महाराष्ट्र

1 Breaking Indian Railways विदर्भ,मराठवाडा..!

Indian Railways विदर्भ, मराठवाड्यात वंदे भारत एक्सप्रेस धावणार !

Indian Railways वंदे भारत एक्सप्रेसची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता पाहता आता देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला लॉन्च केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे मुंबईला देखील काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.

सध्या मुंबईतून चार वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या चार मार्गांवर ही गाडी सूरु आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर देखील Indian Railways भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचे संचालन सुरू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते जालना या मार्गावर या चालू वर्षाखेरपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते. खरे तर महाराष्ट्राची  राजधानी असलेल्या मुंबईत मराठवाड्यातून रोजाना हजारोंच्या संख्येने नागरिक दाखल होत असतात. कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

 Indian Railwaysमराठवाड्यातून मुंबईला येणाऱ्यांची हीच संख्या लक्षात घेता आता या मार्गावर  वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जालना जिल्ह्यासहित मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांना मोठा फायदा आणि नवीन संधी निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत.

यामुळे मराठवाड्याला पर्यटन, कृषी, शैक्षणिक अशा विविध विभागात प्रगती करण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात . खरे तर Indian Railways भारतीय रेल्वेकडून अलीकडे ज्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत, त्या वंदे भारत एक्सप्रेस फक्त आठ डब्यांच्या आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात होती. मात्र नंतर डब्यांची संख्या कमी झाली आणि आता अधिकतर आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला देखील फक्त आठच डबे आहेत. यामुळे मुंबई ते जालना दरम्यान सुरू होणाऱ्या या गाडीला किती डब्बे राहणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हायस्पीड ट्रेनला फक्त आठ डबे राहणार आहेत.

म्हणजेच या मार्गावर फक्त आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. मुंबई ते जालना रेल्वे मार्गावर सुरू असलेली बहुतांशी कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ही हाय स्पीड ट्रेन येत्या काही दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते असे मत व्यक्त केले जात आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. तथापि Indian Railways  रेल्वे विभागाकडून या गाडीच्या उद्घाटनाची तारीख अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही. यामुळे ही गाडी यावर्षी अखेरपर्यंत खरंच सुरू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

मागील काही वर्षांमध्ये रेल्वेचा प्रवास करताना अनेकांना आरक्षित तिकिट मिळवण्यासाठी खटपट करावी लागत आहे. अनेकांचे तिकिट कन्फर्म (Confirm Ticket) होत नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. सणासुदीच्या काळात आणि सुट्टीच्या दिवसात कन्फर्म तिकिट मिळणे मोठं जिकरीचे असते. आता वेटिंग लिस्टची (Waiting List) झंझट संपवण्यासाठी Indian Railways रेल्वेने एक योजना तयार केली आहे. त्यासाठी रेल्वे एक लाख कोटींचा खर्च करणार असल्याचे वृत्त आहे.

 Indian Railwaysनववर्ष सुरू होण्यापूर्वीच पुणेकरांना मोठी भेट मिळाली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे नववर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे विभागाने पुण्याहून विदर्भाकडे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल केला आहे.

अमरावती-पुणे आणि अमरावती-अजनी या एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल झाला असून आता या दोन्ही गाड्यांचे डबे वाढवले जाणार आहेत.

या दोन्ही गाडीला आता वाढीव 1 स्लीपर आणि 1 एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच जोडला जाईल अशी माहिती Indian Railways  रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

खरे तर पुण्याहून अमरावतीला आणि अमरावतीहून पुण्याला येणाऱ्यांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. शिक्षणानिमित्त आणि रोजगार निमित्त विदर्भातून मोठ्या प्रमाणात नागरिक पुण्यात येत असतात.

त्यामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये कायमच मोठी गर्दी पाहायला मिळते. यामुळे या एक्सप्रेस ट्रेनला अधिकचे डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून या निर्णयाचा या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

या दोन्ही गाड्यांमध्ये आता जनरेटर- 1, स्लीपर- 2, एसी चेअर कार- 1, नॉनएसी चेअर कार-10, एसी थ्री टायर इकॉनॉमी- 1 आणि गार्ड ब्रेक यान-2 असे एकूण 16 एलएचबी कोच राहणार आहेत.

निश्चितच Indian Railways  रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अमरावती ते अजनी आणि अमरावती ते पुणे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायद्याचा राहणार आहे.

रेल्वेने करणार एक लाख कोटी रुपयांचा खर्च !

 Indian Railwaysप्रवाशांची वाढती संख्या पाहता, Indian Railways रेल्वेने एक लाख कोटी रुपयांच्या नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, प्रतीक्षा यादीचा त्रास दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे या मेगा योजनेवर काम करत आहे. या योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षानुवर्षे धावणाऱ्या गाड्यांचे जुने कोच बदलण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेच्या ताफ्यात 7 हजार ते 8 हजार नवीन गाड्यांचा समावेश होणार असल्याचे त्यांनी म्हटले.  येत्या काही वर्षांत जुन्या गाड्या बदलून नव्या गाड्या आणल्या जातील. त्याचबरोबर प्रवाशांसाठी पुरेशा जागा उपलब्ध असतील असेही त्यांनी म्हटले. वेटिंग तिकिटांचा त्रास कसा संपणार ?

गाड्यांची संख्या वाढल्याने जागांची उपलब्धता वाढेल. गाड्यांची संख्या वाढली की कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. सध्या दररोज 2 कोटींहून अधिक प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. रेल्वे दररोज 10754 फेऱ्या चालवते. गाड्यांची संख्या वाढल्याने फेऱ्यांची संख्या वाढेल. यामध्ये दररोज 3000 जादा फेऱ्यांची भर पडल्यास वेटिंग लिस्टचा त्रास संपेल. 700 कोटी लोक दरवर्षी रेल्वेने प्रवास करतात. 2030 पर्यंत हा आकडा 1000 कोटींवर पोहोचेल. प्रवासी संख्या वाढल्याने गाड्यांची संख्याही वाढवणे गरजेचे आहे.  गाड्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढवल्यास रेल्वेतील वेटिंग तिकिटांची समस्या संपुष्टात येईल, असा अंदाज Indian Railways रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे.

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये गर्दी !

मागील काही काळात लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असल्याचे दिसून आले आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तिकिट आरक्षित न झाल्याने सामान्य तिकिटावर प्रवास करावा लागतो. अनेकदा हे प्रवासी सामान्य डब्यात मोठी गर्दी असल्याने आरक्षित कोचमधून प्रवास करतात. त्यामुळे या आरक्षित डब्यातही मोठी गर्दी वाढते.

Lonar News YouTube Channel

 

भारतीय रेल्वे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button