1 Breaking -Teacher’s Day उत्साहात साजरा
इंदिरा गांधी उर्दु हायस्कूल मध्ये शिक्षकदिनी कार्यक्रमांचे आयोजन
Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिक्षक दिन साजरा केला.
Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
लोणार : स्थानिक इंदिरा गांधी उर्दु हायस्कूल लोणार येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख मनसब खान हे होते. तसेच विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रिझवान खान (जड्डा) हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
सदरील कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपले अमूल्य विचार व मनोगत व्यक्त केले. तसेच लुकमान कुरेशी व मुख्याध्यापक शेख तौफिक यांनी देखील विद्यर्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक ही केले.
यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयम शासनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापकाच्या भूमिकेत वर्ग 10 वीचा विदयार्थी होता. त्याचबरोबर शिपाई च्या भूमिकेत वर्ग ९ चा विद्यार्थी होता. अनेक विद्यार्थी तथा विद्यार्थिनी शिक्षकांच्या भूमिकेत सहभागी झाले होते.
इंदिरा गांधी उर्दु हायस्कूल लोणार येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग पाहता कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अब्दुल खालिक, तसलीम अली, मोहम्मद इक्बाल, नईम खान, अस्लम खान, वहीद खान, शेख अमीन यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच त्यांना सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.