महाराष्ट्रराजकीय

1 Breaking : Film Industry : विशेष न्यायाधिकरण

लहान कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी ड्राफ्ट तयार करण्यात येणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

Film Industry  : राज्यातील लहान कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही : कामगार मंत्री आकाश फुंडकर

Film Industry Film Industry : लहान कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करू – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. 28 : चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी 28 जानेवारी रोजी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Film Industry चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी व्ही असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते. यावेळी चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर संदर्भात चर्चा झाली.

Film Industry कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, राज्यातील लहान कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर लहान कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी ड्राफ्ट तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

Subcribe To Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button