1 Breaking Modern Bus Stand at Baramati
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती येथे मॉडर्न बसस्थानक !
Modern Bus Stand : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हे मॉडर्न बसस्थानक बारामती येथे उभे राहिले आहे. हे दुमजली मॉडर्न बस स्थानक खूपच हायटेक असून यामध्ये अगदी एअरपोर्ट सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
एअरपोर्ट सारखे दुमजली बस स्थानक तयार ! फेब्रुवारीअखेर उदघाट्नाची शक्यता !
नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पहिल्या एसी बस स्थानकाचे लोकार्पण झाले आहे. राज्यातील पहिले एसी बस स्थानक उत्तर महाराष्ट्रात तयार झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथील अलीकडेच लोकार्पित झालेले मेळा बसस्थानक हे महाराष्ट्रातील पहिले एसी बस स्थानक ठरले आहे.
हे अत्याधुनिक बस स्थानक गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या बसस्थानकामुळे नाशिक शहरातून ये-जा करणाऱ्या बस प्रवाशांना, लाल परी च्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. अशातच आता महाराष्ट्रात आणखी एक नवीन बस स्थानकाचे लवकरच लोकार्पण होणार आहे. हे स्थानक अगदी एअरपोर्ट सारखे राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन दुमजली बस स्टेशनं तयार होत आहे. (Modern Bus Stand)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हे मॉडर्न बसस्थानक बारामती येथे उभे राहिले आहे. हे दुमजली मॉडर्न बस स्थानक खूपच हायटेक असून यामध्ये अगदी एअरपोर्ट सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान बारामती येथे तयार होत असलेले हे दुमजली बस स्थानक पूर्णपणे बांधून तयार झाले आहे. यामुळे याचे लोकार्पण केव्हा होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान या बसस्थानकाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार या पुणे जिल्ह्यातील सुंदर वास्तूचे लवकरच उद्घाटन होणार आहे. फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत बारामती येथील या दुमजली मॉडर्न बस स्थानकाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी फेब्रुवारी महिन्यातच या बसस्थानकाचे लोकार्पण होणार असे संकेत दिले होते. यामुळे बारामतीकरांसहित सर्वच एसटी प्रवाशांना लवकरच या मॉडर्न बसस्थानकाचा वापर करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. (Modern Bus Stand)
विशेष बाब अशी की, या दुमजली बसस्थानकाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
बसस्थानकाच्या विशेषता !
बारामती येथील बस स्थानक दुमजली आहे. यामध्ये एअरपोर्टसारख्या सुविधा राहणार आहेत. या बसस्थानकात 22 प्लॅटफॉर्म आहेत. एवढेच नाही तर येथे वाहक आणि चालकांसाठी स्पेशल विश्रामगृह राहणार आहे. या बसस्थानकात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह राहील.
एवढेच नाही तर येथे अद्ययावत वॉशरूम राहणार आहेत. या बसस्थानकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे एक कॉन्फरन्स हॉल देखील असेल. म्हणजेच जर कोणाला बसस्थानकावरच मीटिंग घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी देखील येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निश्चितच, हे हायटेक बस स्थानक सुरू झाल्यानंतर लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. (Modern Bus Stand)
शहरात तयार होणार 14.83 एकर क्षेत्रावर नवीन रेल्वे स्थानक !
गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने तसेच कोणत्याही शहरात रेल्वेने सहजतेने जाता येत असल्याने रेल्वे प्रवासाला विशेष महत्त्व दिले जात आहे. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ठाणे नजीक एक नवीन रेल्वे स्थानक तयार होणार आहे. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील मोठा भार कमी होणार अशी आशा व्यक्त होत आहे. (Modern Bus Stand)
खरे तर ठाणे रेल्वे स्थानक हे राज्यातील एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. आता मात्र ठाण्याजवळ एक नवीन रेल्वे स्थानक तयार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड आणि ठाणे या रेल्वे स्थानकादरम्यान हे नवीन स्थानक तयार केले जात आहे. या नव्याने विकसित होत असलेल्या रेल्वे स्टेशन मुळे ठाणे स्थानकातील बहुतांशी भार कमी होणार आहे. घोडबंदर रोड, वाघळे इस्टेट आणि पोखरण या भागातील रेल्वे प्रवाशांना थेट ठाणे स्थानकावर येण्याची गरज राहणार नाही. (Modern Bus Stand)
नव्याने विकसित होत असलेल्या या स्थानकावरुन आता येथील प्रवाशांना रेल्वेगाडी पकडता येणार आहे. परिणामी त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि पैसाही वाचणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकात दररोज 7 लाख प्रवासी ये-जा करत असतात. अशा परिस्थितीत, येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी होत असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, प्रवाशांची हीच कोंडी दूर करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानक तयार केले जात आहे. हे स्थानक 14.83 एकर जागेवर तयार होणार आहे. त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला 2 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या स्थानकावर तीन प्लॅटफॉर्म तयार होणार आहेत आणि एक होम प्लॅटफॉर्म राहणार आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी तीन पादचारी पूल तयार केले जाणार आहेत. दरम्यान या स्थानकाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती समोर आली आहे. (Modern Bus Stand)
महाराष्ट्रात नाशिक येथे तयार झाले एअरपोर्ट सारखे बसस्थानक !
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. वेगवेगळे प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णत्वास गेली आहेत. प्रामुख्याने रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या अशा नाशिक शहरात राज्यातील पहिले एसी बस स्टेशन विकसित झाले आहे. (Modern Bus Stand)
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात राज्यातील पहिले एसी बस स्थानक तयार करण्यात आले आहे. खरे तर नाशिक हे शहर पुणे-मुंबई-नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचे शहर आहे. या शहरांच्या विकासावरूनच खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाचे मोजमाप होते असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. हेच कारण आहे की या तिन्ही शहरांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान नाशिक शहराच्या विकासात भर पडावी म्हणून येथील मेळा बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. (Modern Bus Stand)
नाशिक शहरात एसी बस स्थानक तयार झाले आहे. नशिक मधील मेळा बस स्थानक हे राज्यातील पहिले एसी बस स्थानक काल अर्थातच 10 फेब्रुवारी 2024 पासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. हे बस स्थानक एअरपोर्ट प्रमाणे विकसित करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसस्थानकाचे उद्घाटन संपन्न झाले आहे. अर्थातच आता हे बसस्थानक सर्वसामान्यांसाठी सुरू झाले आहे. दरम्यान आता आपण जागतिक दर्जाचे हे नवीन बस स्थानक नेमके कसे आहे, यात प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Modern Bus Stand)
या बसस्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे राज्यातील पहिले असे बस स्टेशन आहे, ज्यामध्ये एअरपोर्ट प्रमाणे एसी बसवण्यात आली आहे. या बस स्टेशनवर वीस प्लॅटफॉर्म असून यापैकी चार प्लॅटफॉर्मवर एसी आहेत. म्हणजेच आता नागरिकांना एसी मध्ये बसून बसची वाट पाहत येणार आहे. परिणामी एसटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. नाशिक शहरात बसने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
महिला चालक व वाहक तथा पुरुष चालक व वाहक यांच्यासाठी स्पेशल विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. बसस्थानकातील अधिकाऱ्यांसाठी देखील स्पेशल विश्रामगृह राहणार आहे. स्तनदा मातांसाठी स्वातंत्र्य हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय अपंग प्रवाशांसाठी स्पेशल वॉश रूम तयार करण्यात आले आहे. यांसारख्या अनेक छोट्या मोठ्या सुविधा या नव्याने सुरू झालेल्या बचत स्थानकात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Modern Bus Stand)
एसटीची जागा 30 ऐवजी 60 ते 90 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव !
राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेअंतर्गत राज्यातील 13 ठिकाणी आधुनिक सुविधांनीयुक्त बसतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार, राज्यातील 13 एसटी बस स्थानकांच्या बसतळासाठी सार्वजनिक खासगी भागिदारीअंतर्गत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या धोरणानुसार एसटी स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र, 30 वर्षांसाठी एसटीची जागा भाडेतत्त्वावर घेऊन पुन्हा इमारत महामंडळाला हस्तांतरित करावी लागणार असल्याने, या धोरणाला नापसंती दर्शवली जात आहे. त्यामुळेच आता 30 ऐवजी 60 ते 90 वर्षांसाठी एसटीची जागा भाडेतत्त्वावर देऊन ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ धोरण राबवले जाणार आहे.
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटीची आणि कर्मचाऱ्यांना वेतनासाठी निधी उपलब्ध केला जात असल्याने, एसटी महामंडळाची विस्कटलेली आर्थिक घडी सावरली जात आहे. मात्र एसटी महामंडळ अद्यापही परिपूर्णपणे स्वबळावर उभे राहिलेले नाही. (Modern Bus Stand)
वाढते शहरीकरण, अनधिकृत अतिक्रमण, खासगी प्रवासी वाहतूक, स्थानिक प्रशासनाच्या वाहतूक सेवा, एसटीमध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची अतिरिक्त जागा भाडेतत्त्वार देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी विकासक 30 वर्षे मुदतीचा भाडे करार एसटी महामंडळाशी करू महामंडळाला दरवर्षी भाडे मिळण्याची योजना होती. तसेच यात विकासकाला आवश्यकतेनुसार बांधकाम करण्याची मुभा होती. तसेच यात बस आगार, बस स्थानके यांना अडचण होणार नाही, बस स्थानकाचा दर्शनी भाग झाकला जाणार नाही, असे बांधकाम करता येणे शक्य होते. मात्र, जागा 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मिळणार असल्याने विकासकांनी पुढाकार घेतला नाही, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. (Modern Bus Stand)
बोरिवली नॅन्सी कॉलनीतील एसटीच्या 23 हजार 174 चौरस मीटर जागेचा पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे. यातून विकासकाला 30 वर्षांमध्ये एकूण 5234 कोटी रुपये नफा मिळू शकणार आहे. मात्र, 30 वर्षांनंतर आस्थापना, इमारत महामंडळाला हस्तांतरित करण्याची अट आहे. त्यामुळे भाडेतत्त्वाचा कालावधी 30 ऐवजी 60 ते 90 वर्षे करण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने परिवहन विभागाला पाठवला आहे. एसटी महामंडळाची अतिरिक्त जागा 30 ऐवजी 60 किंवा 90 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आहे.
याबाबत संबंधित प्रत्येक विभागाचे नियोजन सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाला पाठवला असून सध्या यावर काम सुरू आहे. आता महसूल विभाग जागा 30 ऐवजी 45, 60, 75 की 90 वर्षे भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे, असे परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया यांनी सांगितले. (Modern Bus Stand)