राष्ट्रीय

1 Breaking UPI; मोबाईल हरवला तर? हे नक्की वाचा

खाते ब्लॉक करण्याची प्रक्रिया माहिती करून घ्या !

Breaking UPI : फोन हरवला तर लगेच फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) खातं ब्लॉक कसे करायला पाहिजे याविषयी आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती घेऊया.

Breaking UPI1 Breaking UPI; मोबाईल हरवला तर काय कराल?

डिजीटल दुनियेत जवळपास प्रत्येकजण रोख रक्कम जवळ न बाळगता ऑनलाईन पेमेंट्स चा पर्याय वापरत आहेत. UPI द्वारे छोटीमोठी बिलेही भरली जात आहेत. त्यासाठी गुगल पे (Google Pay) अथवा फोन पे (PhonePe )  यासारख्या लोकप्रिय ॲप्सचा वापर केला जातो. हि ॲप्स जवळपास प्रत्येकजण वापरत आहेत. पण जर मोबाईल हरवला तर फोन पे (PhonePe)  आणि गुगल पे (Google Pay)  ची खाती कशी बंद करायला पाहिजेत. आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. फोन पे  (PhonePe) आणि गुगल पे (Google Pay) खाते ब्लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात. Breaking UPI

तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केल्यानंतर ऑनलाइन पेमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोख रकमेऐवजी अवघ्या 5 रुपयांसाठीही कधीकधी ऑनलाइन पेमेंट केले जातं. ऑनलाइन पेमेंटसाठी म्हणजेच UPI पेमेंटसाठी, अॅप्सचा वापर केला जातो. फोन पे (PhonePe)  आणि गुगल पे (Google Pay)  यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा अनेकांकडून पसंती दिली जाते. पण मोबाईल फोन हरवला तर आर्थिक नुकसान होऊ शकते. गूगल पे(Google Pay) आणि फोने पे (Phone Pay) हे ॲप्स वापरत असाल आणि स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला तर सर्वप्रथम हे ॲप्स ब्लॉक करा. पण हे अॅप्स कसे ब्लॉक करायचे, याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती घेऊयात. Breaking UPI

Breaking UPIPhonePe खातं कसं ब्लॉक कराल?  

How To Block PhonePe Account

स्टेप 1 : फोन पे खातं ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा लागेल.

स्टेप 2 : कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला खातं ब्लॉक करण्याबाबात सांगावं लागेल. खात्याबाबत सर्व डिटेल्स माहिती द्यावी लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचं खातं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येईल.

कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला खालीलप्रमाणे माहिती द्यावी लागू शकते.

कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला नोंदणीकृत (रजिस्टर्ड मोबाइल) मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्याशिवाय ईमेल आयडी, अखेरची पेमेंट डिटेल्स, बँक खात्यासंदर्भात माहिती, आधार कार्ड अथवा पॅन कार्डची माहिती, अल्टरनेटिव्ह मोबाईल क्रमांक सांगावा लागू शकतो.

Breaking UPIगूगल पे  खातं कसं ब्लॉक कराल?

How To Block Google Pay Account

स्टेप 1: गुगल पे ( Google Pay) खातं ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी हेल्पलाइन नंबर वर कॉल करावा लागेल.

स्टेप 2: त्यानंतर कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला गूगल पे खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल, अन् खातं ब्लॉक करण्याची विनंती करावी लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचं खातं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येईल.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button