1 Breaking : Honor : महिलांचा व मुलींचा सत्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिम्मित लोणार शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Honor : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निम्मित अनेक छोट्या मुलींनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती.
Honor : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
किशोर मापारी, मुख्य संपादक, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले नगर लोणार येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महात्मा फुले मंडळ यांच्या वतीने नवीन पिढीतील मुला- मुलींना चांगल्या सत्कार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सामाजिक, शैक्षणिक, वैयक्तिक, प्रशासकीय क्षेत्रातील उच्च कामगिरी करणाऱ्या महिलांचा व मुलींचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान उत्तर देणाऱ्या विद्यार्थिनीला भेट वस्तू देण्यात आल्या. लोणार येथील महिला नगरसेवक, वन, कृषी, महसूल, पंचायत समिती, शिक्षिका, आध्यात्मिक, साहित्यिक, व्यावसाईक व इतर सर्वच क्षेत्रातील महिला यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अनेक छोट्या मुलींनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा ही केली होती.
सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या विद्यार्थीनीनी क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आधारित अशी नाटिका सादर केली . इतर अनेक कार्यक्रम या वेळी पार पडले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसुधारक उषा फड या तर माजी नगरसेविका वत्सला जगदीश खरात, सिंधु गजानन जाधव, वंदना अरुण जावळे तसेच महिला शिक्षिका कविता काळुसे, सुनीता अनिल मापारी, ममता गेलडा, अंजली काळे, ज्योती सुरडकर तर वनविभागातून मनीषा जयराम ठाकरे, शुभांगी अजय हाडोळे यांना ही सन्मानित करण्यात आले. (Honor)
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार देऊन झाली. प्रास्ताविक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन रामदास कापुरे तर सुत्रसंचालन महिला तालुका अध्यक्ष डॉ. अनुपमा प्रदीप झोरे यांनी केले. इतर मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले. नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर सतीष कापुरे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी समता परिषदचे गजानन घोडके, रंजीत जावळे, नारायण अढाव, गजानन खरात, करण इरतकर, गजानन जाधव, शाम राऊत, गोपाल जाधव तसेच राजू जाधव, सर्पमित्र विनय कुलकर्णी, पत्रकार संघाचे उमेश कुटे, रिंढे सर, अक्षय मोरे, आशुतोष मोरे, गजानन शिंदे, डॉ.प्रदीप झोरे तर महिला समता आघाडी च्या सविता अवचार, गंगा खराडे, भावना कापुरे, वैशाली खांदेभराड, पूजा पूजा झोरे, शीतल राऊत, मंजू खरात, अश्विनी जाधव व इतर समता सदस्य उपस्थित होते. (Honor)