Windows : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील लोकांनीही गोपनीयता आणि सुरक्षेच्या चिंता व्यक्त केल्या जात आहेत. त्यावर काही उपाय आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.
कॉम्पुटर ठेवतोय प्रत्येक हालचालींवर नजर !
Windows बद्दलचं धक्कादायक संशोधन आलयं समोर…..
आपण आपल्या संगणकावर काय करतोय, हे फक्त आपल्यालाच माहिती आहे असं वाटतं? तर असा विचार करणं आता थांबवा. कारण मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एक गडबड किंवा अस एक फिचर आहे कि ते आपल्या सर्व हालचालींचा रेकॉर्ड ठेवत आहे. हे वाचून थोडा धक्का बसेल पण हे खरं आहे. ‘Activity Tracking’ नावाचा हा फीचर आता बंद झालेल्या ‘विंडोज टाइमलाईन’ या फंक्शनसाठी वापरला जायचा. पण ही सुविधा बंद झाली तरी हा फीचर अजूनही चालू आहे आणि आपण संगणकावर काय करतोय याचा मागोवा घेत आहे. तसेच त्याचा रेकॉर्ड स्टोअर करून ठेवला जात आहे.
काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या येणाऱ्या ‘Recall’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित फीचरवरून खळबळ उडाली होती. कारण हे फीचर आपण आपल्या संगणकावर जे काही करतो त्या सर्व गोष्टींचा शोध घेऊ शकते. यामुळे लोकांनी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील लोकांनीही गोपनीयता आणि सुरक्षेच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. अजून काही केल्याशिवाय कंपनी तुमची सर्व माहिती आधीच गोळा करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ‘Activity Tracking’ फीचर अजूनही सुरू आहे.
Windows Activity Tracking बंद कसे करायचे?
संगणक वापर कर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सहजपणे हे फीचर बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये प्रायव्हसी निवडावी आणि नंतर ‘Activity History’ बंद करावी लागेल. इतकं केल्याने संगणकावरची मागील सर्व माहिती डिलीट होईल आणि पुढेही विंडोज हालचाली रेकॉर्ड करणार नाही. हे करून गोपनीयतेचे रक्षण करू शकता. ‘Activity History’ सेटिंग्जमध्ये बंद केल्यावर काहींच्या मते कोणतीही चिंता न करता संगणकावर काम करू शकतो. गोपनीयता आणि सुरक्षेतेच्या दृष्टीने संगणक क्षेत्रातील तज्ञांकडून माहिती घेऊन किंवा त्यांच्या मार्गदर्शनात संगणक वापरणे कधीही चांगलेच राहील. या लेखातून आपण छोटासा जनजागृती पर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.