राजकीय

1 Breaking Mehkar : बौद्ध समाज संवाद यात्रा..

बुलढाणा जिल्हातील मेहकर मध्ये येणार बौद्ध समाज संवाद यात्रा.....

Breaking Mehkar : : मेहकर मध्ये होत असलेल्या बौद्ध समाज संवाद यात्रेला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेआवाहन करण्यात आले आहे.

Breaking Mehkar : 11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा :- निलेश जाधव

Breaking Mehkarबुलढाणा जिल्ह्यातील  मेहकर येथील अशोका वाटिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथा मेहकर विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सदर बैठीक दरम्यान  निलेश जाधव आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगताना म्हणाले की,  संवाद यात्रा का निघत आहे ? याचे आत्मचिंतन करण्याची गरज समाजाला आहे. कारण आपण 2019  च्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी व 2024 च्या निवडणुकीची टक्केवारी तपासून बघितली तर यामध्ये खूप तफावत आहे.  ज्या बुद्धिजीवी लोकांनी संविधानाच्या नावाखाली समाज बांधवांची दिशाभूल केली. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे या आगामी होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये खंबीरपणे उभे राहावे. असेही त्यानी समाज बांधवांना आवाहन केले.

Breaking Mehkarकार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांचे भाषणे झालीत. यावेळी अशोक सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेचे आपल्या जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करून मान्यवरांचे विचार आत्मसात करावे. तसेच जास्तीत जास्त समाज बांधावानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.  दरम्यान पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही आपले मत व्यक्त केले. संबधित विषयावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम समारोप वेळी  उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव यांचे आभार व्यक्त करण्यात आले. (Breaking Mehkar)

Breaking Mehkarयावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष न.ल. खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष, मेहकर तालुकाध्यक्ष, लोणार तालुकाध्यक्ष, युवा नेते अनित्य घेवंदे, बळीभाऊ मोरे, मोबिन भाई, दिलीप राठोड, दीपक पाडमुख, दिपक अंभोरे, आबाराव वाघ, भुजंग शिरसाट , जितुभाऊ डोंगरदिवे, सिद्धार्थ अवसरमोल , प्रदीप सरदार, महेंद्र मोरे, वसंतराव वानखेडे, मिलिंद खंदारे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष मोरे, राजहंस जावळे, महेंद्र पनाड, अचित पाटोळे, राहुल सरदार , गवई सर, गौतम गवई  यांनी विशेष परिश्रम घेतले.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button