1 Breaking Sultanpur रस्ता रोको आंदोलन यशस्वी !
वंचित नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये हजारो महिला व पुरुष आंदोलनामध्ये सहभागी !
Sultanpur : वंचित नेते तथा ग्रामपंचायत सदस्य नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये अखेर उशिरापर्यंत डफडे वाजवून चाललेले रस्ता रोको आंदोलन यशस्वी !
Sultanpur वंचित नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये हजारो महिला व पुरुष आंदोलनामध्ये सहभागी !
Sultanpur अखेर उशिरापर्यंत डफडे वाजवून चाललेले रस्ता रोको आंदोलन यशस्वी !
सुलतानपूर ग्रामपंचायत सरपंच पती यांचा कार्यालयीन कामात हस्तक्षेप आणि विविध विकासकामांमधील भष्ट्राचार संदर्भात तसेच मनमानी कारभार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या विविध मागण्यांसाठी वंचित नेते नागवंशी संगपाल पनाड यांच्या नेतृत्वात 10 जून रोजी मुंबई – नागपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोणार तालुक्यातील सुलतानपूर ग्रामपंचायत ही लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी दरवर्षी करोडो रूपयांचा निधी येतो. परंतु सरपंच पती यांच्या मनमानी कारभारामुळे व राजकीय दोष भावनेमुळे ज्या वार्डामध्ये विकास कामे करण्याची खरी गरज आहे, त्याठिकाणी विकासकामे होत नाहीत. ज्या ठिकाणी अगोदर विकास कामे झाली आहेत, परत त्याचठिकाणी जाणून-बुजून विकासकामे केली जातात. सुलतानपूर येथील वार्ड क्र.1,2,6 मध्ये जाणून-बुजून राजकीय व्देष भावनेतून विकास कामे न करणाऱ्या व आलेल्या निधीचा गैरवापर करून बोगस काम करणाऱ्या सरपंचाला निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. Sultanpur
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी ह्या मनमानी कारभार करत असल्यामुळे गरीब नागरिकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी खाजगी हॉस्पिटल मध्ये जावे लागत आहे. गरीब रुग्णांची होणारी हेळसांड पाहता सदर वैद्यकीय अधिकारी यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सुलतानपूर गावांमध्ये भयंकर पाणीटंचाई असून नळाला येणारे पाणी हे 20 ते 25 दिवसांनी येते. पाणी टंचाई असताना सरपंच यांच्याकडून पाण्यासाठी कुठलीच उपाययोजना केली जात नाही. तसेच विद्यमान सरपंच पती हेमराज लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या दहा-पंधरा वर्षा अगोदर सुलतानपूर येथे अंदाजे दोन कोटी रुपयांची महाजल योजनेचे काम झाले होते. परंतु ते कागदोपत्री दाखवून करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार त्या कामामध्ये झालेला आहे. त्यामुळे सुलतानपूर रहीवाशियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तसेच सुलतानपूरसह पाच गावांमध्ये 22 कोटी रुपयांचे जलजीवन मिशन योजनेचे काम सध्या चालू आहे. परंतु सदरील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे म्हणजे त्या कामामध्ये माती मिश्रित डस्टच्या साह्याने टाकीचे काम होत आहेत. दीड ते दोन फुटावर पाईप टाकून बोगस पद्धतीने कामे करण्यात येत आहेत. केवळ पदाधिकाऱ्याच्या टक्केवारीमुळे बोगस काम होत असल्याचे दिसून येत आहे. महाजल प्रमाणे हे काम न होता अंदाज पत्रकानुसार व्हावे व झालेले बोगस काम जमीनदोस्त करण्यात यावे. अशी मागणी हि निवेदनातून करण्यात आलेली आहे. Sultanpur
दलित वस्ती अंतर्गत वीस लाख रुपयांचे सिमेंट रस्त्याचे काम वार्ड क्रमांक 5 मध्ये करण्यात आले. परंतु हे काम अंदाजपत्रकानुसार न करता अत्यंत बोगस पद्धतीने करण्यात आले. आज रोजी त्या रस्त्याला तडे जाऊन अनेक ठिकाणी रोड उखडला आहे. त्यामुळे बोगस काम करणाऱ्या ठेकेदार अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. सदरील विविध मागण्यांचे निवेदन लोणार पंचायत समिती, बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय यांना देण्यात आलेले आहे.
तसेच सरपंच पती यांचा अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरपंच यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. अशा विविध मागण्यांच्या संदर्भात व ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभाराविरोधात सुलतानपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मुंबई- नागपूर हायवे वर वंचित नेते नागवंशी संघपाल पनाड व ईतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वामध्ये डफडे वाजवून रस्ता रोको आंदोलन 10 जून रोजी करण्यात करण्यात आले. Sultanpur
वंचित नेते तथा ग्रामपंचायत सदस्य नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये अखेर उशिरापर्यंत चाललेले डफडे वाजून रस्ता रोको आंदोलन यशस्वी झाले असून वार्ड क्रमांक 1 मध्ये 13 लाख रुपये सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व इतर मागण्या संदर्भात बाहेरील तालुक्यातील चौकशी समिती नेमून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. आंदोलनाच्या मागण्या संदर्भात चर्चा करून सर्व मागण्या मान्य करत समस्या मार्गी काढण्यासाठी लोणार पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आपला रोष व्यक्त करण्यासाठी हजारो महिला व पुरुष आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी युवा नेते अनित्य घेवंदे, शेख अख्तर भाई, मा.सरपंच सलीम शेठ, मा.सरपंच पुरूषोत्तम गाडेकर, डॉ.राम कडूकर, संतोष पाटील, संतोष शिंदे, शे.अमीर भाई, शंकर निलक, सद्दाम भाई, भारत पनाड, अनंथा टकले, असीम भाई, साबेर भाई, रोशन भाई, सम्मद भाई, गजानन जुमडे, अफजल भाई, सुबान भाई, चॅंदभाई वार्ताहर, मोबिन भाई, अन्सार शाह, वाजीद भाई, जावेद भाई उपस्थित होते. Sultanpur
तसेच नामदेव पनाड, मनोहर पनाड, श्रीराम पनाड, बबन पनाड, नागशेन पनाड, अतीष पनाड, गजानन पनाड, महेश मोरे, कळणू जावळे, पारस पनाड, बिंबिसार पनाड, सुनिल शेजूळ, संजय शेजूळ, शिवाजी खोलगडे, राजहंस जावळे, रामा पनाड, आकाश घेवंदे, संदेश पनाड, महेंद्र पनाड, भुषण जावळे, आकाश पनाड, अमोल आनंदराव, दिपक आनंदराव, सुमनबाई पनाड, सिधूबाई पनाड, शोभाबाई घेवंदे, छायाबाई पनाड, केशरबाई गवई, जिजाबाई वाकळे, अलकाबाई पनाड, शांताबाई पनाड, शकुंतलाबाई जावळे, ताईबाई पनाड, अस्मिता पनाड यांच्यासह हजारो नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलनामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणेदार, बिट जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचार्यांनी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. Sultanpur