राजकीयस्थानिक बातम्या

1 Breaking In politics every thing is possible

लोकसभा निवडणूक : निवडणूक नेत्यांची, गोची कार्यकर्त्यांची!

In politics ‘every thing is possible’! : लोकसभा निवडणुक जरी नेत्यांची निवडणुक समजली जात असली तरी कार्यकर्त्यांची मात्र गोची होणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

In politicsलोकसभा निवडणूक : निवडणूक नेत्यांची, गोची कार्यकर्त्यांची!

लोणार : किशोर मापारी : लोणार तालुका तसा राजकीय दृष्ट्या संवेदनशील नसलेला कदाचित जिल्यातील एकमेव तालुका असेल, कारण लोणार तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते कधीही टोकाचे राजकारण करीत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे.  परंतु यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने  लोणार तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच गोची होतांना दिसते आहे.  यावर्षीची निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे. कारण मुख्य प्रवाहात असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना या पक्षात उभी फूट झाल्यावर तालुक्यात सुद्धा या पक्षाचे दोन शकले झालेली आहेत.

In politics ‘every thing is possible’!

इंडिया आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे कार्यकर्ते प्रा.नरेंद्र खेडेकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र प्रा.नरेंद्र खेडेकर हे  भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस मध्ये असताना जिल्हा परिषदचे अध्यक्षपद भोगल्यानंतर परत शिवसेना वाशी झाले होते त्यांचे सहयोगी असलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस कार्यकर्ते मात्र विसरलेले नाहीत. त्यामुळे ज्या निष्ठेचा विचार करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा.नरेंद्र खेडेकर यांना तिकीट दिले तीच निष्ठा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे कार्यकर्ते मात्र कितपत स्वीकारतील, हा मोठा प्रश्न तालुक्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यासमोर असल्यामुळे प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा प्रचार करताना त्यांची चांगलीच गोची होणार असल्याचे चित्र आहे.

In politics ‘every thing is possible’!

In politicsतिकडे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट सध्या महायुती सोबत असल्यामुळे विद्यमान खा.प्रतापराव जाधव यांचा प्रचार करण्याची वेळ त्यांच्याच विरोधात तीन वेळा लोकसभा गमावणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा आक्रमक प्रचार करणारे रविकांत तूपकर यावेळी मैदानात आहेत. मात्र डॉ.राजेंद्र शिंगणे हे  उमेदवार प्रतापराव जाधव यांचा आक्रमक प्रचार करीत आहेत हे विशेष! यामुळे तीनवेळ प्रतापराव जाधव यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना यावेळी प्रतापराव जाधव यांच्या साठी मत मागताना चांगलीच गोची होणार हे नक्की!

In politics ‘every thing is possible’!

In politicsलोणार तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते “निवडनुक काळा पुरते प्रतापराव जाधव जवळ करतात आणि निवडणुक संपली की अडगळीत टाकून देतात” असे नेहमीच म्हणत असतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्ताना यावर्षी पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांचाच प्रचार करावा लागणार असून आपली “दुखरी नस अजून ठणकत” असताना सुद्धा नाईलाजाने का होईना महायुतीच्या  उमेदवाराला प्रंचड मतांनी निवडून आणायला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचीही होणार आहे गोची असेच म्हणावे लागेल. अशा पद्धतीने लोकसभा निवडणुक जरी नेत्यांची निवडणुक समजली जात असली तरी लोणार तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मात्र गोची होणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

In politics ‘every thing is possible’!

राजकारणात ‘एव्हरी थिंग ईज पॉसीबल’ !

राजकारणात तीन गोष्टी नेहमी प्रकर्षाने दिसून येतात. एक कोणीही कोणाचा नसतो, दुसरी गोष्टी ‘एव्हरी थिंग ईज पॉसीबल’ अर्थात अशक्य काहीच नसते आणि तिसरी व सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणीही कोणाचा नेहमीसाठी शत्रू वा मित्र नसतो. हे सूत्र म्हणा अथवा तीन स्तंभ यावरच राजकारण अवलंबून असते नव्हे यावरच राजकारणाचा डोलारा उभा असतो. यातीलच शत्रू वा मित्र नसणे ही बाब सध्या अगदी केंद्रापासून ते थेट स्थानिक पातळीवरील सत्ताकेंद्रे हाती घेतलेल्या युतीत दिसून येत आहे.

काही वर्षापूर्वी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान शिवसेना व भाजपा युतीत लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण? यावरून झालेले रंणकंदन आणि त्यानंतर दिलजमाई होवूनही सत्तास्थापनेनंतर पूर्वी लहान भावाच्या भूमिकेत असलेली भाजपा आता मोठय़ा भावाच्या भूमिकेतून शिवसेनाला देत असलेली सावत्रपणाची वागणूक केंद्रासह राज्यपातळीवर दिसून येत असताना त्याचे लोण स्थानिक पातळीवर पोहणार नाही तर नवलच म्हणावे लागेल.

In politics ‘every thing is possible’!

येवून ठेपलेल्या निवडणुकांच्या माध्यमातून पक्षबळकटीला असलेला वाव पाहता स्थानिक पातळीवरील राजकारणातही युतीमध्ये सोशल मीडिया वर मार्मिक भाष्य करत तु-तु, मै-मै होत आहे. युती आणि आघाडी या दोहोमंध्ये सध्या मित्र कोण व शत्रू कोण याची सीमारेषाहि पुसट होत चालली आहे. जेव्हा सेना-भाजप युती झाली तेव्हा शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भाऊ होता. काळाच्या ओघात आता मात्र नेमके याउलट झाले आहे. मात्र याचा प्रतापराव जाधव यांना काही फरक पडलेला नसल्याचे त्यांना मिळालेल्या उमेदवारीवरून दिसत आहे. त्यांच्या विरोधात राजकिय टिका करणारे आता त्यांच्याच प्रचार करणार असल्याने लोणार तालुक्यात त्यांना लिड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In politics ‘every thing is possible’!

लोणार नगर परिषद वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने लोणार शहरावर काँग्रेस चा चांगला प्रभाव असल्याचे दिसून येते. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जुने पदाधिकारी, कार्यकर्ते नव्याने दमाने तालुक्यात सक्रिय झाल्याने याचा लोकसभा निवडणुकीत निश्चित फरक पडेल, असे मतदारांच्या समाज माध्यमांवर आणि पारा खालच्या चर्चे वरून दिसत आहे. उमेदवारी भरण्याच्या शुभारंभाला का होईना, महायुतीतील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळाली आहे. येथून खासदार प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा निवडणूक लढविणार आहे.

In politics ‘every thing is possible’!

In politicsमहायुतीतर्फे प्रतापराव जाधव हे उमेदवार असून शिंदेगटाच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव आहे. मागील 3 लढतीत सलग विजय मिळविणारे जाधव चौथ्यांदा मैदानात उतरणार आहे. 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीत जाधव यांनी आघाडीला एकहाती धूळ चारली होती. यात दोनदा त्यांनी माजी मंत्री, सहकार नेते राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या प्रबळ उमेदवाराला आस्मान दाखविले.

मागील 2019 च्या लढतीत प्रतापराव जाधव यांनी विजयाची ‘हॅटट्रिक’ केली होती. त्यांनी जळगाव-खान्देशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराम नागो राणे यांच्या सलग 3 विजयाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. राणे यांनी 1957, 1962 आणि 1967 मध्ये ही किमया केली होती. या दोघा नेत्यांनीच आजवरच्या काळात सलग तीनदा विजयी होण्याचा भीम पराक्रम केला आहे. आता चौथ्यांदा जाधव मैदानात उतरणार असून यंदा प्रथमच त्यांचा प्रतिस्पर्धी आघाडीऐवजी शिवसेना (उबाठा) राहणार आहे.

जाधव यांनी उमेदवारीबद्दल मुख्यमंत्री व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले. मागील 15 वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

In politics ‘every thing is possible’!

मतदानासाठी मिळणार भरपगारी सुट्टी आणि सवलत !

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी किंवा काही ठिकाणी In politicsकामाच्या तासांत योग्य सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेऊन अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडील परिपत्रकानुसार आदेश देण्यात आले. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी /कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात येणार आहे.

In politics ‘every thing is possible’!

मतदानाच्या दिवशी देण्यात येणारी सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यांना लागू असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मतदारांना मतदानाकरिता योग्य ती सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता न येणे शक्य झाले नाही, अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

In politics ‘every thing is possible’!

https://youtube.com/@LonarNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button