राजकीय

1 Breaking What is in the Budget of Maharashtra

महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय !

What is in the Budget of Maharashtra : उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) मांडला आहे. थोडक्यात माहिती घेऊ.

महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय !

आगामी लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवत उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) मांडताना अनेक जुन्या घोषणांसह काही नवीन घोषणादेखील केल्या. विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये, दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा, देवनार; मुंबई येथे लेदर पार्कची उभारणी, मातंग समाजासाठी ‘आर्टी’ ही संशोधन व प्रशिक्षण संस्था, दिव्यांगांसाठी 34,400  घरे आदी घोषणांची पेरणीही त्यांनी केली. (The Budget of Maharashtra)

येत्या चार महिन्यांसाठी मांडलेल्या अर्थसंकल्पात लहान समाजघटकांना सुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण जुन्या घोषणांना नव्याने फोडणी दिल्याचेही दिसते. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांचा उल्लेख नव्याने केलेला दिसतो. विधानपरिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला.

‘बार्टी’ च्या धर्तीवर मातंग समाजासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी,ही समाजाची मागणी पूर्ण झाली. मुस्लिमांच्या मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी योजनेचे अनुदान दोन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये करण्यात आले.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सात हजार किलोमीटर चे  रस्ते, मागेल त्याला सौर पंप, स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात वाढ,  मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प, विमानतळांचा विकास याआधीच्या घोषणाही नव्याने केल्या.  (The Budget of Maharashtra)

अयोध्या, श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार !

अयोध्या आणि श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येतील.

या भवनांच्या उभारणीसाठी 77  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

घोषणांची पुन्हा घोषणा !

‘लेक लाडकी’ योजनेसह अशा अनेक योजनांचा उल्लेख अजित पवार यांच्या भाषणात होता.  ज्यांची घोषणा आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.  (The Budget of Maharashtra)

‘बार्टी’ च्या धर्तीवर ‘आर्टी’ ची स्थापना !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) धर्तीवर मातंग समाजासाठी ‘अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) स्थापन करण्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. याशिवाय मागास घटकांसाठी राज्य सरकारकडून यापूर्वी करण्यात आलेल्या घोषणाचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभागासाठी 18  हजार 816 कोटींची तरतूद आहे.

शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठा धनलाभ !

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असून राज्यातील शेतकऱ्यांना एकाच वेळी सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली असून शेतकरी बंधूंच्या खात्यात  केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून 6 हजार रुपये एकाच वेळी जमा होणार आहेत. (The Budget of Maharashtra)

यामध्ये केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता  28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे.

केंद्र व राज्य सरकारचा हप्ता एकाच वेळी !

Budgetयाबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024  म्हणजे बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले असून या अंतर्गत दोन हजार रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून चार हजार रुपयाचा लाभ राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना याबाबत दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

(The Budget of Maharashtra)

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे बुधवारी सायंकाळी महिला बचत गटाचा मेळावा आणि विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाला. या वेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. या मेळाव्यात लाखावर महिला उपस्थित होत्या. व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. (The Budget of Maharashtra)

पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील 87.96 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा…..

केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी एकूण 1943.46  कोटीचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अदययावत केलेल्या, बँक खाते आधार संलग्न केलेल्या व ई केवायसी पूर्ण केलेल्या 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे ही रक्कम जमा होणार आहे.

जर राज्याचा विचार केला तर कृषी विभागाच्या माध्यमातून गाव पातळीवर विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती व त्या माध्यमातून राज्यातील 18 लाख लाभार्थ्यांची पी एम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे.

(The Budget of Maharashtra)

दूध अनुदान योजनेला मिळाली मुदतवाढ !

Budgetराज्यात शेती सोबतच दुधाचा धंदा देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. अलीकडे मात्र शेतीशी निगडित असलेला दुधाचा धंदा संकटात आला आहे. पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती, इंधनाचे वाढलेले दर, वाढती मजुरी आणि दुधाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे दुधाचा धंदा परवडत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गायीच्या दुधाला अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार 11 जानेवारी 2024  ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दूध विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर दूध अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे शिंदे सरकारने जाहीर केले असल्याने याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे. अशातच शिंदे सरकारने या योजने संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. (The Budget of Maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार दूध अनुदान योजनेला मुदत वाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी दहा मार्च 2024 पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. अर्थातच 11 फेब्रुवारी 2024  ते 10 मार्च 2024  या कालावधीत गायीच्या दुधास अनुदान देण्याचा निर्णय वर्तमान सरकारने घेतलेला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री तथा पशुपालन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथे आयोजित एका कार्यक्रमात या योजनेला मुदतवाढ दिली जाईल अशी घोषणा केली होती.

यानुसार आता सरकारने हा निर्णय घेतला असून दहा मार्चपर्यंत दूध विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आता पाच रुपये प्रति लिटर एवढे अनुदान मिळणार आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय देखील सरकारने निर्गमित केला असून या निर्णयामुळे निश्चितच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  (The Budget of Maharashtra)

राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे. https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:1ebad90b-5662-4c8e-b314-a3243f942b9d  या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पाहता येणार आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची रक्कम दीड लाखावरून पाच लाख !

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व कुटुंबांना मिळणार असून त्यासाठी वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब Budgetदीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

या माध्यमातून सरकारने राज्यातील नागरिकांना विमा संरक्षणाचे कवच दिले आहे. मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकर्‍यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत 8 लाख 50 हजार नवे सौर कृषिपंप बसवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टी म्हणजेच अण्णा भाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  (The Budget of Maharashtra)

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य आता 1 हजार रुपयावरून दीड हजार केले. ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलडाणा, पालघर, नाशिक, ठाण्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली. (The Budget of Maharashtra)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button