1 Important Paryushan festival- जन्मोत्सव साजरा
पर्युषण महापर्वानिर्मित निघाली लोणार शहरात शोभायात्रा
Important Paryushan festival : 4 सप्टेंबर बुधवारला कल्पसूत्र वाचन दरम्यान भगवान महावीरांचा जन्मोत्सव येत असल्याकारणास्तव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
Important Paryushan festival : पर्युषण महापर्वानिर्मित निघाली लोणार शहरात शोभायात्रा
पर्युषण महापर्वामध्ये महावीर जन्मकल्याणक वाचनाला महत्त्व असते.
लोणार : शहरात चातुर्मासार्थ आलेल्या प.पु. साध्वी श्री प्रियस्मिता श्रीजी, प.पु. साध्वी श्री डॉ. प्रियलता श्रीजी, प.पु. साध्वीश्री प्रियदर्शना श्रीजी म. सा. तथा प.पु. साध्वी श्री अमितसुधाश्रीजी म.सा. यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
जैन धर्मीयांच्या पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीरांच्या जन्मकल्याणकाचे वाचन करण्यात येते. भगवंतांनी एकूण 27 वेळा मानवजन्म धारण केले. त्यापैकी, एक जन्म हा पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी येतो. त्यामुळे, पाचव्या दिवशी त्यांचा जन्मकल्याणक साजरा करण्यात येतो. यानिमित जैन साध्वीजींच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
4 सप्टेंबर 2024 बुधवारी भगवंतांच्या जन्माप्रीत्यर्थ प्रातिनिधिक स्वरूपात छोटा सजवलेला पाळणा तयार करून, त्यात भगवान स्वरूपात श्रीफळ ठेवण्यात आले. जैन समाजाचे 31 ऑगस्ट पासून आठ दिवसीय पर्युषण पर्व सुरू आहे. या आठ दिवसात जैन समाजाचे लहानात लहान आणि मोठ्यात मोठा व्यक्ती सुद्धा तन मन धनाने सहभागी होतो. सकाळी सहा वाजेपासून धार्मिक कार्य सुरू होतात. तर 9 वाजता प्रवचन दुपारी पूजा, कल्पसूत्र वाचन तथा लहान मुलांना धार्मिक कार्यक्रम, संध्याकाळी 7 वाजता प्रतिक्रमण तसेच ‘भक्ती संध्या अशा प्रकारे संपूर्ण आठ दिवसाची दिनचर्या असते. या पर्वानिमित्त 4 सप्टेबर रोजी शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. जैन समाजात तपस्या करण्याला खूप महत्त्व आहे. (Important Paryushan festival)
सध्या महापर्व सुरू असल्यामुळे तपस्या करणे सुरू आहे. 4 सप्टेंबर बुधवारला कल्पसूत्र वाचन दरम्यान भगवान महावीरांचा जन्मोत्सव येत असल्याकारणास्तव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी 1 वाजता जैन मंदिरापासून रथात भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवून शोभा यात्रा काढण्यात आली. ही शोभा यात्रा प्रताप चौक, सराफा लाईन मार्गे आनंद मंगल भवन येथे शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. ‘भगवान महावीरांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
दरम्यान रथाला ओढण्याचे काम जेष्ठानी, मुलांनी व महिलांनी केले. या आठ दिवसात जैन बांधव रात्री ‘भोजन त्याग, लिलोत्री त्याग तसेच जास्तीत जास्त धार्मिक कार्यात आपला वेळ घालवतात. पर्युषण पर्वाचे महत्त्व म्हणजे मागील वर्षभरात केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केल्या गेलेल्या चुकांची माफी मागणे व माफ करणे हाच खरा उपदेश आहे. (Important Paryushan festival)
जैन समाजाचे 31 ऑगस्ट पासून आठ दिवसीय पर्युषण पर्व सुरू आहे. या आठ दिवसात जैन समाजाचे लहानात लहान आणि मोठ्यात मोठा व्यक्ती सुद्धा तन मन धनाने सहभागी होतो. सकाळी सहा वाजेपासून धार्मिक कार्य सुरू होतात. तर 9 वाजता प्रवचन दुपारी पूजा, कल्पसूत्र वाचन तथा लहान मुलांना धार्मिक कार्यक्रम, संध्याकाळी 7 वाजता प्रतिक्रमण तसेच ‘भक्ती संध्या अशा प्रकारे संपूर्ण आठ दिवसाची दिनचर्या असते.