महाराष्ट्रस्थानिक बातम्या

1 Breaking Summer Adverse Effects on Health !

मुंबईकरांना लागल्या घामाच्या धारा !

1 Breaking Summer Adverse Effects on Health ! : पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च रोजी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे.

उन्हाच्या तीव्रतेने प्राण्यांच्या जिवाचीही‌ काहिली !

उष्णतावाढीचा परिणाम जनजीवनावर झाला असून लोणार तालुका परिसरातील वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणीही सैरभैर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारी रणरणत्या उन्हात वनक्षेत्र असलेल्या रस्त्यावर दुचाकीस्वारांना वानर, निलगाई यांचा  कळप सैरभैर होताना दिसला. भर उन्हात मुक्या प्राण्यांची पाण्यासाठी होत असलेली काहिली खूप काही सांगून जात आहे. वाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांनादेखील उष्माघाताचा त्रास होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. Summer Adverse Effects on Health !

वन विभागाने वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यंदा सर्वाधिक तापमान असल्याचे मत व्यक्त केल्या जात आहे. अत्यल्प पावसामुळे यंदा अनेक भागातील वन‌क्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक आहेत. एरवी भक्ष्यासाठी भटकंती करणारे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झालेले दिसून येत आहेत. वन्यप्राणी असलेल्या भागात भक्ष्य आणि पाण्यासाठी बिबटे गावकुशीकडे धाव घेत असल्याचे गावकरी सांगत आहेत. ऐन पावसाळ्यातही वनक्षेत्रातील पाणवठे कडे संबधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

एरवी शिकारीच्या शोधार्थ फिरणारे बिबटे, तडस यांसारखे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगत आहेत. शिवाय वानरे, कोल्हे, ससे यांसारखे प्राणीही आपली तृष्णा कशी भागवत असतील, असा प्रश्न प्राणीप्रेमींनी उपस्थित केला आहे.

Summer Adverse Effects on Health !

Summer वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवारच काय गावकुशीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. शेतशिवारात शेतकरी पाळीव प्राण्यांसाठी पाण्याचे हौद बांधून ठेवतात. त्याच ठिकाणी वन्यपशू तहान भागवत असतील हे कोणीही सहज सांगणार आहे. कारण वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नाही. मग अशा वेळी रात्री अंधाराचा फायदा घेत वन्यप्राणी आपली वेळ निभावून नेत असल्याचे वास्तव आहे.

भविष्यात अशीच स्थिती राहिली तर दुर्मिळ आणि  वन विभागाची शान असलेले वन्यप्राणी नामशेष होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यंदा अगदी मार्चच्या आरंभापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सद्यःस्थित तर वन्यपशूंची तहान भागविण्यासाठी रात्रीची भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतशिवारातील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांनी आपली तृष्णा हमखास भागवावी, पण पाळीव प्राण्यावर हल्ला करू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात.

Summer Adverse Effects on Health !

लोणार तालुक्यात हजारो हेक्टरवर वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात ससा, हरणे, कोल्हे, लांडगे, तडस, वानरे, बिबटे यांसारखे वन्यपशू, तर मोर, तितर, कबुतरे यांसारखे अनेक पक्षी आहेत. यंदा ऐन पावसाळ्यातही पाणवठ्यात पाणीसाठा नव्हता. आता तर कुठेच पाण्याचा टिपूस नाही. यामुळे पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू गाव किंवा शेत परिसरात येतात किंवा स्थलांतर करतात. स्थलांतर करून ते पशु-पक्षी जातील तर कुठे, हाही प्रश्न आहेच. दर वर्षी वन्यपशूंची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. असे असेल तर जंगल संपत्तीच्या संवर्धनाबरोबरच पशु-पक्ष्यांचेही संवर्धन होणे आवश्यक असल्याचे निसर्ग, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही.

Summer Adverse Effects on Health !

Summer पंजाब डख : उष्णता वाढल्यामुळे पुन्हा वादळी पाऊसाची शक्यता !

ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. पंजाब डख हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच हवामान अंदाज देत असतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा त्यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा त्यांच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, पंजाबरावांनी नुकताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज दिला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे. खरेतर, भारतीय हवामान खात्याने देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, आज पासून अर्थातच 29 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंतच्या तीन दिवसांच्या काळात राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. Summer Adverse Effects on Health !

आय.एम.डी. ने सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात कोकण विभागात 29 आणि 30 मार्चला अवकाळी पावसाचा तडाका पाहायला मिळू शकतो. मध्य महाराष्ट्रात 29 आणि 30 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील 29 आणि 30 मार्चला अवकाळी पाऊस बरसणार असे हवामान खात्याने यावेळी म्हटले आहे. दुसरीकडे विदर्भ विभागात मात्र 29 मार्च पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने यावेळी दिला आहे.

दरम्यान आता आपण पंजाबरावांनी कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आणि कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार ? याविषयी दिलेला सविस्तर हवामान अंदाज अगदी तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च रोजी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. म्हणजेच या कालावधीत जोराचा पाऊस पडणार नाही तर विखुरलेल्या स्वरूपाचा अन अगदी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. Summer Adverse Effects on Health !

सर्वदूर पाऊस पडणार नाही तर त्या भागातील एखाद्या जिल्ह्यात पाच-सहा ठिकाणी पाऊस पडेल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या परिसरात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. परंतु खूप मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

मराठवाड्यातील परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर इत्यादी भागात या कालावधीमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. दुसरीकडे पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण इतर भागापेक्षा काहीसे अधिक राहू शकते. तसेच एप्रिल महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने होणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घेतली पाहिजेत. कारण की 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल ला राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यावेळी मात्र अवकाळी पावसाची तीव्रता काहीशी अधिक राहणार आहे.

Summer Adverse Effects on Health !

मुंबईकरांना लागल्या घामाच्या धारा !

Summer गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. कमाल तापमान सरासरी 32 ते 35 च्या घरात असल्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे या उन्हाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे या कडक उन्हात काम करताना नागरिकांना निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन)   त्रास होऊन चक्कर येण्या सारखे प्रकार घडण्याची शक्यता असल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी येणारा उन्हाळा आरोग्याच्या अनेक समस्या घेऊन येत असतो. डिहायड्रेशन, चक्कर येणे, हाता पाय दुखणे, पोटात मळमळणे, मूत्रविकाराच्या समस्या, किडनी स्टोन, उलट्या, जुलाब या आरोग्याच्या समस्यांना नागरिक आणि लहान मुलांना सामोरे जावे लागते. अनेक नागरिकांना या तापमानाचा प्रचंड त्रास होत असतो. मात्र अनेकजण त्या उन्हातही आपली नियमित कामे करत असतात. आपल्याकडे खरा उन्हाळा सुरू होतो तो म्हणजे एप्रिल पासून मात्र त्याआधीच तापमानात मोठे बदल झाल्याने नागरिकांची अंगाची लाही होत आहे. त्यामुळे मे-जून महिन्यामध्ये काही परिस्थिती अत्यंत बिकट असण्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. दुपारच्या काळात फिरणे अवघड झाले आहे. Summer Adverse Effects on Health !

मुंबईत आद्रता मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना घाम मोठ्या प्रमाणात येतो. त्यामध्ये अनेक महिला आणि पुरुष कामाकरिता मोठा वेळ प्रवास घालवितात. ते अनेक जण लघवीला जावे लागते म्हणून जास्त पाणी पीत नाही, मात्र ते चुकीचे असून सर्वांनीच मुबलक प्रमाणात पाणी गरजेचे असते. कारण आजही आपल्याकडे चांगले सार्वजनिक शौचालये नाहीत. जी आहेत त्यामध्ये अनेक जण जायला मागत नाही कारण त्यामध्ये कमालीची अस्वच्छता असते. या अशा विदारक परिस्थितीत नागरिक आपली दिनचर्या करत असतात. मात्र शरीराला पाणी कमी मिळाल्यामुळे त्याचा पचनप्रक्रियेवर परिणाम होत असतो. Summer Adverse Effects on Health !

उन्हाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेकांना या वातावरणात फार भूक लागत नाही. त्यामुळे जेवण टाळले किंवा कमी केले जाते. विशेष म्हणजे या काळात हलका स्वरूपचा आहार नागरिकांनी घेतला पाहिजे. उन्हापासून प्रतिबंध करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. कारण कडक उन्हात नागरिकांना कधी चक्कर येईल सांगता येत नाही. त्यामुळे या काळात भरपूर पाणी प्यावे. आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने कोणतेही औषध घेऊ नका ते धोकादायक ठरू शकते. असा सल्ला डॉ. भास्कर मापारी यांनी दिला आहे.

Summer Adverse Effects on Health !

उन्हाळयात काय काळजी घ्याल !

– या काळात म्हणजे 2-3 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.

– नारळ, ताक, दही, लस्सीचे सेवन करावे.

– ताज्या फळाचा ज्यूस घ्यावा. फळे कापून खावीत.

– रस्त्यावरचे पाणी, सरबत शरीरासाठी हानीकारक आहे. ते पिऊ नये.

– लिंबू पाणी प्यावे. चक्कर आल्यास, ओआरएसचे पाणी प्यावे.

Summer Adverse Effects on Health !

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button