते आहे. यावरून राज्यात पिक कर्ज वितरणात संतुलन नसल्याचे निदर्शनास येते. Farmer
दरवर्षी पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना घेण्यात येणाऱ्या पिकांनुसार विविध राष्ट्रीय बँकामार्फत तसेच इतर बँकामार्फत पिक कर्ज दिले जाते. हे कर्जाची मुदतीत फेड केली तर त्यावर बँकाकडून व्याजही आकारले जात नाही. मात्र विदर्भ आणि मराठवाडयातील शेतकऱ्यांचा शेतीचा उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या पिक कर्जाचा कुठलाच ताळमेळ लागत नाही. त्यातच गेल्या काही वर्षापासून कधी ओला दुष्काळ पडतो तरी कोरडा दुष्काळ पडतो आहे. दरवर्षी कोणत्यातरी नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतीतून चांगले उत्पन्न मिळविणे कठीण झाले आहे. यामुळे कर्ज बाजारी झालेल्या शेतकरी आत्महत्याचा आकडा वाढलेला पाहायला मिळतो. Farmer
बँका मार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पिक कर्ज दिले जाते. शासनाने पिकाची निश्चित केलेली ‘पत’ काय आहे यावर शेतकऱ्यांना बँकेने किती पिक कर्ज द्यावे हे ठरत असते. राज्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर हे पाच जिल्हे प्रमुख बागायतदार म्हणून ओळखले जातात. ह्या पाच जिल्ह्यांच्या वाट्याला एकूण 64 हजार कोटींच्या पिक कर्जापैकी 33 टक्के म्हणजे 21 हजार कोटी रुपये जात आहेत. तर उर्वरित विदर्भ, मराठवाडयासह राज्यातील 31 जिल्ह्यातील शेतकरी तुटपुंज्या पिक कर्जावर शेतीचा गाडा ओढत आहे. तुटपुंज्या पिक कर्जात शेतीतून उत्पन्न काढू शकत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे. उपजीविका भागविण्यासाठी घरातील एखाद्या व्यक्तीला शहराच्या ठिकाणी कामाला जावे लागत असल्याचे परिस्थिती गावागावात निर्माण होत आहे. Farmer
कर्जाची मागणी करणाऱ्याचे उत्पन्न किती आहे यावर कर्ज देण्याची सर्वसाधारण पद्धत असते. मात्र पिक कर्ज देतांना हा नियम बँकांना मंजूर नसल्याचे आढळून येते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. तसेच ‘शेती’ हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशाची भूक भागवतो. परंतु कृषिप्रधान देशातच महाराष्ट्रातील ते पाच जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यातील अनेक बांधव सुविधांपासून वंचित दिसतो. शेतकऱ्याला सन्मानाने ‘बळीराजा’ म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात हा बळीराजा आर्थिकदृष्ट्या विवंचनेत असल्याचे चित्र आहे. Farmer
आता काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. खरीप हंगामासाठी बळीराजाच्या मानगुटीवर यंदाही ‘सिबिल’ चा फास आहेच. ‘सिबिल स्कोअर’ 650 पर्यत नसल्यास कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी नियमित फेड करणारे शेतकरी यामधून कदाचित सुटतील. पिक कर्जाची दरवर्षी नियमित फेड करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने अधिकाधिक खातेदार पिक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीयकृत बँका पिक कर्जासाठी पाहण्यात येणारा 650 सिबिल स्कोअर बारकाईने पाहतील यात मात्र तिळमात्र शंका नसल्याने पिक कर्जापासून अधिकाधिक खातेदार वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच पिक कर्ज कमी मिळते आणि त्यात अडचणींचा भर पडत असल्याने विदर्भ आणि मराठवाडयातील बळीराजा एकंदरीत दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे. Farmer
नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणामुळे वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना अशा अनेक आपत्तींचा विदर्भ आणि मराठवाडयातील शेतकऱ्यांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना ठेऊन पिक कर्जासोबत शेतीमालाला योग्य हमीभाव देणं, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्याचा लाभ त्यांना मिळवून देणं यावर भर द्यायला हवा. असे झाल्यास विदर्भ आणि मराठवाडवाड्यातील शेतकऱ्यांचेही जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते.
बागायती / कोरडवाहू पीक कर्ज
1) | द्राक्ष | : 3.20 लाख |
2) | कापूस | : 50 हजार |
3) | आंबा | : 1.55 लाख |
4) | तूर | : 35 हजार |
5) | ऊस | : 1.32 लाख |
6) | मका | : 30 हजार |
7) | डाळिंब | : 1.30 लाख |
8) | ज्वारी | : 29 हजार |
ते पाच बागायतदार जिल्हे
1) | अहमदनगर | :6890 कोटी |
2) | नाशिक | :4016 कोटी |
3) | पुणे | :4000 कोटी |
4) | सोलापूर | :3779 कोटी |
5) | कोल्हापूर | :3000 कोटी |