1 Breaking : Vidarbha Academy : दशकपूर्ती सोहळा
विदर्भ अकॅडमी संचालक व पालकांनी मुलांना व मुलींना भरभरून दिली बक्षिसे
Vidarbha Academy : विदर्भ सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी लोणार या अकॅडमी ला बुधवारी 18 डिसेंबर 2024 ला दहा वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने विदर्भ अकॅडमी कडून दशक पूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला.
Vidarbha Academy : विदर्भ अकॅडमी चा दशकपूर्ती सोहळा उत्साहात साजरा
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
लोणार :- संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असणारी विदर्भ सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी लोणार या अकॅडमी ला बुधवारी 18 डिसेंबर 2024 ला दहा वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने विदर्भ अकॅडमी कडून दशक पूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने विदर्भ अकॅडमीच्या जवळपास 200 विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Vidarbha Academy)
विदर्भ अकॅडमी कडून दशक पूर्ती सोहळा आयोजित या कार्यक्रमात विदर्भ अकॅडमीच्या सर्व मुला मुलींनी सहभाग घेतला होता. मुलांच्या लग्नावरील नाटकाने व अकबर बेनीवाले या मुलाच्या हम काले है तो क्या हुआ दिलवाले है गाण्याने कार्यक्रम गाजवला. सध्याच्या काळात आई- वडिलांचा मुलांवर अतिशय जास्त विश्वास, मुला मुलींच्या आयुष्यात अँन्डरॉईड मोबाईल मुळे होणारे नुकसान व मुला मुलींनी घेतलेला त्याचा गैरफायदा याच्यावर केलेलं 13 मुलींच्या नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी विदर्भ अकॅडमी संचालक शेख सर व सर्व पालकांनी मुलांना व मुलींना भरभरून बक्षिसे दिलीत. यानंतर करिअर मार्गदर्शन सुरू झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना विदर्भ अकॅडमी संचालक शेख सर यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम उमाळकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की लक्ष्मी व सरस्वती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत. सरस्वती जाताना महत्त्वाची व लक्ष्मी येतानी महत्वाची कशी असते हे त्यांनी पटवून दिले. (Vidarbha Academy)
लोणार पोलिस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांनी मुलांना व मुलींना सांगितले की आई-वडिलांनी कष्ट करून तुम्हाला लावलेला पैसा व त्यांनी तुम्हाला दिलेली एक संधी याचं सोनं कसं करावं यावर मार्गदर्शन केले. तसेच लोणार तहसिल कार्यालयाचे तहसिलदार भूषण पाटील यांनी मी कसा घडलो या गोष्टीवर भर देऊन अत्यंत मुलाचे मार्गदर्शन दशकपूर्ती सोहळा कार्यक्रमादरम्यान मुलांना केले. यावेळी उपस्थित मान्यवर बुलढाना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांनी नेहमीप्रमाणे कोणत्याही राजकारण्यांचा आदर न घेता मुला मुलींनी शासकीय अधिकाऱ्यांचा आदर आपल्या डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा असे सांगितले. यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थी यांनी टाळ्या वाजवून त्यांना साद दिली.
शेवटी भव्य असा केक कापून सर्वांनी दशकपूर्ती सोहळा आनंदात साजरा केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.बळीराम मापारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाम उमाळकर व प्रकाशराव मापारी (सचिव, श्री शिवाजी शिक्षण संस्था लोणार), प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणेदार निमिश मेहत्रे, तहसीलदार भूषण पाटील, तर करीमा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हाजी मसुद, बनमेरु सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.संतोष बनमेरू, समाजसेवक हाजी माहेमूद, डॉ. झाकीर हुसेन कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक फिरोज, माजी नगरसेवक हाजी गफ्फार, नगरसेवक आबेद खान, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अकील खान, डॉ.प्रताप शेजोळ, सत्यजित अर्बनचे मॅनेजर देशपांडे, इमरान खान मित्रमंडळाचे अध्यक्ष इमरान खान, अन्नू सर यांच्यासह शेकडो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला.
यावेळी आभार प्रदर्शन हाजी रिजवान जड्डा (अध्यक्ष, जमीयत उलमा ए हिंद, लोणार.) यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारिक शेख यांनी आपल्या सुंदर अशा शैलीत केले. (Vidarbha Academy)