Uncategorizedस्थानिक बातम्या

1 Breaking The Rain; काळजाला भिडणारी दुर्घटना!

केंद्रीय मंत्री खा. प्रतापराव जाधव यांची नुकसानग्रस्त भागात पाहणी!

Breaking The Rain : केंद्रीयमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी नागरी सत्काराचा कार्यक्रम बाजुला ठेवून चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांची केली पाहणी….

The RainBreaking The Rain खासदार प्रतापराव जाधव यांनी दिला मृतक सईच्या कुटुंबाला मदतीचा आधार! 

बुलडाणा  : दिल्लीत केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव हे प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आले. दरम्यान त्यांनी सत्कार समारंभ टाळत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. लगेच त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त नागरिकांना मदत देण्यासंदर्भात निर्देशित केले.

The Rain12 जूनच्या सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.  वादळी पावसामुळे काही गावातील नागरिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर  दिल्लीहून प्रथमच केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले. सदरील नुकसानीची  बाब माहिती होताच त्यांनी नागरी सत्कार बाजूला ठेवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. खासदार प्रतापराव जाधव यांनी पाहणी करत अनेक शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत व्यथा जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असतानाच मृतक सई च्या घरी सांत्वनपर भेट देत  तिच्या परिवाराला आधार म्हणून तातडीने शासनातर्फे 4 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेशही दिला.  Breaking The Rain

चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे 12 जुनच्या सायंकाळी वादळाने थैमान घातले होते. जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे अनेक परिसरातील  नागरिकांच्या घरावरची टिनपत्रेही उडून गेली. तसेच शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

The Rainवादळी वारा पाऊस सुरु असतांना  यामध्येच सई साखरे नावाची सहा महिन्यांची चिमुकली छताला बांधालेल्या झोक्यासह उडून गेली होती.  त्या दुर्घटनेत त्या कोवळ्या जीवाचा जागीच मृत्यू होण्याची काळजाला भिडणारी घटना घडली. दरम्यान 15 जुनला केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून आधी देऊळगाव घुबे गाठले आणि वादळाने नुकसान झालेल्या ग्रामस्थांना धीर दिला. मृतक सई साखरेच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. साखरे परिवाराला धीरदेत तातडीने 4 लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेश दिला. यावेळी देऊळगाव घुबे गावात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. Breaking The Rain

नारायण करवंडे यांच्याही घरी भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील शेतकरी रामेश्वर पडघान आणि त्यांचा मुलगा वैभव यांचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. या कुटुंबीयांच्या घरी केंद्रीय मंत्र्यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. केंद्र आणि राज्य सरकार आपल्यासोबत आहे . नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळेल असा शब्द यावेळी केंद्रीयमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दिला. साबेतच अधिकाऱ्यांनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशित केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button