1 Breaking Kashmir, सुरक्षा दल सतर्क !
पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; लष्कर सतर्क !
Kashmir : कारवायांकडे भारतीय सुरक्षा दलांचे लक्ष वळवून दुसऱ्या बाजूला संधी मिळताच सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी !
Kashmir पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; लष्कर सतर्क !
जम्मू-काश्मीरमधील कठुआ-पठाणकोट या भागात सीमेपलीकडून काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते जम्मू-पठाणकोट महामार्गावरील लष्करी छावण्या, रेल्वे या ठिकाणी आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. Kashmir
पाकिस्तानी ड्रोनची भारताच्या सरहद्दीत घुसखोरी वाढली आहे. त्या कारवायांकडे भारतीय सुरक्षा दलांचे लक्ष वळवून दुसऱ्या बाजूला संधी मिळताच सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी करायची, असा पाकिस्तानच्या लष्कराचा डाव असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सूत्रांनी सांगितले. दहशतवादी सीमेपलीकडून काश्मीरमध्ये घुसखोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वेच्या सुरक्षेसाठीही आणखी जवान तैनात केले जाणार आहेत.
गोळीबारात गावकरी जखमी !
सैदा सुखल या गावात दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका गावकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पाकिस्तानशी चर्चा करणे आवश्यक : फारूक अब्दुल्ला !
पाकिस्तानबरोबर चर्चा केल्याशिवाय काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येणार नाही, असे नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले. जम्मूमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिक मरण पावत आहेत. Kashmir
दहशतवाद्यांनी मागितले पाणी अन्…..
– कठुआ जिल्ह्यातील सैदा सुखल या गावामध्ये मंगळवारी रात्री आठ वाजता दोन दहशतवाद्यांनी प्रवेश केला व त्यांनी तेथील गावकऱ्यांकडे पिण्यासाठी पाणी मागितले. या दहशतवाद्यांना पाहून घाबरलेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा दलाशी संपर्क साधला.
– गावात दहशतवादी शिरले आहेत, ही माहिती मिळताच तिथे सुरक्षा दलाचे जवान तातडीने रवाना झाले. त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला करण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुरक्षा दलांच्या मजबूत इराद्यापुढे त्यांना नांग्या टाकाव्या लागल्या आहेत. कठुआती हिरानगर सेक्टरमध्ये लष्काराने नाकाबंदी केली आहे. एका गावात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळताच लष्कराने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. त्यात एक दहशतवादी ठार झाला. एका नागरिकाला पण गोळी लागली. डोडा जिल्ह्यातील काही भागात दहशतवादी सक्रिय असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांवर ताबडतोब हल्ले सुरु केले आहेत. Kashmir
गेल्या 48 तासांत 3 हल्ले !
डोडा जिल्ह्यात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या 48 तासांत 3 हल्ले करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पोलीस चौक्या, ग्रामीण भागातील नागरीक आणि पर्यटकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. डोडा जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्यावेळी सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यात 6 जवान जखमी झाले. राष्ट्रीय रायफल युनिटचे 5 तर एसपीओचा एक जवान जखमी झाला आहे. पण सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पळता भूई थोडी केली आहे.
अफवांना नाही थारा, पोलीस, लष्कराची करडी नजर !
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे एडीजी आनंद जैन यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात एक नागरीक जखमी झाला. त्याला लागलीच सुरक्षा दलांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दहशतवाद्यांनी एका गावात पाणी मागितले. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी लागलीच त्यांची माहिती सुरक्षा यंत्रणेला दिली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन जैन यांनी केले आहे. Kashmir
दहशतवाद्याचे रेखाचित्र प्रसिद्ध !
जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील भाविकांच्या, यात्रा बसवर नुकताच हल्ला करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र, स्केच तयार करण्यात आले आहे. हे रेखाचित्र प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानंतर तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना टिपण्यासाठी सुरक्षा दलाची 11 पथके तयार करण्यात आली आहे. 9 जून रोजी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यात 9 भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक जण जखमी झाले. या सर्व प्रकरणानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. Kashmir
जम्मू काश्मीर गेल्या तीन दिवसांमध्ये तीन दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. रविवारी (10 जून) संध्याकाळी रियासी जिल्ह्यात यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 9 जण ठार झाले. त्यापाठोपाठ कठुआ आणि डोडा भागालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केलंय. डोडामधील हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झालाय. तर कठुआमध्ये एक जण जखमी झाला आहे. कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी नेमकं काय झालं? याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
अभिनंदनाच्या संदेशांना उत्तर देण्यात व्यस्त असलेल्या पंतप्रधानांना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत. येथे गेल्या ३ दिवसांत ३ वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत पण पंतप्रधान अजूनही उत्सवात मग्न आहेत. भाजप सरकार असताना दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना का पकडले जात नाही?, याचे देश उत्तर मागत आहे.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते.
दहशतवादी कारवाया करून जम्मू-काश्मीरचे प्रचंड नुकसान करणाऱ्या पाकिस्तानशी का चर्चा करायची? पाकिस्तानला जी भाषा कळते, त्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला हवे.
– रवींद्र राणा, जम्मू-काश्मीरचे भाजप प्रदेशाध्यक्ष.