1 Excellent Result ज्ञानदीप माध्यमिक आश्रमशाळा
संस्था अध्यक्ष ॲड. साहेबराव सरदार यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
Excellent Result : दहावीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच यश मिळाले, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
Excellent Result ज्ञानदीप माध्यमिक आश्रमशाळा तांबोळा शाळेची निकालाची उत्कृष्ट परंपरा !
त्यापैकी प्राविण्य श्रेणीमध्ये 17 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 21 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 05 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यावर्षी शाळेचा एकूण निकालाची टक्केवारी 97.72% अशी उल्लेखनीय आहे.
कुमारी पूजा दीपक खिरे हिला 500 पैकी 435 गुण मिळाले असून 87% गुण मिळवून ती शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांकावर कुमारी पुष्पा जनार्दन राठोड हिने 500 पैकी 429 गुण 85.80% मिळवून आपले स्थान मिळविले आहे तर तृतीय क्रमांकावर कुमार ऋतिक संजय राठोड 500 पैकी 427 व कुमार जितेश भारत राठोड हा विद्यार्थी 500 पैकी 427 गुण मिळवून 85.40% आपले यश संपादन केले आहे.