स्थानिक बातम्या

1 Breaking Fasting of Pardhi community members

अखेर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांच्या मध्यस्थीने पारधी समाज बांधवांचे उपोषण मागे !

Fasting of Pardhi community members : ज्वलंत समस्या घेऊन फासे पारधी समाजातील महिला-पुरुष उपोषणास बसले होते. सदर उपोषण प्रशासनाने मध्यस्थीने सोडविले.

मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यत तहसील कार्यालय सोड़नार नसल्याचे सांगत शेकड़ों पारधी समाज बांधवानी तहसील च्या आवारात आपला मुक्काम ठोकला होता !

ज्वलंत समस्या घेऊन तालुक्यातील अनिवासी फासे पारधी समाजातील शेकड़ों महिला आणि पुरुष मोर्चा धडकला होता लोणार तहसील कार्यालयावर !

अखेर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांच्या मध्यस्थीने पारधी समाज बांधवांचे उपोषण मागे !

राहुल सरदार, लोणार.जि.बुलढाणा.

लोणार :  भारत स्वातंत्र्य होऊन  ७५ वर्षे उलटून गेली तरी या  देशातील भटका विमुक्त असलेला फासे पारधी समाज विकासापासून आजही कोसो दूर आहे. ज्वलंत समस्या घेऊन लोणार तालुक्यातील अनिवासी फासे पारधी समाजातील शेकड़ों महिला आणि पुरुषांचा मोर्चा स्थानिक तहसील कार्यालय येथे धडकला होता. दरम्यान त्यांनी तहसीलदार गिरीश जोशी यांना निवेदन देऊन समाजाच्या समस्या सोडवण्याची मागणीही केली होती. (Fasting of Pardhi community members)

लोणार तहसील कार्यालयाचे तहसीलदार गिरीष जोशी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले होते की,  देशातील जाती व्यवस्थेत येथील पारधी समाज हजारो वर्षापासून भरडला जातोय. या देशातील जात व्यवस्थेने त्यांचे प्रचंड प्रमाणात शोषण केलेले आहे. अनेक वर्षांपासून पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेलेला आहे. तो आजही कायम दिसतो आहे. त्यामुळे या समाजाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन गुन्हेगारी म्हणूनच असल्याचा दिसून येतो. पारधी समाजला विकासाच्या संधी फारच कमी प्रमाणात मिळाल्याने त्यांच्यात विविध गोष्टीचा अभाव असल्याचे जाणवते. (Fasting of Pardhi community members)

Fasting of Pardhi community membersआदिवासी जातीत मोडणाऱ्यां पारधी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आढळते. पारधी समाजात दोन जाती मध्ये विभागला गेला आहे. त्यामध्ये फासे पारधी आणि गाय पारधी यांचा समावेश आहे.  सुविधेअभावी विस्थापित असलेल्या पारधी समाजाने देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपले रक्त सांडले, मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या समाजाच्या प्रगतीकडे शासन आणि प्रशासन स्तरावरून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का पडल्याने आजही त्यांच्याकडे समाज त्याच नजरेने पाहतो. (Fasting of Pardhi community members)

लोणार तालुक्यातील शारा सावरगाव मुंढे, गंधारी, खुरमपूर, किन्ही, गुंधा, आरडव, बीबी, पार्डां दराडे, कुंडलस, पांग्रा डोळे, सुलतानपूर, वढव, उदनापूर या लोणार तालुक्यातील गावांमध्ये पारधी समाजाचे लोक मागील तीस वर्षापासून रहात आहेत. उदरनिर्वाहसाठी कोणतेही प्रमुख असे साधन नसल्यामुळे तसेच शासनाने शिकारी वर बंदी आणल्याने त्यांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. शासकीय जमिनी उदरनिर्वाह करण्याकरता मिळाव्यात  जेणेकरून मुलाबाळांना शैक्षणिक प्रवाह आणण्याकरीता मदत होईल आणि कुटुंब विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल. (Fasting of Pardhi community members)

शासनाने राहण्यासाठी शासकीय जमिनी न दिल्याने शेकड़ों पारधी कुटुंबासहित तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन धडकले होते. दरम्यान त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याची मागनी केली. शासन पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवत असल्याचे सांगते. पण त्या योजना  प्रत्यक्षात कोठे आहेत. याची प्रचिती या वस्तीत गेल्यानंतर येते. (Fasting of Pardhi community members)

१) तालुक्यात पारधी समाजाचे सुमारे शंभर वर कुटुंबे विविध गावात वास्तव्यास आहेत. वर्षानुवर्षे ही कुटुंबे या ठिकाणी राहता असताना ही त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण झालेली  नाही. याला प्रशासकीय अनास्थाही जबाबदार आहे. पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणाची सोय प्रशासना कडून कधी केली गेली नाही. असा आरोप पारधी समाजाचा असून शिक्षणापासून कोसोदूर ते आहेत. त्यांना मराठी भाषा ही व्यवस्थित येत नाही.

Fasting of Pardhi community membersत्यांना अक्षर ओळख नसल्याने जगातील घडामोडींची माहिती मिळत नाही. आजचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे मानले जाते. या समाजाला याचा गंध देखील नाही. अतिशय मागसलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे जरुरीचे आहे.

२) फासे पारधी समाजातील नागरिकांकड़े कागदपत्रांचा अभाव असून फासे पारधी या समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने यांची जन्म,मृत्यू यांची कोठेच नोंद आढळत नाही. यांच्या जागा, जमिनी देखील कोठे असल्याच्या दिसून येत नाहीत. हा समाज कोण्या एका गावाचा रहिवाशी असल्याचे देखील दिसून येत नाही. त्यांच्यात शिक्षणाचा अभाव असल्याने आणि त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. यासाठी शासनाने पावले उचलावीत. (Fasting of Pardhi community members)

३) शासनाची उज्ज्वला योजना हि  येथे पोहचलीच नाही. शासनाने धूर मुक्त देश करण्यासाठी देशातील प्रत्येक कुटुंबाला उज्वला योजनेमार्फत गॅस चे वाटप केले. देशातील अनेक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु तालुक्यातील पारधी समाजाकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने येथील कुटुंबे उज्वला योजनेपासून वंचित राहिली आहेत. येथील महिला आजही उघड्यावर लाकडाच्या शेगडीवर स्वयंपाक करताना दिसतात. (Fasting of Pardhi community members)

उघड्यावर स्वयंपाक करत असल्याने त्यांना उन्हं, वारा,पाऊस,थंडी यांचा सामना करावा लागतो. त्यांनी त्यांच्या गाई बेला सह लहान मूल पुरुष- महिला -अबाल -वृद्ध सह अजीसपूर फाट्या पासून लोणार तहसील पर्यंत आम्हला न्याय द्या अश्या घोषणा देत शांततेत मोर्चा काढला होता.

मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यत तहसील कार्यालय सोड़नार नसल्याचे सांगत, शेकड़ों पारधी समाज बांधवानी लोणार तहसील कार्यालया च्या आवारात आपला मुक्काम ठोकला होता. काही पारधी समाज बांधव यांनी तहसील परिसरात विविध मागण्या सह उदरनिर्वाह साठी शेत जमीन मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. (Fasting of Pardhi community members)

Fasting of Pardhi community members20 फेब्रुवारी 2024 रोजी तालुक्यातील शारा, सावरगाव मुंढे, गंधारी, खुरमपूर, किन्ही, गुंधा, आरडव, बीबी, पार्डां दराडे, कुंडलस,पांग्रा डोळे, सुलतानपूर, वढव, उदनापूर या गावातील फासे पारधी कुंटूबातील महिला-पुरुष यांनी आपल्या न्यायिक मागण्यांसाठी लोणार तहसिल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. (Fasting of Pardhi community members)

यावेळी शेषराव पवार,नाना पवार, ऋषीकपूर पवार, विशाल पवार, सुधीर पवार, हारिष चव्हाण, राजू पवार, अनिल पवार, सुभाष शिंदे, कोहिनूर शिंदे, दगडू भोसले, भीमा भोसले, राजेंद्र शिंदे, विठ्ठल पवार, बन्शी पवार, संजय पवार, देवदास भोसले,राजू पवार,लैला पवार, मंदा पवार, कल्पना पवार, शारदा पवार, गीता पवार, पंचफुला भोसले, रेखा पवार, वर्षा पवार,संगीता पवार हे उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. दरम्यान संबधित प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी वेळोवेळी उपोषण सोडविण्यासाठी गेले असता उपोषणकर्त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचे सांगितले.

त्या अनुषंगाने लोणार तहसिलचे  तहसीलदार गिरीष जोशी यांनी हि बाब बुलढाणा जिल्हाधिकारी यांना सांगितली. बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी नव्यानेच रुजू झालेले मेहकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांना लोणार येथील उपोषणकर्त्यासोबत चर्चा करण्यासाठी दिनांक 22 फेब्रुवारी 2024  रोजी  पाठविले.

Fasting of Pardhi community membersउपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांनी  प्रशासकीय सेवेदरम्याण धारणी, मेळघाट येथील आदिवासी बांधव, पारधी समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले होते. त्या आपल्या सेवेदरम्यानचा अनुभव व कौशल्य वापरत उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांनी उपोषणकर्त्यांना शासनाच्या व एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या योजना सविस्तरपणे समजावून सांगितल्या. तसेच पारधी समाज बांधवाना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेत त्यांना शिधापत्रिका व अंत्योदय योजनेमधील लाभ देण्यासाठी महसूल प्रशासन तत्पर असल्याचे सांगितले.

त्याच बरोबर घरकुलाचा प्रश्न संबंधित कार्यालय व विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करून सोडविण्याचे हि मान्य केले. तसेच पारधी समाज समाजातील विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबीसाठी आवश्यक असणारे जातीचे दाखले व इतरही कागदपत्रे तात्काळ विशेष मोहीम राबवत देण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले.

फासे पारधी समाजाची प्रामुख्याने मागणी असणारे शासनाच्या ई क्लास जमिनीबाबतच्या मागण्या शासन दरबारी मांडत याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे सुद्धा उपोषणकर्त्यांना सांगत त्यांना थंडपेय देत उपोषण  सोडविले.

यावेळी मेहकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, लोणार तहसीलदार गिरीष जोशी, नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, योगेश्वरी परळीकर, लोणार पो.स्टे. चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, मेहकर उपविभागीय कार्यालयाचे कैलास मुरकुट, मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सानप, तलाठी अशोक सौदर, सचिन शेवाळे, लोणार पो.स्टे.चे लेखानिक गणेश लोढे, विशाल धोंडगे, गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप मापारी पाटील, महसूलचे प्रस्तुतकार 1 पुरुषोत्तम आघाव, किशोर मादनकर यांचेसह महसूल व पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. (Fasting of Pardhi community members)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button