महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

1 Breaking : Phenomenal : भारत-ब्रिटन चर्चा

भारतात क्रिकेट ‘अभूतपूर्व’ वाढले असल्याचे नमूद करून बॅडमिंटनमधील भारताच्या प्रगतीचेही कौतुक

Phenomenal : इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत-ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा

Phenomenal Phenomenal : भारत-ब्रिटन परस्पर सहकार्य….

मुंबई, दि. 3 : सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र; तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी भारत आणि ब्रिटन मधील संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना उभय देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्याची इच्छा व्यक्त केली. आपण इंग्लंडमधील बाथ विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती असल्याचे सांगताना उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य भारत व इंग्लंड या दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल असे त्यांनी नमूद केले.

Phenomenal व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवराज एडवर्ड यांनी वर्गखोलीच्या बाहेर होत असलेले शिक्षण देखील जीवनात महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भारतात क्रिकेट ‘अभूतपूर्व’ वाढले असल्याचे नमूद करून बॅडमिंटनमधील भारताच्या प्रगतीचेही त्यांनी कौतुक केले. रविवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्याच्या नाणेफेकीचा वेळी आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Phenomenal)

सध्या अस्तित्वात असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा महोत्सवासोबतच कॉमनवेल्थ व्यवसाय महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याच्या संकल्पनेवर देखील यावेळी चर्चा झाली. प्रिन्स एडवर्ड यांचे राज्यात स्वागत करताना भारत आणि इंग्लंड ही जगातील दोन महान लोकशाही राष्ट्रे असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

भारतीय लोकांना इतर देशांच्या तुलनेत लंडनमध्ये ‘आपल्या घरासारखे’ वाटते. उच्च शिक्षण दोन्ही देशांमध्ये सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते, असे राज्यपालांनी सांगितले.  भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील शिक्षण पद्धतीशी जुळवून घेणे अधिक सोपे जाते, असेही त्यांनी नमूद केले. हरित ऊर्जा आणि औषधनिर्माण क्षेत्राबरोबरच भारताला इंग्लंडकडून हॉस्पिटल व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्याचा लाभ होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले.  इंग्लंडमधील हॉस्पिटल व्यवस्थापन प्रणाली उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.

Phenomenal राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण राज्यातील कुलगुरूंना इंग्लंडमधील विद्यापीठांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी प्रोत्साहन देऊ असेही राज्यपालांनी सांगितले. भारत आज जगातील सर्वात बलशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असून आणि भारत – इंग्लंड यांच्यातील मजबूत व्यापार संबंध इतर अनेक क्षेत्रांतील संबंध बळकट करण्यास साहाय्यभूत ठरतील, असे राज्यपालांनी सांगितले. भारत आणि इंग्लंड यांच्यात मुक्त व्यापार करार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (Phenomenal)

भारतात क्रिकेटशिवाय फुटबॉल खेळ अतिशय लोकप्रिय असून, देशात फुटबॉलला अधिक चालना देण्यासाठी इंग्लंडने भारताला मदत करावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. बैठकीला ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खाजगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल उपस्थित होते.

Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button