महाराष्ट्रराजकीय

Breaking – 2025 Akola सर्वसाधारण प्रारूप आराखडा

जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी व अनुशेष भरून काढण्यासाठी निधी द्यावा : पालकमंत्री आकाश फुंडकर

Breaking – 2025 Akola ” जिल्ह्यात पायाभूत व आरोग्य सुविधांचे नियोजन; वाढीव निधी द्यावा – पालकमंत्री आकाश फुंडकर यांची मागणी

2025 Akola : जिल्ह्याला वाढीव निधी निश्चितपणे उपलब्ध करून देऊ
– उपमुख्यमंत्री अजित पवार

Edited By : किशोर मापारी, मुख्य संपादक,लोणार न्यूज. www.lonarnews.com

अकोला, दि. 3 : सर्वसाधारण प्रारूप आराखडा 2025-26 मध्ये 190 कोटी अतिरिक्त मागणी आहे. या वाढीव निधीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.

2025 Akolaजिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन राज्यस्तर बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार रणधीर सावरकर हे ऑनलाईन, तर आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने व सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळावा : पालकमंत्री आकाश फुंडकर

2025 Akolaसर्वसाधारण प्रारूप आराखडा 2025-26 मध्ये यंत्रणांची 963.32 कोटी रू. मागणी आहे. शासनाने दिलेली वित्तीय मर्यादा 243.96 कोटी आहे. जिल्ह्यात आवश्यक अतिरिक्त मागणी 190 कोटी रू. आहे. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानात महापालिकेतील हद्दीवाढीनंतर समाविष्ट गावांसाठी 15 कोटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विविध सुधारणांसाठी 20 कोटी, पाच ग्रामीण रूग्णालये व उपजिल्हा रूग्णालयांसाठी 1 कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत दुरूस्ती व बांधकामासाठी 4 कोटी, 28 मोठ्या ग्रामपंचायतींना सुविधांसाठी 5 कोटी पशुवैद्यकीय दवाखाने 2 कोटी, नागरी दलितेतर वस्तीमध्ये सुधारणा 15 कोटी, 20 यात्रास्थळांच्या विकासासाठी 2 कोटी, ग्रामीण रस्त्यांसाठी 20 कोटी आदी अतिरिक्त मागण्या करण्यात आल्या आहेत. (2025 Akola)

जिल्ह्यातील नागरी व शहरी भागात पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधांसाठी नियोजनपूर्वक वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी व अनुशेष भरून काढण्यासाठी हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

जिल्ह्यातील नियोजित विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही 15 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कामे
2025 Akola
जिल्ह्यात 2022-23 व 2023-24 मध्ये राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, आदर्श शाळा, आकार अंगणवाडी केंद्र, वनपर्यटन केंद्र, अटल घनवन लागवड, फळबाग लागवड, अकोल्याचा वन स्टॉप ऑल केअर हब म्हणून विकास करणे, क्रीडा, शासकीय कार्यालयीन इमारतीचे बळकटीकरण, कृषी वसंत अभियान, रोव्हरद्वारे मोजणी आदी वैशिष्ट्यपूर्ण कामांबाबत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सादरीकरण केले. (2025 Akola)

Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button