राजकीयस्थानिक बातम्या

1 Breaking :Mehkar Assembly रंजक होणार..

मेहकर विधानसभा निवडणूक मध्ये दिग्गजांसमोर उभे ठाकणार युवा नेतृत्व !

Mehkar Assembly : मतदार संघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्या पासून ते तळागाळातील माणसांसोबत दांडगा जनसंपर्क व जिव्हाळा असलेले युवा नेतृत्व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

Mehkar Assembly : मेहकर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आंदोलन सम्राट नागवंशी संगपाल पनाड उतरणार..

Written By : अनित्य घेवंदे, सुलतानपूर, ता.लोणार, जि. बुलढाणा.  WWW.LONARNEWS.COM

मेहकर विधानसभा विशेष : 2006 मध्ये नागवंशी संघपाल पनाड यांनी भारिप बहुजन महासंघ मध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्य करत राजकारणात प्रवेश केला. राजकारण आणि समाजकारण यांची अनोखी सांगड घालत त्यांनी कार्य सुरु ठेवल्याने त्यांची एक वेगळी प्रतिमा समाजात निर्माण झाली. त्यामुळे कोणालाही आपलासा वाटावा, ज्यांना हक्काने कधीही काहीही अडचण सांगावी असा आपला माणूस नागवंशी संघपाल पनाड म्हणून त्यांची सर्वदूर ओळख निर्माण झाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून त्यांना मान दिला जात असला तरी नागवंशी संघपाल पनाड हे एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखे वावरत जनसामान्यांच्या सुख-दुखात सहभागी होत असतात.

Mehkar Assemblyभारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा नागवंशी संघपाल पनाड यांचा  राजकीय प्रवास आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आपलं आगळे वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले. 2006 पासून सक्रिय समाजकारण, राजकारणाला सुरुवात करत शेकडो आंदोलने, मोर्चे त्यांनी काढले. यातून हजारो गोरगरीब, पिडीत, वंचित, शोषित, विधवा, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, जनतेला न्याय देण्याचे काम आजपर्यंत करत आहेत. (Mehkar Assembly)

2019 च्या लोणार नगरपालिका निवडणूकीमध्ये त्यांच्या नेतृत्वात त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह दोन नगरसेवकाचे उमेदवार उभे केले होते. त्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाचे रात्र करून तसेच चाणक्य नीती वापरून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेला. मात्र अवघ्या 400 मताने नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. परभाव झाला असला तरी उमेदवार दोन नंबर वर राहिल्याने एक नविन राजकीय पर्व सुरु झाल्याची नांदी दिसून आली. सत्तेत असलेल्या खासदार, आमदार यांच्या उमेदवाराला मात्र तीन नंबर वर समाधानी राहावे लागले. (Mehkar Assembly)

लोणार तालुक्यातील सुलतानपूर हे गाव लोणार तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून मुंबई-नागपूर महामार्गावर वसलेले गाव आहे. गावामध्ये जवळपास सर्व जाती-धर्माचे नागरिक राहतात. स्वातंत्र्यापासून ते 2019 पर्यंत मागासवर्गीय स्मशानभूमी मध्ये प्रेत यात्रा नेण्यासाठी रस्ता नव्हता. या रस्त्याच्या मागणीसाठी अनेक निवेदने, मोर्चे, उपोषण करण्यात आले. परंतु निगरगठ्ठ प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्यामुळे त्याठिकाणी कुठलाही मार्ग निघाला नाही. ही बाब नागवंशी संघपाल पनाड यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी हा विषय हातामध्ये घेतला. (Mehkar Assembly)

Mehkar Assembly त्याच दरम्यान 2019 मध्ये त्यांचे वडील नामे कचरू राघो पनाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. वडिलांचाच अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांना अडचण निर्माण झाली. शासन आणि प्रशासनाला जाग यावी म्हणून त्यांनी वडिलांचा अंतिम संस्कार सुलतानपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्याचा निर्धार करत मनावर दगड ठेवून तो पूर्ण केला. या घटनेने जनमानसात तीव्र पडसाद उमटले.  जनआक्रोष पाहता प्रशासनाला जाग आली. नागवंशी संघपाल पनाड यांच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली. त्यानंतर त्याठिकाणी अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांचे काम करण्यात आले.

त्यांची अनेक आंदोलने गाजलेली आहेत.  शेतकऱ्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण, शेतकऱ्यांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेने कर्जमाफी संदर्भात केलेल्या भ्रष्टाचाराचे आंदोलन, 2021-22 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुंबई-नागपूर हायवेवर्ती रस्ता रोको आंदोलन, पाणी प्रश्नासाठी शोले स्टाईल आंदोलन, घरकुल धारकाच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण, अनेक रस्ते नाल्या विकास कामाच्या संदर्भात शेकडो आंदोलन करून त्यांनी जिल्हाभर आंदोलन सम्राट म्हणून आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली. (Mehkar Assembly)

Mehkar Assembly2006 पासून ते आजपर्यंत त्यांच्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वस्व मानून रेखाताई ठाकूर, नेते अशोक सोनोने, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, साहेबराव तायडे, सविता मुंडे, भिमराव‌ तायडे,निलेश जाधव, प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे, प्रा.डॉ.के.बी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली आहे. 2017 मध्ये तालुकाध्यक्ष असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक लागली. त्यामध्ये दोन जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार व चार पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार रिंगणात त्यांनी उतरविले. (Mehkar Assembly)

त्यामध्ये सुलतानपूर सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार हा माळी समाजाचा देऊन त्यामध्ये अटितटीच्या लढतीमध्ये 2200 मतदान घेऊन तीन नंबर वर राहिला. तसेच पंचायत समिती सदस्य पदाचा उमेदवार मुस्लिम समाजाचा देऊन अवघ्या 200 मताने पराभूत होत दोन‌ नंबर राहिला. 2017 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुलतानपूर मध्ये पॅनल उभे करून स्वतः ते सरपंच पदाचा उमेदवार म्हणून दोन नंबर वर राहिले. अल्पशा मताने पराभूत झाले मात्र त्यांच्यासह पाच सदस्य निवडून आणले. त्यानंतर  2022 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वतासह आठ सदस्य निवडून आणले. यावरून त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्त्या पासून ते तळागाळातील माणसासोबत दांडगा जनसंपर्क व जिव्हाळा  असल्याचे दिसून येते. (Mehkar Assembly)

जनतेने एक आपला आपल्या मधील आपला हक्काचा माणूस आपले सुख दुःख जाणणारा तळागाळातील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, विधानसभेमध्ये पाठवले तर नक्कीच मतदार संघामध्ये सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर,शोषित, पीडित, वंचित, अपंग, निराधार, विधवा, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन मतदारसंघ विकासाच्या उंबरठ्यावर नेतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मायबाप जनता जनार्दन आपल्यातीलच एक माणूस म्हणून त्यांना पाठबळ द्यावे. कारण आपलाच हक्काचा माणूस वंचित नेता नागवंशी संगपाल पनाड…..

https://youtube.com/@LonarNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button