महाराष्ट्र

1 Breaking Promotion of Teachers on Performance

आता सेवाज्येष्ठता विसरा, शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती !

Promotion of Teachers on Performance : शालेय शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू, भविष्यात सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळणार नसून कार्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवरच पदोन्नती.

आता सेवाज्येष्ठता विसरा, शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती !

शालेय शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने एकेक तरतुदी लागू केल्या जात आहेत. उर्वरित तरतुदी लागू झाल्यास भविष्यात शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळणार नाही. त्यांनाही कार्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवरच पदोन्नती दिली जाईल. यासोबतच शिक्षकांच्या बदल्याही बंद होणार आहेत.

Promotion of Teachers on Performance

केंद्र सरकारने 2020 साली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केले. मात्र, कोरोनामुळे या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गतवर्षी पदव्यूत्तर स्तरावर हे धोरण लागू झाले. येत्या वर्षात पदवीस्तरावरही त्याची पूर्ण अंमलबजावणी सुरू होणार आहे. दुसरीकडे शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींची टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. यंदा काही तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. यंदापासून आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे उर्वरित तरतुदीही हळूहळू लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे झाल्यास शिक्षकांना सेवाज्येष्ठतेऐवजी कामगिरीच्या आधारावरच पदोन्नती मिळू शकणार आहे.

Promotion of Teachers on Performance

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी ) च्या 5 व्या प्रकरणात मुद्दा क्रमांक 15 ते 21 यामध्ये याबाबत सविस्तर उल्लेख केलेला आहे. यात म्हटले आहे की, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांना पदोन्नती दिली पाहिजे. तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्यांना  प्रोत्साहन देण्यासाठी पगारवाढ दिली पाहिजे. कार्यकाळ, पदोन्नती आणि वेतनमान यांचा समावेश असलेली, शिक्षकांच्या प्रत्येक टप्प्यावर एकाहून अधिक स्तर असलेली आणि उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानित करणारी गुणवत्तेवर आधारित सशक्त व्यवस्था विकसित केली जाईल.

कामगिरीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी अनेक मापदंडांची, पॅरामीटर्सची यंत्रणा राज्य शासनाद्वारे विकसित केली जाईल. हे मूल्यांकन सहकाऱ्यांद्वारे केले जाईल. उपस्थिती, वचनबद्धता तास आणि शाळा व समाजासाठी केलेली इतर प्रकारची सेवा यावर आधारित असेल. कार्यकाळ किंवा वरिष्ठता याच्या आधारावर पदोन्नती किंवा पगारवाढ होणार नाही. तर ती फक्त अशा प्रकारच्या मुल्यांकनाच्या आधारावर केली जाईल, असेही यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

Promotion of Teachers on Performance

सध्या ठराविक कालावधीनंतर शिक्षकांच्या बदल्या होतात. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार या बदल्याही बंद होणार आहेत. तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना दरवर्षी प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार असून दरवर्षी ते किमान 50 तासांचे असणार आहे.

राज्यातील शैक्षणिक स्थिती

एकूण शालेय विद्यार्थी – 1 कोटी 96 लाख 56 हजार 858

मुले – 1 कोटी 3 लाख 28 हजार 350

मुली – 93 लाख 28 हजार 508

राज्यातील एकूण शिक्षक – 10 लाख

Promotion of Teachers on Performance

विद्यापीठच्या 40 विभागाच्या चाव्या केवळ 11 प्राध्यापकांकडे !

Teachersसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 55 विभाग आणि 28 केंद्र अशा एकूण 83 शैक्षणिक आस्थापना आहेत. त्यातील सुमारे 30 विभाग आणि केंद्र यांचा विभाग प्रमुख, संचालक, समन्वयक पदांचा कार्यभार केवळ 7 प्राध्यापकांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच काही विभाग प्रमुखांकडे चार चार विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी नवीन नेतृत्व मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसत आहे. त्यामुळे एका व्यक्तीस एकच पद देण्याचा धोरणात्मक निर्णय विद्यापीठाने घ्यावा,अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या 23 मार्च रोजी होणार आहे. त्यात विविध प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. त्यात या प्रस्तावाचा समावेश आहे. विद्यापीठात 200  हून अधिक अध्यापक असताना व त्यापैकी 10 ते 15 वर्षांचा अनुभव असणारे अध्यापक असताना बऱ्याचशा विभाग व केंद्रात उपलब्ध असताना त्यांना डावलून सुमारे 11 अध्यापकांकडे 40 विभागांचा पदभार सोपवण्यात आला आहे.

Promotion of Teachers on Performance

यामुळे अनेकांना दिलेल्या जबाबदारीस न्याय देणे शक्य होत नाही. त्याचा विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे केल्याने विद्यापीठात काही व्यक्तीकडे सत्तेचे केंद्रीकरण होत असून ही विद्यापीठाच्या प्रगतीस घातक आहे. विद्यापीठात प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी विद्यापीठात झालेले हे सत्तेचे केंद्रीकरण थांबवावे आणि विद्यापीठातील प्रत्येक शैक्षणिक विभाग व केंद्राच्या प्रमुख पदावर जास्तीत जास्त एक पूर्णवेळ पद द्यावे, अशी मागणी अधिसभा सदस्य हर्ष जगझाप यांनी केली आहे.

Promotion of Teachers on Performance

शिक्षक बदल्यांची तयारी सुरू, मात्र आचारसंहिता आडवी येणार !

Teachers पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, या शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागाच्या आदेशाला बगल देत प्राथमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना पदस्थापना दिली. त्यानंतर तीन दिवसांनी आता बदलीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र या बदल्यांत आचारसंहितेत अडसर येणार असून लोकसभेनंतर बदल्यांना मुहूर्त लागणार आहे.

Promotion of Teachers on Performance

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 12 मार्च रोजी पवित्र पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या 143 शिक्षकांना नियुक्त्या दिल्या. मात्र शासन निर्णयानुसार आधी जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया होणे गरजेचे होते, अशी शिक्षक संघटनांची मागणी होती. शालेय शिक्षण विभागाने 6 मार्चला व नंतर ग्रामविकास विभागाने 11 मार्च 2024 ला तसे पत्र काढून शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची संधी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळवले होते. मात्र या पत्राला बगल देत शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या 143 शिक्षकांना नियुक्त्या  दिल्या. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा काहिशा भरल्या असल्या तरी कार्यरत शिक्षकांना नियमाप्रमाणे बदलीची संधी देणे गरजेचे होते, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

Promotion of Teachers on Performance

दरम्यान, आता तीन दिवसांनंतर शिक्षण विभागाने शालेय शिक्षण व ग्रामविकास अशा दोन्ही विभागांच्या पत्राची दखल घेत बदल्यांची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी 14 मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळवून विनंती बदल्यांच्या अनुषंगाने शिक्षकांचे अर्ज व आवश्यक माहिती संकलित करण्यास सांगितले आहे. परंतु आता लोकसभेच्या आचारसंहिता असल्याने या बदल्या निवडणुकीनंतर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Promotion of Teachers on Performance

तोपर्यंत करता येणार बदल्यांची तयारी !

आचारसंहितेत बदल्या होणार नसल्या तरी बदल्यांची आवश्यक ती तयारी या काळात तालुकास्तरावर करता येणार आहे. केंद्रप्रमुखांनी बदलीसाठी इच्छूक शिक्षकांचे अर्ज मागवून घेणे, तसेच संवर्ग 1 व 2 मध्ये बदलीची मागणी असेल तर प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे, सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, त्यावर हरकती घेऊन यादी अंतिम करणे ही तयारी या काळात होऊ शकते. त्यामुळे आचारसंहितेनंतर लगेच बदल्यांची प्रक्रिया राबवता येऊ शकते. त्या अनुषंगानेच शिक्षक विभागाने हे पत्र काढले असल्याचे दिसत आहे.

Promotion of Teachers on Performance

राज्यातील शाळेतील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार !

Teachersराज्यातील शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार आहे. याबाबत शासनाने नियमावली तयार केली आहे. शिक्षकांनी आता कुठले कपडे घालावेत, याबाबत शासन नियमावली जाहीर करणार आहे. शाळेतील सर्व शिक्षकांनी सारखा ड्रेस घालावा, असे पत्रकामध्ये म्हटलं आहे. शिक्षकांच्या कपड्याचा रंग कुठला असणार हे शाळा ठरवणार असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील शाळांमध्ये ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे घालता येणार नाहीत. शाळेतील सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने निश्चित केलेले कपडे परिधान करावे लागतील. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा पेहराव असावा. तर पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन असावा तसेच गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Promotion of Teachers on Performance

एकीकडे राज्य सरकारने शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू केला असेल तरी दुसऱ्या बाजुला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr) आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या  वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Promotion of Teachers on Performance

डी.एड., बी.एड. पूर्ण भरतीच नाही, भावी शिक्षकांचा जीव टांगणीला !

Teachersगेल्या काही वर्षांमध्ये राज्यात शिक्षण भरती झाली नाही. काही दिवसांपूर्वी शासनाकडून शिक्षण भरती जाहिर केली. मात्र, सहा ते सात वर्षांपासून उमेदवार हे या भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात 67 हजार रिक्त पदे आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी असल्याने परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. डी.एड. आणि बी.एड. पूर्ण करुन उमेदवारांना वाट पाहावी लागत आहे. अनिवार्य असलेली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली गेली. त्यामध्ये 2 लाख 16 हजार 443 उमेदवार उत्तीर्ण झाली. हेच नाही तर गुणवत्ता यादी देखील जाहीर करण्यात आली.

केवळ 11 हजार जागा भरण्यात आल्या. या गुणवत्तांना न्याय म्हणून नाही तर राज्यातील जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा कमी  शिक्षकांवर होत्या. 25  टक्के पदांची प्रक्रिया सुरू केली.  50 हजार शिक्षकांची भरती होणार असे आव्हान देखील सरकारकडून करण्यात आले होते. सतत शिक्षक भरती होत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे.

Promotion of Teachers on Performance

राज्यातील विद्यार्थी शिक्षकांविना असल्याचे देखील बघायला मिळतंय. 6 आक्टोंबर 2023 आणि 23 जानेवारी 2024 खाजगीकरण विरोधी हजारो गुणवत्ता पुर्ण बेरोजगारांनी मोर्चे काढले. परिणामी राज्यसरकारने माघार घेत खाजगीकरणाचा जीआर मागे घेतला. राज्यातल्या प्रत्येक सर्व परीक्षा उत्तीर्ण असलेला बेरोजगार तरुण शालेय शिक्षण विभागाच्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे देखील काही परीक्षार्थिनी म्हटले.

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांची शेवटी आता प्रतिक्षा संपल्याचे दिसले. मात्र, उमेदवारांची संख्या जास्त आणि जागा अत्यंत कमी भरल्या जात आहेत.

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx  या साईटवर तुम्हाला भरतीची माहिती मिळेल. पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावर शिक्षक भरतीची सर्व माहिती ही आपल्याला मिळेल. राज्यात सध्या डी.एड. आणि बी.एड. धारकांची संख्या अधिक आहे आणि त्या तुलनेत जागा अत्यंत कमी प्रमाणात भरल्या जात असल्याने नक्कीच उमेदवारांमध्ये संताप हा बघायला मिळतोय.

Promotion of Teachers on Performance

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button