1 Breaking Mehkar : संविधानाच्या नावाखाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समाजाचे मतदान घेऊन एका प्रकारे समाजाची दिशाभूल केली : अशोक सोनोने
1 Breaking Mehkar : समाज रक्षक श्रद्धेय,बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे समाजाने खंबीरपणे उभे राहावे :- अशोक सोनोने..
बौद्ध समाज संवाद यात्रा मेहकर आणि लोणार येथे मेहकर – लोणारचे वंचित विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाली. बौद्ध समाज संवाद यात्राचे प्रमुख मार्गदर्शक अशोक सोनोने, अमित भुईगळ, राजेंद्र पातोडे, युजी बोराडे, प्रा.मनोज निकाळजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मेहकर-लोणार येथे बौद्ध समाज बांधवांसोबत संवाद करण्यात आला.
सदर संवाद यात्रा कार्यक्रमादरम्यान अशोक सोनोने यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच खरे समाजाचे रक्षक असून समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. संविधानाच्या नावाखाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समाजाचे मतदान घेऊन एका प्रकारे समाजाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस एससी, एसटीच्या आरक्षण वर्गीकरनाचा नॉन क्रिमिनल चा विषय येतो त्यावेळेस सर्वात अगोदर अंमलबजावणी करण्यासाठी ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे ते सरकार अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही आहे, हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे. बोलण्यात एक आणि करण्यात एक समाजाने वेळीच ओळखावे आणि सजग व्हावे. वंचित बहुजन नेते संघपाल पनाड यांनीही उपस्थितांसोबत संवाद साधला आणि मनोगत जाणून घेतले. (1 Breaking Mehkar)
कार्यक्रमादरम्यान समाजातील अनेक बांधवांनी प्रश्ने विचारली. सदर प्रश्नांना राजेंद्र पातोडे यांनी समपर्क अशी उत्तरे देत समाज बांधवांसोबत संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, प्रा. डॉ. के.बी. इंगळे, आबाराव वाघ, युवा नेते अनित्य घेवंदे, बळीभाऊ मोरे, ॲड.सुजीत मोरे, मोबिन भाई, ॲड, बबन वानखेडे, दीपक पाडमुख, भुजंग शिरसाट, सिद्धार्थ अवसरमोल, शाकीर पठाण, दीपक अंभोरे, महेंद्र मोरे, प्रशिस इंगळे, वसंतराव वानखेडे, राहुल पाडमुख, प्रदीप सरदार, नागशेन पनाड यांची विशेष उपस्थिती होती.
सदर बौद्ध समाज संवाद यात्रा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पनाड, बबन पनाड, विलास खरात, राजहंस जावळे, श्रीराम पनाड, विशाल कंकाळ, शुध्दोधन सरदार, मंगेश पनाड, बिंबीसार पनाड, महेंद्र मधुकर पनाड, तान्हाजी अंभोरे, गजानन शेजूळ, भारत सरदार, खंडू सरदार, देवानंद वानखेडे, मा. पोलीस पाटील वानखेडे, समाधान भवाळ, अनिल देबाजे, किरण ताजने, छगन खंदारे, रंजित मोरे, रमेश अवसरमोल, उषाताई नरवाडे, कमल शंकर निर्भय्य, सरकटे ताई, रूक्मिणीबाई पनाड, छायाबाई पनाड, अस्मिता पनाड , रेश्माबाई पनाड, हरणाबाई चव्हाण, केशरबाई जावळे, मथुबाई, सभादिंडे, तान्हाबाई पनाड, गौकर्णा मोरे, प्रयागबाई अंभोरे, गिताईबाई अंभोरे, उषाताई मोरे, पौर्णिमा पनाड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (1 Breaking Mehkar)