महाराष्ट्र

1 Important Festival: शस्त्र आणि शास्त्र पूजा

चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा

1 Important Festival : हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. या सणाला हिंदू संस्कृतीत प्रचंड महत्वाचे स्थान आहे. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो.

1 Important Festival : दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. त्यानंतर चा आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. दहावा दिवस म्हणजे दसरा होय. ह्या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. याच दिवशी महिषासुराचा वध करण्यात आला होता. पौराणिक कथेमध्ये लवणासुराचा वध येथे केल्याचा उल्लेख असल्याने लोणार असे नाव असून दसरा सणाला जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवराला धार्मिक महत्व लाभलेले आहे. (1 Important Festival)

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. ह्या दिवशी सरस्वती व शस्त्र पूजन केले जाते. साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा होय. फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासाठी खूप विद्यार्थी येत. या ऋषी कडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुजीना  विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. त्यावर गुरुजींनी 14 विद्याबाद्द्ल 14  कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या. कौत्स हे ऐकून गांगरून गेला. त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे राघुराजाचा खजिना संपला होता.

राजाने इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले. पंरतु रघुराजाचा पराक्रम माहित असल्याने इंद्राने सोन्याची नाणी राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला . गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु नकार आल्याने आपट्याच्या वृक्षाखाली सुवर्णमुद्रा ठेवून त्या लोकांना नेण्यास सांगतले. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली आणि पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. त्यादिवसापासून सोन्याची म्हणजे आपट्याची पाने लुटण्याची वा देण्याची प्रथा सुरु झाली अशी आख्यायिका आहे. यामुळे लोणार तालुक्यात दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना भेटून आपट्याची म्हणजे सोन्याची पाने भेट म्हणून दिली जातात. तसेच संध्याकाळी सीमोल्लंघन केल्या जाते. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरामध्ये असणाऱ्या कमळजा माता देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. (1 Important Festival)

हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. या सणाला हिंदू संस्कृतीत प्रचंड महत्वाचे स्थान आहे. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. यंदा दसरा हा सण 12 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. पौराणिक कथांनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला तर दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी आपल्यातील वाईट सवयी, गुण मागे टाकून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा अशी शिकवण हा सण देत असतो.

चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात? याबाबत जाणून घेऊया… (1 Important Festival)

विजयादशमी आणि दसरा

1 Important Festivalदसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात. (1 Important Festival)

आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व

1 Important Festivalआपट्याला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. (1 Important Festival)

यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा, असे सांगितले जाते. (1 Important Festival)

आपट्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।

याचा अर्थ असा की, हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. यानंतर आपट्याची पाने सर्व नातलग आणि मित्रमैत्रीणींमध्ये वाटतात. (1 Important Festival)

नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसरा सण साजरा करतो. दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून असुरांवर विजय मिळवला. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. कधी आहे दसरा? विजयादशमीचा मुहूर्त, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया…

नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसरा सण साजरा करतो. दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून असुरांवर विजय मिळवला. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. नवरात्राची सांगताही याच तिथीला दुर्गा विसर्जनाने केली जाते. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, अशीही आख्यायिका आढळून येते. आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. (1 Important Festival)

दसरा, विजयादशमीचे महत्त्व

1 Important Festivalविद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीचे पूजन करावयाचे. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे पूजन करायचे, अशी प्रथा प्रचलित आहे. प्रारंभी हा एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई. त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे. (1 Important Festival)

शमीची पूजा करण्याचे कारण

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले, अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. (1 Important Festival)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button