1 Important Festival: श्रावणातील नागपंचमी उत्सव
वेदकाळापासून चालत आलेला हा सण…..
Important Festival : श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
Festival नागपंचमी दिनविशेष …..
किशोर मापारी, लोणार न्यूज, एडिटर. (www.lonarnews.com)
नागपंचमी हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. पंचांगानुसार दरवर्षी नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते आणि यंदा ही तिथी 9 ऑगस्ट रोजी आली आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. नागदेवतेला दूध अर्पण करून नागपंचमीची पूजा केली जाईल. नागपंचमी सणाशी संबंधित अनेक मान्यता आहेत आणि यापैकीच एक मान्यता अशी आहे की, या दिवशी तव्यावर कोणतेही अन्नपदार्थ भाजले जात नाहीत अथवा शिजवले जात नाहीत. काय आहे यामागील नेमके कारण? जाणून घेऊया सविस्तर माहिती…Festival
नागपंचमीच्या दिवशी पोळ्या का तयार केल्या जात नाहीत?
नागपंचमीच्या दिवशी लोखंडी वस्तूंचा वापर करणे शुभ मानले जात नाही, त्यामुळे या दिवशी लोखंड वर्ज्य असते. बहुतांश घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो, पण नागपंचमीला तव्यावर पोळी शेकली जात नाही. दुसरे कारण म्हणजे तव्याला नागाच्या फण्याशी जोडले जाते. यामुळे देखील अग्नीवर तवा ठेवला जात नाही. कारण असे केल्यास नागदेवता नाराज होऊ शकते, असे मानले जाते. Festival
राहू दोष निर्माण होऊ शकतात?
पोळ्या न करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे तवा हे राहुचे प्रतीक मानले जाते. नागपंचमीच्या मुहूर्तावर तव्याचा वापर केल्यास कुंडलीमध्ये राहू ग्रहाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असते आणि राहू दोषही निर्माण होऊ शकतात. या कारणांमुळे नागपंचमीच्या दिवशी पोळी तयार करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. नागपंचमीला घरामध्ये पोळ्या तयार केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे
शीतला अष्टमीलाही पोळ्या तयार करत नाही, कारण….
नागपंचमी सणाव्यतिरिक्त शीतला अष्टमीच्या दिवशीही घरामध्ये तव्यावर पोळी अथवा अन्य खाद्यपदार्थ तयार केले जात नाहीत. तसेच या दिवशी शिळे अन्न देखील खाल्ले जात नाही. Festival
या तिथीच्या दिवशी पोळ्या करणे वर्ज्य..
धार्मिक मान्यतांनुसार, मकर संक्रांती, कोजागरी पौर्णिमा आणि दिवाळी सणाच्या दिवशीही पोळ्या तयार करणे वर्ज्य केले जाते. या सणांदरम्यान बहुतांश लोक घरामध्ये पोळ्या तयार करत नाहीत. दरम्यान प्रत्येक व्यक्ती आपापल्या धार्मिक मान्यतांचे अनुकरण आणि पालन करतात.
वेदकाळापासून चालत आलेला हा सण….
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. Festival
स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.
‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो’, हेही उपवास करणयामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे…Festival
नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापेकी एक कथा..सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सन आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात.
नागपंचमीचे महत्व..
नागपंचमीच्या वेळी हिंदू नागांची किंवा त्यांच्या प्रतिमांची पूजा करतात. विवाहित मुली आणि महिला या दिवशी लवकर उठतात. ते आंघोळ करतात, पूजेसाठी तयार होतात आणि नंतर पूजा करण्यासाठी नागाच्या घरी (मुंगीच्या टेकडीवर) जातात. नागपंचमीच्या दिवशी लोक सापांना दूध पाजून त्यांचे प्राण वाचवण्याचे व्रत घेतात आणि त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करतात. Festival
नागपंचमीचा उत्सव..
या दिवशी सापाला दूध, फुले, मिठाई वगैरे अर्पण केले जाते. चांदी, लाकूड किंवा दगडाने बनवलेल्या नागाच्या मूर्तीची पूजा करण्यापूर्वी त्यांना पाण्याने धुवून नंतर दुधाने धुतले जाते. लोक दिवसभर उपवास करतात. या दिवशी जमीन खोदणे हे पाप आहे कारण यामुळे सापांचा मृत्यू होऊ शकतो. जमिनीवर सापांची रांगोळी काढली जाते आणि चांदीच्या भांड्यात त्यांना फुले दिली जातात.
नोट : सदरील मजकूर सोशल मिडिया तसेच जनमाणसात होत असलेल्या चर्चेतून एकत्रीत/प्राप्त केलेला असून सदरील मजकूर कोणताही धार्मिक प्रचार/प्रसार करणेसाठी नसून प्रकाशक/एडिटर सदरील मजकुराशी सहमत असतीलच असे नाही.