महाराष्ट्र

1 Breaking Former Chief Minister Manohar Joshi

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, राजकीय वर्तुळावर पसरली शोककळा !

Former Chief Minister Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024  रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. यामुळे राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली.

माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन !

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 23 फेब्रुवारी 2024  रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. दिनांक  21 फेब्रुवारी 2024  रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 23 फेब्रुवारी 2024 ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. (Former Chief Minister Manohar Joshi)

Manohar Joshi महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ ची स्थापना, 1976 ला मुंबईचे महापौर, मार्च 1990  ते डिसेंबर 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च 1995  ते जानेवारी 1999  या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर 99  ते मे 2002  केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे 2002  ते ऑगस्ट 2004  लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.

(Former Chief Minister Manohar Joshi)

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती. (Former Chief Minister Manohar Joshi)

ऑक्टोबर  2013 च्या शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, त्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषय, त्यावर केलेली टिप्पणी यामुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले होते. राज्यात आणि केंद्रात अनेक पदे भूषवणाऱ्या शिवसेनेच्या जोशी सरांचं आयुष्य संघर्षमय राहिले. रायगड जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेले मनोहर जोशी यांचा मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास जवळपास सर्वानाच माहित आहे. मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937  रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांचं आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकीतून मागून कुटुंबाला हातभार लावला. (Former Chief Minister Manohar Joshi)

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं चौथीपर्यंतच शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाजन बाईंकडे होती. पुढे मनोहर जोशी 11 वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर किर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली.

(Former Chief Minister Manohar Joshi)

शिक्षण सुरू असतानाच मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून काम सुरू केले. पुढे वयाच्या 27 व्या वर्षी एम.ए, एल.एल.बीची पदवी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी यांनी वयाच्या 72 व्या वर्षी पीएच.डी पूर्ण केली. शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास  या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी मिळवली होती. पुढे डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही मानद पदवीही प्रदान करण्यात आली होती.

Manohar Joshi मनोहर जोशी यांचं 1964 मध्ये अनघा यांच्या बरोबर विवाह झाला. एक मुलगा आणि दोन मुली असं त्यांचं कुटुंब आहे. मनोहर जोशी यांचा पिंड व्यवसायिकाचा होता. दूध, फटाके विक्री, हस्तीदंती वस्तूंची विक्री असे व्यवसाय त्यांनी केले. त्यातील काही बुडाले. पुढे 2 डिसेंबर 1961 मध्ये नोकरी सोडून त्यांनी कोहिनूर या नावाने क्लासेस व्यवसाय सुरू केला. याचेच पुढे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट झाले. त्याच्या भारतात 70 शाखा आहेत.

 

(Former Chief Minister Manohar Joshi)

बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले. 1967 पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. दोन वेळा ते नगरसेवक राहिले. नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदचे आमदार राहिले. पुढे 1976 मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले. पुन्हा त्यांची पाऊले राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढे ते 1990-91 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

महाराष्ट्रात 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना  मुख्यमंत्री केले. ते 1999 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांना एका प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. मनोहर जोशी राज्याच्या राजकारणातून नंतर केंद्रात गेले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बनले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 2006 ते 2012 या काळात खासदार असताना त्यांनी विविध समित्यांचं काम केलं. (Former Chief Minister Manohar Joshi)

मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातल्या नांदवी या गावी झाला. महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, तीन वेळा विधानपरिषद सदस्य, मुंबईचे महापौर, दोन वेळा विधानसभा सदस्य, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री, लोकसभा सभापती,  राज्यसभा खासदार अशा विविध राजकीय भूमिकेत ते  दिसले.  1967 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी शिवसेना पक्षासाठी वेचलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता. (Former Chief Minister Manohar Joshi)

1995 मध्ये शिवसेना- भाजप युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री झाले. वयाच्या 72 व्या वर्षी  त्यांनी शिवसेनेवर विश्लेषणात्मक अभ्यास करुन पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली. मराठी तरुणांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण मिळून ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी ‘कोहिनूर’ ही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली. नंतर ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. सर या नावाने परिचित असलेले जोशी यांच्याबद्दल प्रत्येकालाच आदर आणि जिव्हाळा  वाटत असे.

Manohar Joshi 1999 च्या जानेवारीचा शेवटचा आठवडा… शिवसेना-भाजपा युतीचं सरकार…. ‘वर्षा’ आणि ‘मातोश्री’ बंगल्यांमधला तणाव अगदी टोकाला गेलेला. वर्षा बंगल्यातल्या मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’मध्ये राहाणाऱ्या साहेबांकडून एक मोजक्या शब्दांतला संदेश आला आणि मनोहर जोशी यांनी आपलं पद सोडलं…. वरवर गिरीश व्यास प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला, असं चित्र उभं राहिलं तरी दोन्ही सत्ताकेंद्रांत त्याआधीपासून संघर्ष होत होताच. त्यातलं एक केंद्र होतं मुख्यमंत्र्यांचं आणि दुसरं होतं त्यांच्या पक्षप्रमुखांचं.

(Former Chief Minister Manohar Joshi)

साधारणतः प्रादेशिक पक्षांमध्ये एखाद्या राज्याची सत्ता आली की त्या पक्षाचे प्रमुखच मुख्यमंत्री होतात. पण महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार 1995 साली आल्यावर असं झालं नाही. युतीतला तेव्हा जास्त संख्याबळ असणारा पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री होण्याऐवजी ते पद दुसऱ्या नेत्याला द्यायचं ठरवलं. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोन नेत्यांपैकी हा मान मनोहर जोशी यांना मिळाला. उपमुख्यमंत्रिपदी भाजपाचे गोपिनाथ मुंडे झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे सरकारचे ‘रिमोट कंट्रोल’ होण्याचा निर्णय घेतला. (Former Chief Minister Manohar Joshi)

मनोहर जोशी यांना जावई गिरीश व्यास यांच्या मदतीसाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याच्या आरोपामुळे पद सोडावं लागलं होतं. 1995 साली विधानसभेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीला सरकार स्थापन करता आलं. शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सेना भाजपाच्या नेता निवडीच्या आदल्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी, “मला ऊठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा आहे! मुख्यमंत्री कोणीही होवो, सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती राहाणार आहे!” त्यामुळे महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्रं तयार होणार आणि या केंद्रांमध्ये वादाच्या ठिणग्या उडत राहाणार याचे संकेत मिळाले होते. (Former Chief Minister Manohar Joshi)

मनोहर जोशी यांनी अंतर्गत स्पर्धेतून मुख्यमंत्रीपद मिळवलं असलं तरी त्यांची पुढची वाटचाल तितकी सोपी नव्हती. एकाबाजूला युतीचं सरकार, दुसरीकडे निवडणुकीत दिलेली आव्हानात्मक आश्वासनं पूर्ण करणं आणि शिवसेनाप्रमुखांच्या अपेक्षा पूर्ण करणं अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्याकडे होती. युतीमधल्या भाजपालाही त्यांना सांभाळायचं होतं. शिवसेनाप्रमुखांशी त्यांचे अधूनमधून वादाचे प्रसंग उद्भवू लागले. ‘जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ या पुस्तकामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी दोघांमधील तणावाच्या प्रसंगाची तपशीलवार माहिती दिली आहे. (Former Chief Minister Manohar Joshi)

दाभोळमधील वीज प्रकल्पाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं दशक ढवळून काढलं. त्याचा राजकीय मुद्दा झालाच तर तो प्रकल्प रद्द करू असं युतीने आपल्या प्रचारसभांमध्ये सांगितलं होतं. या मुद्द्यांवर घडलेली एक घटना शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादाची ठिणगी ठरली. युतीचे सरकार आल्यावर एन्रॉन अरबी समुद्रात बुडवला जाऊ नये म्हणून त्या कंपनीच्या भारतातील प्रमुख रिबेका मार्क मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भेटायला येणार होत्या. मात्र, त्या उशिरा आल्यामुळे मुख्यमंत्री जोशींनी संतापून ती बैठकच रद्द केली. वास्तविक रिबेका मार्क त्याचवेळेस मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत होत्या. या वादाचं वर्णन करताना प्रकाश अकोलकर लिहितात, “या घटनेतून विपरित अर्थ काढण्यात आला. रिबेका मार्क ठाकरे यांना भेटल्या म्हणून मनोहर जोशी संतापले अशा रितीने सारी कहाणी ठाकरे यांच्यापुढे सादर करण्यात आली. त्यातून मोठं वादळ निर्माण झालं.”

(Former Chief Minister Manohar Joshi)

Manohar Joshi बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे सांताक्रूझला राहात होते. जयदेव राहात असलेल्या इमारतीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या इमारतीवर छापा टाकला. आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री, आपणच रिमोट कंट्रोल असताना असं घडणं शिवसेनाप्रमुखांना त्रासदायक वाटलं असणार. परंतु त्यावेळेस मुख्यमंत्री मुंबईबाहेर असल्यामुळे ते यातून बाहेर पडू शकले. मुख्य सचिव शरद उपासनी यांच्या जागी दिनेश अफजलपूरकर यांचीच नेमणूक व्हावी यासाठी शिवसेनाप्रमुख प्रयत्नशील होते असं अकोलकर लिहितात. अशाप्रकारचे अनेक तणावाचे प्रसंग दोघांमध्ये उभे राहिले. अनेकदा मुख्यमंत्री बदलले जाणार अशी चर्चा व्हायची. मग दोन्ही नेत्यांची मातोश्रीवर चर्चा व्हायची आणि वादावर पडदा पडायचा. म्हणजेच मनोहर जोशी यांना मिळालेल्या चार वर्षांच्या काळात ही स्थिती कायम राहिली होती. (

Former Chief Minister Manohar Joshi)

याच काळात रमेश किणी मृत्यू प्रकरण, अणा हजारे यांच्या आंदोलन, मंत्री शशिकांत सुतार यांना राजीनामा द्यावं लागणं, नैसर्गिक संकटं अशा अनेक वादळांचा मनोहर जोशी यांना ‘सामना’ करावा लागला. जानेवारीच्या 1999 च्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांनी बहिष्कार टाकला होता. या सगळ्या धामधूमीत 1998 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं. गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. (Former Chief Minister Manohar Joshi)

मनोहर जोशी यांना आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा देऊनच मला भेटायला या, असा निरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवला आणि मुख्यमंत्री बदलण्यात आले. मनोहर जोशी यांच्यानंतर शिवसेनेचे नारायण राणे युती सरकारचे दुसरे मुख्यमंत्री झाले. नारायण राणे यांनी आपल्या ‘नो होल्ड्स बार्ड’ या पुस्तकात मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याआधीच्या काळाचं वर्णन केलं आहे. ‘मनोहर जोशी स्वतःला वेगळं सत्ताकेंद्र मानत आहेत’ अशी भावना साहेबांच्या मनात निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलं असं राणे लिहितात. (या पुस्तकाच्या प्रियम गांधी-मोदी सहलेखिका आहेत) (Former Chief Minister Manohar Joshi)

‘1995-1997 या काळात साहेबांनी जोशींच्या नेतृत्वातील सरकारमधील गरज नसलेल्या लालफितशाहीवर सामनातून टीका केली होती. 1998 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा 33 वरुन 10 वर आल्यावर युतीचे सरकार टिकण्यासाठी जोशीजींना पदावरुन काढणे गरजेचे असल्याचं त्यांना वाटू लागलं’, असं राणे यांनी लिहिलं आहे. राणे पुस्तकात सांगतात, “एका रात्री बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला मातोश्रीवर बोलावून घेतले. तेथे उद्धवजीही उपस्थित होते. तेव्हा साहेब स्पष्टपणे म्हणाले, जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर तू सरकार चालवणार का? मी म्हणालो, साहेब फक्त चालवणार नाही, दौडवणार.”

राणे पुढं लिहितात, दुसऱ्या दिवशीही साहेबांनी हाच प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही नेहमी जोशीजींच्या जागी मला घेण्याचं बोलता पण कधीही शेवटचा निर्णय घेत नाही असं का? तेव्हा त्यांनी आपले सचिव आशीष कुलकर्णी यांना बोलावून पत्राचा मजकूर सांगितला. (Former Chief Minister Manohar Joshi)

ते पत्र असे होते. (नारायण राणे यांनी पुस्तकात लिहिलेल्या पत्राचा मराठी अनुवाद येथे देत आहोत.)

श्री. मनोहर जोशी.

मा. मुख्यमंत्री

महाराष्ट्र

प्रिय मुख्यमंत्री,

तुम्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. कृपया त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.

आपला सादर,

बाळ ठाकरे

(Former Chief Minister Manohar Joshi)

‘निर्णयांवर ठाम पण पक्षशिस्त पाळणारे’

मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे शिवसेनाप्रमुखांशी कसे संबंध राहिले याबद्दल ज्येष्ठ पत्रकार महेश विजापूरकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

Manohar Joshi विजापूरकर म्हणाले, “मनोहर जोशी सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेत असल्यामुळे त्यांना शिवसेनाप्रमुख आणि पक्षाचा स्वभाव परिचित होता. मुख्यमंत्री झाल्यावरही ते अनेकदा पक्षप्रमुखांना भेटत असत. त्यांनी पर्यायी किंवा समांतर सत्ताकेंद्र तयार होण्यासाठी कधीही प्रयत्न केल्याचं मला जाणवलं नाही, फक्त घटनात्मक पदावर नेमणूक झाल्यावर त्या पदाचा सन्मान राखला जावा अशी त्यांची अपेक्षा निश्चित होती. (Former Chief Minister Manohar Joshi)

युतीची सत्ता आल्यावर थोड्याच काळात शिवसेनाप्रमुखांनी बांगलादेशी लोकांना शोधण्याचे आदेश दिले, मात्र मुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर बसलेल्या मनोहर जोशी यांनी त्यासाठी योग्य कायदेशीर मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे अशी भूमिका घेतली. त्यानंतर एन्रॉनच्या रिबेका मार्क आपण मंत्रालयात वाट पाहात असूनही आधी मातोश्रीवर जाणं त्यांना घटनात्मक पदाचा अवमान करणारं वाटलं. मनोहर जोशी पक्षाची शिस्तही पाळायचे आणि मुख्यमंत्री म्हणून आपल्या निर्णयावर ठामही असायचे.”

महेश विजापूरकर यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनीही याबद्दल आपले मत सांगितले. ते म्हणाले, मनोहर जोशी यांना आपल्या पदाचा सन्मान राहावा असं वाटायचं. ते मुख्यमंत्री झाल्यावर खरी सत्ता त्यांच्या हातात गेली. सर्व कामांसाठी लोक त्यांच्याकडे जाऊ लागले. नेता कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार जरी शिवसेनाप्रमुखांकडे असला तरी सत्ता चालवण्याचा अधिकार त्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडे गेला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद होणं साहजिक होतं. (Former Chief Minister Manohar Joshi)

“बाळासाहेबांच्या निधनानंतर एका दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांना व्यासपीठ सोडू जावं लागलं होतं. याबद्दल लोकसत्तेच्या आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात त्यांनी आपलं मुख्यमंत्रिपद गेलं तेव्हा काय वाटलं होतं, हे सुद्धा सांगितलं होतं. ते म्हणाले होते,”1999 साली अशाच एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला. (Former Chief Minister Manohar Joshi)

1995 साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाली. उद्धव यांचेही माझ्यावर प्रेम आहे. तथापि वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन गॅपही असू शकते. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो.”

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button