राजकीय

1 Breaking – Mehkar Vidhansabha – एल्गार बैठक

नागवंशी संघपाल पनाड मेहकर विधानसभा निवडणूक लढविणार ..

Mehkar Vidhansabha –  अखेर पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर नागवंशी संघपाल पनाड मेहकर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार ..

Mehkar Vidhansabha – एल्गार बैठकीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याचा एकमताने ठराव मंजूर..

नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये सुलतानपूर येथील वेणी मार्गावरील सुख शांती मंगल कार्यालयामध्ये 27 ऑक्टोबर 2024 रोजी  एल्गार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे मुख्य कारण म्हणजे मेहकर विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात मेहकर-लोणार तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नेहमीच साथ देणाऱ्या जनमानसांच्या सर्वानुमते निवडणूक लढवण्याचा ठराव घेण्यात आला.

Mehkar Vidhansabha -नागवंशी संगपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये मेहकर विधानसभा लढविण्यासंदर्भात सुख शांती मंगल कार्यालय येथे एल्गार बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या मनोगतातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, त्यामध्ये मुस्लिम समाजाचे नेते तोशिफ अली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भाई दिलीप खरात, तालुका अध्यक्ष बळीभाऊ मोरे, वंचित बहुजन आघाडीचे मेहकर आणि लोणार तालुक्यातील जवळपास 90% पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी आम्ही तुमच्या सोबत तन-मन-धनाने आहोतच व आम्ही व्होट पण देणार आणि प्रचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी नोट पण देणार असे उपस्थित सर्वांनी ठणकावून सांगितले. (Mehkar Vidhansabha -)

Mehkar Vidhansabha -यावेळी मनोगत व्यक्त करताना नागवंशी संघपाल पनाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व राजगृहाबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत आदराचे स्थान आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांच्या अवतीभवती असलेले जिल्हा प्रभारी धैर्यवर्धन पुंडकर, अशोक सोनोने, राजेंद्र पातोडे, सविता मुंढे, निलेश जाधव यांनी पक्ष विकण्याचे काम केले व पक्ष संपवण्याचे काम करत आहेत. मला त्यांनी वेळोवेळी पदापासून दूर ठेवले. पदापासून अनेक वेळा डावलण्याचे काम केले व मला वेळोवेळी अपमानित करून संपविण्याचे काम केले. यांनीच माझ्याबद्दल बाळासाहेबापर्यंत चुकीचे माहिती दिली व मला उमेदवारी सुद्धा मिळू नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले.

त्यामुळे नाईलाजास्तव आज रोजी मला “एल्गार बैठक” घ्यावी लागत आहे. असो परंतु मेहकर विधानसभा मतदार संघाचा खुंटलेला विकास करण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःची जबाबदारी समजून या निवडणुकीमध्ये उतरून मला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून प्रयत्न करावे व येणाऱ्या काळामध्ये मेहकर विधानसभ मतदारसंघातला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास करून घ्यावा असे मत व्यक्त केले. (Mehkar Vidhansabha -)

Mehkar Vidhansabha -यावेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी उपस्थित युवा नेते अनित्य घेवंदे, प्रा.डॉ. के.बी. इंगळे, शाकीर पठाण, दीपक अंभोरे, शेख अख्तर, दीपक पाडमुख, सिद्धार्थ अवसरमोल, महेंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य शे. अमिर, संतोष शिंदे, सुमन पनाड, संतोष पाटील, सद्दाम भाई, जितू डोंगरदिवे, मनोज भालेराव, सागर आत्माराम पनाड, संगम मोरे, श्याम कटारे, नागशेन पनाड, परसराम जावळे, बिंबिसार पनाड, शुध्दोधन सरदार, सोनू पनाड, प्रसेंजीत पनाड, श्रीराम पनाड, बबन पनाड, रमेश अवसरमोल, मनोहर पनाड, संजय पनाड, दादाराव पनाड, संजय शेजूळ, सतीश पवार, शिवाजी नवघरे, विलास खरात, बगलासेठ, महेश मोरे, संजय शेजुळ, शेख राजू शेख सुबान, पारस पनाड, आत्माराम पनाड उपस्थित होते.

तसेच हरणाबाई चव्हाण, रेशमाबाई पनाड, शांताबाई पनाड, शकुंतलाबाई जावळे, सिंधुबाई पनाड, मथुबाई सभादिंडे, हरणाबाई चव्हाण, उषाबाई पनाड, चंद्रभागाबाई मुळे, अंसाबाई जावळे, छायाबाई पनाड, अस्मिता पनाड, केसरबाई गवई, कमलबाई शेजुळ, रुक्मिनाबाई पनाड, नंदाबाई पनाड यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते. (Mehkar Vidhansabha -)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button