कृषी

1 Breaking Raigad शेतकरी झाला हताश !

Raigad : अवकाळी पावसाचा रानमेव्यावर घाळा !

Raigad : रानमेवा उत्पादनावर परिणाम झाला असल्याने खेडयातील शेतकरी व वाडयांतील आदिवासी हताश !

Raigad अवकाळी पावसाचा रानमेव्यावर घाळा; खेड्यातील शेतकरी झाला हताश !

Raigadरायगड : सध्याच्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम यंदाच्या वर्षी रानमेव्यावर झाला असल्याचे दिसत आहे. या वर्षी अवकाळी पाऊस झाल्याने एकतर पिक कमी आले. याचा दुष्परिणाम जांभूळ, करवंद, राजण, अटूर्ण-पिटूर्णसह काजु या रानमेव्यावर झालेला आहे. या वर्षी पिक कमी आले आणि रानमेवा उत्पादनावर परिणाम झाला असल्याने खेडयातील शेतकरी व वाडयांतील आदिवासी हताश झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील अनेक डोंगर भागात आदिवासी वाडया आहेत. यातील अनेक आदिवासी बांधवाना खास असे उपजिवीकेचे साधन नाही. या आदिवासी वाडयांतील बांधवांना आणि खेडयातील काही शेतकऱ्यांना ऊन्हाळयात जाम, जांभळ, करवंद, आंबे, काजु आदि जंगलातील रानमेवा विकुन घर खर्चाला दर वर्षी चांगला आधार होत असतो. मात्र या वर्षी रानमेव्याचे पिक कमी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह आदिवासी काळजीत पडले आहेत. Raigad

Raigadमागील वर्षी पाऊस चांगला झाला. त्यानंतर थंडीही चांगली पडली. फळ झाडांना मोहर येत असताना ढगाळलेले हवामान, पडणारे धुके, आणि आवकाळी पाऊस या खराब हवामानाचा झाडांना मोहोर येताना परिणाम झाला आहे. यामुळे या वर्षी रानमेव्याचे पिक कमी आले आहे. जिल्हाभरातील काही बाजार पेठेत जांभळ, काजु विक्रीसाठी येऊ लागले आहे. बाजार पेठेत कमी प्रमाणात जांभळे, काजु हा रानमेवा विक्रीसाठी येत असल्याने जांभळाला किलोला सुमारे शंभराहून अधिक रूपये भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. मात्र थोडया दिवसात जांभळांची आवक वाढेल आणि घसरता भाव मिळेल असेहि  सांगण्यात आले.

Raigadफेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा व्यवसाय रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात. या वर्षीही रानमेवा काजूगर, रांजणे, करवंदे, जांभळे, काजू बाजारात दाखल झाले आहेत. ओले काजूगर सातशे रुपये किलो तर काजूचा वाटा शंभर रुपये असा विकला जात आहे. मात्र पाहिजे तसा रानमेवा पिक आले नसल्याने शेतकरी व आदिवासी बांधव चिंतेत आहे.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button