स्थानिक बातम्या

1 Breaking Lonar – भव्य बक्षीस वितरण कार्यक्रम

लोणार येथे ईद मिलादुन्नबी निमित्त सिरतुन्नबी क्विज कॉम्पिटिशनचे आयोजन; 12 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

1 Breaking Lonar : 22 सप्टेंबर रोजी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. सिरतुन्नबी वर आधारित ईद मिलादुन्नबी निमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल.

1 Breaking Lonar “जमियतचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी व जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचे हस्ते 22 सप्टेंबर रोजी होणार भव्य बक्षीस वितरण कार्यक्रम”

किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. www.lonarnews.com

1 Breaking Lonarलोणार : ईद मिलादुन्नबीच्या पावन प्रसंगी 13 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर जाकिर हुसैन उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज लोणार तसेच जमीयते उलेमा ए हिंद लोणार व शहरातील मान्यवर यांच्या संयुक्त विद्यमाने सिरतुन्नबी क्विज कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या 12,435 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.

1 Breaking Lonarया स्पर्धेत 70% गुण प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची 22 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर जाकिर हुसैन उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज लोणार मध्ये अंतिम परीक्षा घेतली जाईल. या फाइनल परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सऊदी अरब येथील मक्का-मदीना शहराचे दर्शन‌ अर्थात उमराह टूर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

प्रथम दोन बक्षीसांपैकी एक कॉलेज तर्फे तर दुसरा विदर्भ अकॅडमी लोणार यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या दोन प्रथम बक्षीसा पैकी एक संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून तर एक फक्त लोणार शहरातून निवडला जाईल, तर द्वितीय क्रमांकास शेख गय्यूर भाई, कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे फ्रिज, तृतीय क्रमांकास लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल च्या तर्फे वॉशिंग मशीन,चतुर्थ क्रमांकास हाजी रिजवान जड्डा यांच्याकडून पाणी फिल्टर तर पाचव्या क्रमांकाला सोनू सायकल स्टोअर्स तर्फे एक सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. (1 Breaking Lonar)

1 Breaking Lonarयाशिवायही अनेक रोख बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असून अंतीम राउंडमध्ये उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना हाजी महेमूद सेठ यांच्या तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील. 22 सप्टेंबर 2024  रोजी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल आणि याच दिवशी सिरतुन्नबी वर आधारित ईद मिलादुन्नबी निमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल.

या कार्यक्रमाला जमीयते उलेमा ए हिंदचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी आणि जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील. सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जमीयते उलेमा ए हिंदचे तालुकाध्यक्ष हाजी रिजवान जड्डा, शहराध्यक्ष हाफिज शेख अयाज़ सह डॉक्टर जाकिर हुसैन कॉलेजचे अध्यक्ष हाजी शेख मसूद तसेच प्राचार्य डॉक्टर फिरोज खान व व्यवस्थापक मंडळांनी केले आहे. (1 Breaking Lonar)

फाइनल परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सऊदी अरब येथील मक्का-मदीना शहराचे दर्शन‌ अर्थात उमराह टूर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे…..

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button