स्थानिक बातम्या

1 Breaking Tribal Day, जागतिक आदिवासी दिन साजरा

आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे : ना.प्रतापराव जाधव

Tribal Day : आदिवासी समाजाने आपल्या रूढी,परंपरा व धार्मिक भावना जपताना श्रद्धेचा आदर करावा. मात्र अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बळी पडू नये. :- दशरथ मडावी, राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा मुंडा क्रांति दल.

Tribal Day आदिवासी समाज बांधवांनी मला भरभरून मतदान रुपी प्रेम दिले..

आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे : ना.प्रतापराव जाधव

किशोर मापारी, लोणार न्यूज, एडिटर (www.lonarnews.com)

Tribal Dayजागतिक आदिवासी दिनानिमित्त मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी लोणार तालुक्यातील रायगाव, टिटवी, नांद्रा, गोत्रा, दाभा, पहूर या गावामधून मोठया संख्येने मोटार सायकल रॅली काढली. या रॅली चा समारोप लोणार पंचायत समिती कार्यालयाच्या  प्रांगणात झाला. लोणार पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सभागृहातील कार्यक्रमाचे उद्घाटक क्रांती बिरसा दल चे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य व आयुष्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना भगवानराव कोकाटे म्हणाले की, 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन आपण साजरा करतो. परंतु नागपंचमी असल्याने हा कार्यक्रम 10 तारखेला घेतला आहे. या ठिकाणी आज 3 वर्षापूर्वी आपण रॅलीला सुरवात केली होती. त्याचे आता भव्य रॅली मध्ये रूपांतर झाले आहे. आमच्या समाजाच्या असलेल्या समस्या खासदार साहेब आपण सोडवता. खासदार साहेब आम्हाला एक सांस्कृतिक भवन द्यावे व गरीब आदिवासी बांधवांना घरकुल मिळून द्यावे, अशी मागणी ही कोकाटे यांनी यावेळी बोलताना केली. (Tribal Day)

शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी बोलतांना म्हणाले की, भगवानराव कोकाटे यांच्या नेतृत्वात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जात आहे. क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांचे भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी खूप मोठे योगदान आहे. समाजातून खूप मोठे समाज बांधव शिक्षण घेऊन खूप मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत. आदिवासी बांधवांच्या प्रेमामुळे जागतिक आदिवासी दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे दिल्लीवरून आले व कार्यक्रमला उपस्थित झाले.

तसेच माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष मापारी म्हणाले की, भगवानराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या भव्यदिव्य रॅलीचे आयोजन केल्या गेले. भगवानराव कोकाटे यांनी जेव्हड्या समस्या मांडल्या त्या पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे प्रयत्न करतील. आता पर्यंत समाज बांधवांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे. (Tribal Day)

Tribal Dayबिरसा क्रांती दल चे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी आदिवासी दिन 9 ऑगस्ट ला  का  साजरा  केला जातो, या बदल सविस्तर माहिती उपस्थितीतांना दिली. आदिवासी समाज असल्याने त्यांना आता सोबत घेऊन समाजकार्य करण्याची गरज आहे. तसेच आपल्या कुटुंबातील युवा पिढींना शिक्षणाचे कास धरण्याची आज काळाची गरज निर्माण झाली आहे. आदिवासी समाज हा एक क्रांतिकारी समाज असल्याने त्यांनी भारताच्या इतिहासामध्ये क्रांती घडवली आहे.

आदिवासी समाजातील व्यक्तींनी आपल्या रूढी, परंपरा व धार्मिक भावना जपताना श्रद्धेचा आदर करावा. परंतु बुवाबाजी,भूत, पिशाच्च, जादू, करणी अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बळी पडू नये. वैज्ञानिक दृष्टी बाळगून शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा, आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन स्वत:च्या कुटुंबासह संपूर्ण गावाचे आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा मुंडा क्रांति दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले. (Tribal Day)

आदिवासींच्या विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला च्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. यात प्रामुख्याने शेती उत्पादन, महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी लघु उद्योग, बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम व सुविधा यासह अनेक योजनांचा समावेश आहे. आदिवासी समाजाला अंधश्रद्धेपासून परावृत्त करून आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी आदिवासी योजनेतून आरोग्य विभागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. आदिवासी बांधवांनी अफवावर विश्वास न ठेवता किंवा इतरांच्या भूलथापांना बळी न पडता शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन विकासात सहभागी होण्याचे आवाहन दशरथ मडावी यांनी केले.

Tribal Dayपावसाळा सुरू झाल्याने साथीने आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत:च्या घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, साबणाने किंवा राखेने हात पाय धुवून घरात जाणे, स्वयंपाकाचे व पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवणे, शिळे व उघडे अन्न खाऊ नये, पाणी गाळून व उकळून प्यावे, कचऱ्याचे व शेणाचे ढिग गावाबाहेर तयार करावे, उघड्यावर शौचास न जाणे आदी गोष्टी कटाक्षाणे पाळल्यास आजाराचा शिरकाव होणार नाही व तापाची लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार व औषधोपचार घेतल्यास साथीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मडावी यांनी सांगितले. (Tribal Day)

आरोग्य व आयुष्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना म्हणाले की, समाज बांधवांनी मागील 40 वर्षापासून मला मतदान रुपी भरभरून प्रेम दिलं आहे. जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा आदिवासी गावात जातांना रस्ते नव्हते, सुविधा नव्हत्या. हळूहळू नंतर गावांचा विकास केला व सुविधा पोहचविल्या. भगवानराव कोकाटे हे नेहमी आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते गावाचा विकास करून घेण्यासाठी धडपड करतात. समाजाचा विकास करायचा असेल तर शैक्षणिक जागृती आणा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. (Tribal Day)

मी देशात फिरतो, देशाच्या बाहेर फिरतो आणि मतदारसंघात सुद्धा फिरतो व बघतो आदिवासी हा समाज विखुरलेला आहे. दिवसभर शेती करणे, शेत मजुरी करून ते जीवन जगत असतात. समाज बांधवांना नेहमी एकत्र करून समाजाला जागृत करण्याचे काम दशरथ मडावी व भगवानराव कोकाटे हे नेहमी करीत असतात. शासनाच्या अनेक योजना समाज बांधवांच्या साठी आहेत. त्यांचा फायदा समाज बांधवांनी घ्यावा. काही अडचण आल्यास आम्हाला हक्काने सांगा. आपल्या मतदान रुपी आर्शिवादामुळे मी आज खासदार झालो, केंद्रीय मंत्री झालो. समाजाच्या सर्व लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावे. काही सोशल मिडीयाच्या  माध्यमातून ज्या बातम्या येतात, त्यांच्या आहारी न जाता जे आपल्या अडी अडचणी दूर करू शकतो, त्याच्या मागे उभे  रहा व आपल्या समस्या सोडऊन घ्या. एक संघ व्हा. (Tribal Day)

Tribal Dayजागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा हेतू समाजाने एकत्र यावे. समाजाच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील यावर भर द्या. फक्त मोटरसायकल रॅली काढून थांबू नका. एकत्र या एकसंघ व्हा व समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करा. जवळपास आपल्या समाज बांधवांच्या बऱ्याच मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत. एखादे चांगले ठिकाण शोधून ठरावं. मी एक मोठ सांस्कृतिक भवन उपलब्ध करून देईल असे कार्यक्रमाच्या वेळी बोलतांना आरोग्य व आयुष्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले. (Tribal Day)

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना तालुका प्रमुख भगवान पाटील सुलताने, कृषिउत्पन बाजार समिती माजी सभापती संतोष मापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शिवपाटील तेजनकर, युवा सेना तालुका प्रमुख गजानन मापारी, प्रदेश संघटक विष्णू कोवे, प्रदेश संघटक विनोद काळे, प्रदेश संघटक देवराव वराटे, विशाल रामटेके, आशिष खोब्रागडे, पत्रकार डॉ. अनिल मापारी, आबेद खान पठाण, गुलाबराव सरदार, माजी शहर प्रमुख सुधाकर मापारी, अशोक वारे, सुबोध संचेती, डॉ. काशिनाथ घुगे हे होते. (Tribal Day)

या वेळी आदिवासी क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव कोकाटे, पंढरी कोकाटे, गजानन डाखोरे,  काशिनाथ लेकुरवाळे,  शांताराम जटाळे, राजू चव्हाण, भीमराव धोत्रे, विजय माघाडे, निवृत्ती धोत्रे, एकनाथ घाटे, परशराम कोकाटे, प्रकाश राऊत, तुकाराम तनपुरे, दता घाटे, उद्धव पारधे, पवन कोकाटे, सतिष कोकाटे, नामदेव ठोंबरे, मुरली कुटे, संतोष राऊत यांच्यासह  शकडो आदिवासी  समाज बांधव उपस्थित होते. दत्ता धंदारे, आकाश गायकवाड़, संतोष डवरे, अंकुश ढाकने, गजानन डाखोरे, केशव फुफाटे, परशराम रिठाड़, पीरजी तनपुरे, दत्ता माघाड़े,  केशव पारधी इत्यादीनी अथक परिश्रम घेतले. (Tribal Day)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button