1 Breaking News Buldhana मंत्रीमंडळात वर्णी !
खासदार प्रतापराव जाधव ह्यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी !
Breaking News Buldhana : खासदार प्रतापराव जाधव ह्यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आणि कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
Buldhana विजयी चौकाराला मंत्री पदा ची झळाळी!
लोणारात कार्यकर्त्यांचा जल्लोष !
लोणार : ज्या संधीची संपूर्ण बुलढाणा जिल्हा आतुरतेने वाट बघत होता, ती केंद्रातील मंत्रीपदाची संधी खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने मिळाली आणि लोणारात महायुती च्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
या वेळची बुलढाणा लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. लोणार तालुक्यात मात्र महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी, भाजपा सह सेनेच्या कट्टर कार्यकर्त्यानी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रचार केला आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयी होत कार्यकर्त्यांना जल्लोषाची संधी मिळवून दिली.
आता खासदार प्रतापराव जाधव ह्यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आणि कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ९ जून रोजी लोणार येथे बस स्टँड चौकात तालुका भरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला. Breaking News Buldhana
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी, प्रकाशराव मापारी, राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदुभाऊ मापारी, राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भास्कर मापारी, नगरसेवक डॉ.अनिल मापारी, खामगाव अर्बन संचालक डॉ. राजेश मुंदडा, गजानन मापारी, रफिक शेठ, महेमूद शेख, अशोक वारे, प्रकाश घायाळ, देवानंद चौधरी, भाजप शहराध्यक्ष शुभम बनमेरू, गजानन मापारी, विजय मापारी, यांचे सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. Breaking News Buldhana
खासदार प्रतापराव जाधव बनणार केंद्रीय मंत्री !
शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचीही मंत्रीमंडळात वर्णी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवली. बुलढाण्याचा गड अभेद्य राखणाऱ्या प्रतापराव जाधव यांनी विजय संपादन केला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करून सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकली. त्यामुळे जाधव यांचीही केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. प्रतापराव जाधव हे सर्वात वारिष्ठ आणि सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे. खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता ? ते जाणून घेऊया.
खासदार प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास !
प्रतापराव गणपतराव जाधव यांचा जन्म बुलढाणा येथील मेहकर येथे 25 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. त्यांनी बी.ए (द्वितीय वर्ष) पर्यंत शिक्षण घेतलं आहे. शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. प्रतापराव जाधव हे एक समर्पित आणि सुलभ राजकारणी म्हणून ओळखले जातात. तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वश्रुत आहे. Breaking News Buldhana
राजकीय प्रवास
1995 ते 2009 – आमदार , मेहकर विधानसभा
1997 ते 1999 – क्रीडा राज्य मंत्री . महाराष्ट्र राज्य.
2009 – बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना कडून खासदार म्हणून निवड.
2009 ते 2024 सलग चार वेळा बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजय.
2009 ते 2024 – अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम
प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते सुरूवातीपासूनच शिवसेनेत आहे. प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधला आहे. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. Breaking News Buldhana
शिवसेनेने प्रतापराव जाधवांना 2009 साली त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी ठरले आहेत. त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे. त्यामुळे यावेळी त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातून थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत झालेला त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. Breaking News Buldhana
नव्वदीच्या दशकात त्यांनी तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे काम सुरू केले. १९८९ मध्ये बुलढाण्यात सेनेचा उदय होण्याचा तो काळ होता. त्याकाळात १४ फेब्रुवारी १९८९ रोजी मेहकरात पार पडलेली शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्यामुळे मेहकर व बुलढाणा जिल्ह्यात सेनेचे भगवे वादळ तयार झाले.
धर्मवीर स्व.दिलीप रहाटे यांचे अकाली निधन झाल्यावर सेनेची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. बुलढाणा, जलंब (जळगाव) मध्ये सेनेचे आमदार झाले मात्र पहिल्याच लढतीत प्रताप जाधव यांचा मेहकर मतदार संघात पराभव झाला. मात्र त्याने हिंमत न हारता त्यांनी जिद्दीने काम सुरू ठेवले. त्यांनी मेहकर अर्बन बँकेच्या निवडणुकीत विजय मिळविला, त्यापाठोपाठ १९९२ मध्ये देऊळगाव माळी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला.
त्यानंतर मेहकर बाजार समितीचे सभापती पद त्यांना मिळाले. जाधव यांनी १९९५ मध्ये मोठी राजकीय मजल मारली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या लढतीत विजय मिळवून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९७ मध्ये युती सरकार मध्ये क्रीडा राज्यमंत्री अन १९९८ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री झाले. नंतर १९९९ आणि २००४ च्या विधानसभेत ते मेहकर मधून विजयी झाले. आमदारकीची त्यांनी हॅट ट्रिक साधली. Breaking News Buldhana
दरम्यान २००९ मध्ये मेहकर मतदारसंघ राखीव झाला अन बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाला.यामुळे त्यांनी २००९ मध्ये बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढली. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे सारख्या मोठ्या नेत्याला पराभूत करीत ते ‘जायंट किलर ‘ ठरले. यानंतर २०१४ आणि २०१९ ची लोकसभेची लढत जिंकत विजयची हॅट्ट्रिक साधली. दिवंगत कॉंग्रेस नेते शिवराम राणे यांच्या सलग तीन विजयच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी साधली. २०२४ च्या लढतीत बाजी मारीत त्यांनी विजयाचा चौकार लगावत आपलाच विक्रम मोडीत काढला. मोदी-३ सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा विक्रम स्थापन करणारे प्रतापराव जाधव यांची राजकीय कारकीर्द म्हणजे शून्यातून मोठा राजकीय नेता अशी आहे. अडत दुकानदार, सामान्य शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्था , आमदार , मंत्री ते खासदार, आणि आता केंद्रीयमंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहिला आहे. Breaking News Buldhana