1 Breaking Pandharpur; पाच कोटी निधी मंजूर!
यात्रा काळात प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई..
Pandharpur : 17 जुलै बुधवार रोजी पंढरपूर आषाढी यात्रा होणार आहे. वारकऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून साडेचार कोटींचा निधी देण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Pandharpur भाविकांना दर्शन रांगेत लिंबू पाणी, एक लिटर पाणी बॉटल!
आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत लिंबू पाणी तसेच एक लिटर पाणी बॉटल देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सव्वा कोटीची निविदा काढल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मलवारी तसेच यात्रा काळात प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई व्यवस्थेसाठी राज्य शासनाने पाच कोटी निधी मंजूर केल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, यंदा डीपीसीमधून साडेचार ते पाच कोटीचा निधी वारीसाठी देण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही, पब्लिक अनान्समेंट सिस्टम, सार्वजनिक ठिकाणी लायटिंग अन् सुशोभीकरणासाठी दोन कोटीचा निधी असे एकूण साडेचार कोटींचा निधी पंढरपूर वारीसाठी मिळणार आहे. 17 जुलै बुधवार रोजी पंढरपूर आषाढी यात्रा होणार आहे. वारकऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून साडेचार कोटींचा निधी देण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. डीपीसीकडून पंढरपूर नगरपालिकेला सदर निधी देण्यात येणार आहे. प्रस्तावित निधी नगरपालिकेकडून खर्च करण्यात येणार आहे. Pandharpur
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी ‘विठू नामाचा जयघोष’ करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्राकाळात एसटी प्रवाशांसाठी पाच हजार विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी ग्रुप बुकींग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुरला आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला येतात. अनेक प्रवासी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर पायी चालत दिंडीने येत असतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 40 पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी ‘महिला सन्मान योजना’ यासारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत. Pandharpur