राष्ट्रीय

1 Breaking Railway प्रवाशांसाठी महत्त्वाचे !

Railway Annousment : अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे कडून महत्त्वाचे निर्णय

Railway Breaking अयोध्येतील ‘राम मंदिर उद्घाटन’ प्रसंगी भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी महत्त्वपूर्ण योजना आखली असल्याची माहिती सूत्रांकडून  समोर आली आहे.

राम मंदिर उद्धाटनापासून पहिल्या 100 दिवस देशाच्या विविध भागातून 1 हजारांहून अधिक रेल्वे  Railway आयोध्येला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या गाड्यांचे संचालन ‘राम मंदिर उद्घाटन’ सोहळ्याच्या काही दिवस आगोदर म्हणजे शुक्रवारी 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मंगळवारी 23 जानेवारीपासून हे मंदिर लोकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Railway रेल्वेच्या 1 हजारांहून अधिक गाड्या देशभरातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मू काश्मीर अशाप्रकारे  विविध प्रदेश आणि शहरांसह अयोध्येला जोडतील. तसेच प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे देखील भारतीय रेल्वेने स्पष्ट केले असल्याचे सूत्रांनी कडून माहिती मिळाली आहे.

Railwayअयोध्येत मोठ्या संख्येने पायी येणा-जाणाऱ्यांची सोय करण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच दररोज सुमारे 50000 लोकांची ये-जा हाताळण्याची क्षमता असलेले पुनर्विकसित स्टेशन 15 जानेवारीपर्यंत पूर्णपणे तयार होईल, असे एका सूत्राने सांगितले आहे. तर आतापर्यंत काही गाड्या यात्रेकरूंच्या गटाकडून अयोध्येसाठी चार्टर्ड सेवा म्हणूनही बुक केल्या जात आहेत, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च करण्यात आली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरु झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जात आहे. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देखील दाखवला जात आहे. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राला सुद्धा सहा वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. या गाडीची लोकप्रियता पाहता आगामी काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. मात्र या गाडीसाठी आकारले जाणारे तिकीट दर हे खूपच अधिक आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही रेल्वेगाडी Railway सुरू झालेली नाही अशी  चर्चा  केली जाते.

महागड्या तिकीट दरामुळे इच्छा असूनही सर्वसामान्यांना या Railway  गाडीने प्रवास करता येत नाही.त्यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे साधारण ट्रेन सुरू केली जाणार आहे. वंदे साधारण एक्सप्रेस मात्र नॉन एसी गाडी राहणार आहे. दरम्यान या वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेनला अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. या अमृतभारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच सोयीसुविधा राहणार आहेत. मात्र ही गाडी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरली जाणार आहे. 800 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या मार्गावर अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन Railway चालवली जाईल अशी माहिती समोर आली आहे.

Railwayविशेष म्हणजे ही Railway गाडी दिवसा आणि रात्री चालवली जाणार आहे. सध्याची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन फक्त दिवसा चालते. पण अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ही दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत चालवता येणार आहे. या गाडीत 12 स्लीपर आणि आठ अनरिझर्व कोच राहणार आहेत. तसेच दोन कोच लगेजसाठी राहणार आहेत. या ट्रेनमध्ये जवळपास एक हजार आठशे प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. अशा परिस्थितीत या गाडीचे तिकीट दर किती राहणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशातील सर्वसामान्यांना लक्षात ठेवून सुरू होणारी ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन Railway सर्वसामान्यांना परवडणार आहे. या गाडीचे तिकीट दर वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी राहतील आणि प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेस सारखाच अनुभव घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चे तिकीट दर हे सर्वसामान्य एक्सप्रेस ट्रेन पेक्षा पंधरा टक्के अधिक राहणार आहेत. ही गाडी राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या धरतीवर चालवली जाणार असून या गाडीचा कमाल वेग हा 130 किलोमीटर प्रतितास एवढा राहणार आहे. या गाडीचा कलर केशरी आणि राखाडी रंगाचा राहणार आहे. या गाडीचे इंजन वंदे भारत एक्सप्रेस सारखेच राहील पण ही गाडी नॉन एसी राहणार आहे. सध्याची वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण एसी गाडी आहे.

पश्चिम रेल्वेवर 350 तिकीट तपासनीसांची फौज !

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यासह इतर डब्यात विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढली असल्याची माहिती सूत्रांनी कडून मिळत  आहे. विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे तिकीट तपासणी वाढवण्याबाबत सतत तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. प्रवाशांची गैरसोय आणि मागणी पाहता  तिकीटधारक प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम वाढवली असून दररोज साडेतिनशेहून अधिक तिकीट तपासनीसांची फौज पश्चिम रेल्वेवरील स्थानकांत तैनात करण्यात आली आहे.

Railwayपश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांवर विनातिकीट प्रवाशांचा वावर वाढला असल्याचे बोलले जाते. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत असल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत स्थानकातील फलाट, पादचारी पूल, स्थानकाचे प्रवेशद्वार याठिकाणी तिकीट तपासनीसांची फौज उभी करण्यात येते.

अंधेरी येथे 12 डिसेंबर रोजी अंधेरी येथे ही मोहीम राबवून 999 विनातिकीट प्रवाशांना पकडून 2,65,111 रुपयांची दंडवसुली केली. तर 14 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात तिकीट तपासणी सुरू होती. लोकलमधून प्रवासी फलाटावर उतरल्यावर त्यांचे त्वरीत तिकीट तपासले गेले. त्याचबरोबर पादचारी पुलावर दोन-दोन फुटांच्या अंतरावर तिकीट तपासणी कर्मचार्यांनी  प्रवाशांची तिकिटे तपासली. सकाळी 8 ते दुपारी 4 आणि दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत 2595 विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 6,82,335 रुपयांची दंडवसुली केली. याप्रमाणे चर्चगेट ते विरार लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button