1 Breaking Hostel,आ.संजय गायकवाड यांची संकल्पना
बुलढाण्यात साकारणार के.जी. ते पी.जी. करिता अत्याधुनिक वस्तीगृह!
Hostel : बुलढाण्यात अत्याधुनिक वस्तीगृह उभे राहणार असून सदर वस्तीगृहाचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील सत्रापासून घेता येणार. वस्तीगृह बांधणारे ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असल्याने चर्चा.
आमदार संजय गायकवाड यांची संकल्पना..
Hostel बुलढाण्यात साकारणार के.जी. ते पी.जी. करिता अत्याधुनिक वस्तीगृह!
महाराष्ट्रात प्रथमच नगरपालिका अंतर्गत निर्माण होणार वस्तीगृह..
किशोर मापारी, लोणार न्यूज , एडीटर.(www.lonarnews.com)
बुलढाणा जिल्ह्यातील गरीब शेतकरी मजूर यांच्या केजी ते पीजी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची सोय व्हावी याकरिता बुलढाणा विधानसभा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून लवकरच बुलडाणा शहारात अत्याधुनिक वस्तीगृह आकार घेणार आहे. सदरचे वस्तीगृह हे नगरपालिका अंतर्गत निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एखाद्या नगरपालिकेअंतर्गत निर्माण होणारे हे पहिलेच वस्तीगृह असल्याने सदर विषय चर्चेचा बनला आहे. Hostel
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या व विषय त्यांनी मार्गी लावले आहेत. बुलढाणा सारख्या ठिकाणी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय तसेच नगरपालिकांच्या शाळा या सीबीएससी पॅटर्नमध्ये सुरू करून दाखविले आहे. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची नवी ओळख एज्युकेशन हब अशी होत आहे.
बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून अठरापगड जातीच्या मुलांसाठी नर्सरी केजी-1 ते केजी-2 व सीबीएससी याचे शिक्षण सुरू केले आहे. परंतु ग्रामीण भागातील जनतेला या शिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे इच्छा असून सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी सदर सीबीएससी शाळेचा लाभ घेऊ शकत नव्हते. याची आमदार संजय गायकवाड यांना नेहमीच खंत वाटत असल्यामुळे त्यांनी पश्न मार्गी लावण्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत पाठपुरावा केला.
बुलढाणा शहरात विशिष्ट समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची व्यवस्था आहे. मात्र ते नादुरुस्त व अपूर्ण असल्याने अनेक विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकत नव्हते. सदर विषयाचे गांभीर्य पाहता आमदार संजय गायकवाड यांनी हा विषय देखील मार्गी लावण्याचा चंगच बांधला आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषद वितरित केलेल्या जाणाऱ्या निधीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या जुन्या आणि वितरण जागेजवळ 03 कोटी रुपयांच्या वस्तीगृहास मंजुरात मिळून दिली आहे. या ठिकाणी मुला-मुलींकरिता सदरचे वस्तीगृह उभे राहणार आहेत.
सदर कामासाठी विविध टप्प्यात तब्बल 06 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निधीतून अत्याधुनिक वस्तीगृह उभे राहणार असून सदर वस्तीगृहाचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील सत्रापासून घेता येणार आहे. अशा प्रकारचे वस्तीगृह बांधणारे ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असल्याने चर्चा होत आहे. Hostel