महाराष्ट्र

1 Breaking Ladki Bahin Yojana रक्षाबंधनची भेट

रक्षाबंधन ची भेट बहिणीच्या खात्यावर जमा....

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाची भेट मिळालेल्या लाभार्थी बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसून येत आहे.

लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

रक्षाबंधन ची भेट बहिणीच्या खात्यावर जमा….

किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज www.lonarnews.com

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ बहुतांश बहिणींच्या खात्यात गेल्या दोन दिवसांत जमा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसून येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ खात्यामध्ये जमा होत आहे, याची चर्चा घराघरात झाली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत.

31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात लाभ येण्यास सुरुवात झाली आहे. त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3 हजार रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी या नंतर अर्ज भरले आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेचा लाभ जमा होईल, असं सरकारनं स्पष्ट केलंय. यापूर्वी या योजनेतील एक रुपया ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. त्यानंतर आता आणखी एका टप्प्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना लवकर लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojanaमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविल्याची घोषणा करताच मागील महिन्यापासून महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदांची जुळवाजुळव करत सेतू केंद्रावर, अंगणवाडी केंद्रावर अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. लाडकी बहिण योजनेचे पैसे रक्षाबंधन सणाच्या अगोदर येणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांनी शेतातील काम सोडून अर्ज भरले. रक्षाबंधन सणाच्या चार दिवसाअगोदरच बहुतांश लाडक्या बहिणीच्या खात्यावर योजनेचा लाभ जमा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसून आले. (Ladki Bahin Yojana)

मोबाईलवर आलेला मेसेज पाहून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केल्यानंतर अनेक बहिणी खात्यावर आलेले पैसे काढण्यासाठी बँक ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी करतांना दिसून आल्या. रक्षाबंधन सणाच्या अगोदर बहिणींच्या खात्यावर योजनेचा लाभ जमा करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता आणि त्याप्रमाणे तो शब्द भावांनी खरा करून दाखविला अशा भावना खात्यांवर आलेले पैसे काढतानी बहिणींनी लोणार न्यूज माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केल्या. (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. 31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत, अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3 हजार रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी या नंतर अर्ज भरले आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय.

काय आहे लाडकी बहीण योजना? (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojanaराज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येत आहेत. परंतु, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसंच, कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. (Ladki Bahin Yojana)

येत्या १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

Ladki Bahin Yojanaबँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ!

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले. (Ladki Bahin Yojana)

1 ऑगस्टनंतर आलेल्या अर्जांची छाननी होणार….

मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्टनंतर आलेल्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव म्हणाले. (Ladki Bahin Yojana)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button