Breaking Lonar : प्लास्टिक मुक्त लोणार सरोवर मोहिमेची धुरा सांभाळणारे वनरक्षक आर.एफ.ओ.चेतन राठोड यांचे लोणार वासियांकडून कौतुक केले जात आहे.
Breaking Lonar “एक निर्णय लोणार सरोवर स्वच्छतेकडे”
किशोर मापारी, लोणार न्यूज, एडिटर (www.lonarnews.com)
जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरात प्लास्टिक नेण्यास बंदी करत वन्यजीव अभयारण्याचे आर.एफ.ओ. चेतन राठोड यांनी आपल्या कडक निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार घेतला असून चेतन राठोड यांच्या आदेशानुसार वनरक्षक कैलास नागरे व गाईड अमोल सरदार यांनी प्लास्टिक मुक्त लोणार सरोवर हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या आठ दिवसापासून वनरक्षक कैलास नागरे वन्यजीव अभयारण्याच्या प्रवेश गेटवरून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची तपासणी करून त्यांच्याजवळ असलेल्या गुटखा, तंबाखू व इतर पदार्थ हे स्वतः तिथे उभे राहून जमा करून घेत आहे.
तसेच खाण्याचे पदार्थ, चीप्स, कुरकुरे तसेच प्लास्टिक मध्ये असलेले पदार्थ जमा करून पर्यटकांना ते कागदी पेपरमध्ये दिली जात आहेत. हा प्रकार बघून बाकीच्या पर्यटकांनी सुद्धा त्यांच्या जवळील प्लास्टिक पिशव्या सरोवरात सोबत न नेता परत नेण्यास सुरुवात केली आहे. सर्व स्तरावर या बदलाची नोंद व प्रशंसा केल्या जात आहे. सदर प्लास्टिक मुक्त लोणार सरोवर मोहिमेची धुरा सांभाळणारे वनरक्षक आर.एफ.ओ. चेतन राठोड, वनरक्षक कैलास नागरे, गाईड अमोल सरदार व त्यांची सर्व गाईड टीम यांचे लोणार वासियांकडून कौतुक केले जात आहे.