स्थानिक बातम्या

1 Breaking Panchayat; रखडलेले कामे मार्गी लावा

आ.डॉ.राजेंद्र शिंगणे : लोणार पं.स.च्या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश !

Breaking Panchayat Committee : योजना पारदर्शनकपणे राबवाव्यात असे निर्देश लोणार पंचायत समिती मधील आयोजित बैठकीत आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Panchayat Committee : प्रशासकीय कामं वेगाने करा : आ.डॉ.राजेंद्र शिंगणे

Panchayatलोणार पं.स.च्या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश !

लोणार : पंचायत समिती स्तरावर रखडलेले कामे त्वरित मार्गी लावून लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असे निर्देश लोणार पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सिंदखेडराजा मतदार संघांचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोणार तालुक्यातील जवळपास 24 गावे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदार संघात येतात. सदरील गावातील सामुदायिक सिंचन विहिरी, पांदन रस्ते, सिमेंट रस्ते तसेच शाळा Panchayatदुरुस्तीची बरीच कामे प्रशासकीय पातळीवर गेल्या काही महिन्यात रखडलेली आहेत. विकास कामांसंदर्भात लोणार पंचायत समिती मध्ये वारंवार मागणी करण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यावर काहीही कारवाई होत नसल्याने नागरिक आणि पदाधिकारी यांनी ह्या कामासंदर्भात सिंदखेड राजा मतदार संघातील आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांना सांगितले असता लोणार पंचायत समिती मधील संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत रखडलेली सर्व कामे त्वरित मार्गी लावावेत. तसेच सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बकरी शेड, गोठा बांधकाम, कुक्कुट पालन इत्यादी योजना पारदर्शनकपणे राबवाव्यात, असे निर्देश पंचायत समिती लोणारच्या सभागृहात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Panchayatगेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातील अनेक गावातील कामे रेंगाळल्याच्या तक्रारी काही सरपंच तथा कार्यकर्त्यांनी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केल्या होत्या. त्या पाश्वर्भूमीवर आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशानुसार सदर तातडीच्या बैठकीचे आयोजन गटविकास अधिकारी यांनी लोणार पंचायत समिती सभागृह येथे केले होते. सदर बैठकीला राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भास्कर मापारी, सरपंच बाळू महाजन, संदीप गायकवाड, राहुल शिंदे या पदाधिकाऱ्यासह, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच लोणार पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी, पंचायत समिती अधीक्षक, एकात्मिक बालविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, अभियंता, आरोग्य अधिकारी यांच्यासह संबधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  Panchayat Committee

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button