1 Breaking Karegaon; गावकरी झाले संतप्त !
Karegaon: जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात शिरले पाणी!
Karegaon : जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात पाणी शिरल्याने रस्त्याच्या कडेला नाल्या बांधकाम करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केल्या जात आहे.
Karegaon जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात शिरले पाणी!
रस्त्याच्या कडेला नाल्या बांधकाम करण्याची गावकऱ्यांची मागणी !
कारेगाव : रस्त्याच्या कडेला नाल्या नसल्याने पावसाचे पाणी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात शिरल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने कारेगाव येथील गावकरी संताप व्यक्त करत आहेत.
लोणार तालुक्यातील कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळा ही मुख्य रस्त्यावर आहे. मुख्य रस्त्याच्या कडेला नाल्या नसल्याने पावसाळ्यातील पाणी हे सदरील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात गावाचे मुख्यालय म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा पाणी साचल्याने गावकरी चांगलेच संतप्त झालेले आहेत. जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात पाणी शिरण्याचे कारण म्हणजे गावातील मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहून जाण्यासठी नाल्यांचे बांधकाम झालेले नाही, असे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. Karegaon
कारेगाव गावातून जो मुख्य रस्ता लोणारला जातो, त्या रस्त्याच्या कडेला नाल्या नसल्यामुळे रस्त्यावरील वाहणारे पाणी हे रस्त्या शेजारील घरामध्ये, जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात शिरत आहे. कारेगाव गावातून मुख्य रस्त्याचे काम करतांना सांडपाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या बांधकाम करणे आवश्यक आहे. पण रस्त्याच्या कडेला नाल्यांचे बांधकाम न झाल्याने शाळा आणि ग्रामपंचायत मध्ये पाणी शिरण्याचा हा सगळा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.
रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कारेगाव गावातील नागरिक हे त्रस्त झालेले आहेत. गावातील मुख्य रस्त्याचे काम दोन ते तीन वर्षापासून सुरू असून ते काम अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात जर जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये असे सतत पाणी शिरत राहिले तर शाळेचे आणि ग्रामपंचायतचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Karegaon;
नाल्या अभावी रस्त्यावरून वाहणारे पाणी शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात घुसल्याने नुकसान झाल्यास याला कोण जिम्मेदार राहणार आहे. जुलै महिन्यापासून शाळा सुरु होणार असल्याने सदर रस्त्याचे आणि रस्त्याच्या कडेला नाली बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम न झाल्यास कारेगाव गावातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे गावकरी बोलत आहेत.
गावामधील काही नागरिकांनी ठेकेदारास नाल्याविषयी विचारणा केली असता ठेकेदाराकडून फक्त उडावा- उडवीचे उत्तरे देऊन नागरिकांना शांत करत असल्याचे बोलल्या जात आहे.
गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला समोर एक ओढा लागतो. त्या ओढ्यामध्ये सुद्धा थातुरमातुर काम झालेले आहे.चांगला पाऊस पडला तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या बाबीकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशी मागणी कारेगाव येथील नागरिकांनी केलेली आहे.