1 Important : Raising Day : पोलिस वर्धापन दिन
पोलिस स्टेशनचे दैनंदिन कामकाजाबाबत पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी दिली माहिती
Raising Day : ६ जानेवारी २०२४ वार सोमवार रोजी लोणार शहरातील श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाजाबाबत माहिती पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी दिली.
Raising Day : महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन….
किशोर मापारी, मुख्य संपादक, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
महाराष्ट्र पोलिस दल स्थापनादिनाचे औचित्य साधून लोणार पोलिस स्टेशनच्या वतीने २ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलिस वर्धापन सप्ताहाचे तसेच ‘रेजिंग डे’ चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस वर्धापन सप्ताहाचे उद्घाटन लोणार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस अंमलदार उपस्थित होते. तसेच यावेळी हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन केले. (Raising Day)
६ जानेवारी २०२४ वार सोमवार रोजी लोणार शहरातील श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाजाबाबत माहिती पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी दिली. लोणार पोलिस स्टेशन कार्यालयाच्या मैदानावर पोलिस दलातील विविध शाखा आणि कामकाजाबाबतची माहिती समाजातील विविध घटक, नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर आयोजित कार्यक्रमात पोलिस दलातील शस्त्र आणि सामुग्री, सायबर सुरक्षा,
बीडीडीएस पथक, पोलिस दलाची रचना व माहिती, वाहतूक शाखा कामकाज व नियम, आदर्श पोलिस ठाणे प्रतिकृती, अंमली पदार्थविरोधी पथक, अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, अंगुली मुद्रा कक्ष, श्वानपथक, जलद प्रतिसाद पथक, हरविलेल्या व्यक्तींची छायाचित्रे, व अकस्मात मुत्यू झालेल्या व उघड न झालेल्या व्यक्तींचे फोटो अशा विविध विषयावर माहिती देण्यात आली. ही माहिती देण्यासाठी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले.
स्फोटके शोध आणि नाश पथक (बि.डी.डी.एस.) मार्फत सुरक्षा व्यवस्थेची माहिती, मालमत्ता गुन्हे कक्षामार्फत सोनसाखळी, वाहन, घरफोडी चोरी याबाबत घ्यावयाची खबरदारी, आर्थिक गुन्हे कक्ष यामध्ये बँकींग फ्रॉड, जनरल चिटींग फ्रॉड, हाऊजिंग फ्रॉड आणि इतर फ्रॉडबाबत तसेच शस्त्रास्त्राबाबतची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले, गोपनीय विभाग पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल हरिभाऊ ढाकणे, तेजराव भोकरे यांनी दिली. या कार्यक्रमाचे ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिक हे देखील उपस्थित राहुन त्यांनी सदर उपाययोजनांची माहिती समजावून घेतली. यावेळी पोलीस वर्धापनदिन निमित्ताने कायद्याचे व ईतर महत्वाची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले यांनी दिली. (Raising Day)
वाहतुक शाखा या बुथमंध्ये रस्ते अपघात सुरक्षा व नागरिकांच्या इतर जबाबदार्या, अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, ठाणे या बुथमध्ये लहान मुलांची विक्री, तस्करी कशा प्रकारे होते याबाबत, बालकांचे संरक्षण कक्ष (सीपीयू) या कक्षामंध्ये बालविवाह, बालकामगार, भिक्षेकरू तसेच अपहरित मुले-मुली कारवाईबाबत, महिला तक्रार निवारण कक्ष (भरोसा सेल) यामंध्ये महिलावरील कौटुंबिक हिंसाचार तसेच घरगुती कलहातुन निर्माण होणार्या वादामंध्ये मध्यस्थीची भूमिका घेवून समुपदेशन करून समजोता घडवून आणण्याची माहिती, अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत मादक द्रव्ये,
नशा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तसेच जनतेचे नुकसान अश्या विविध विषयांवर माहिती देण्यात आली. तसेच सायबर गुन्हे कक्ष या मध्ये सोशल इंजिनिअरींग फ्रॉड तसेच कॉमन सायबर फ्रॉड यामध्ये नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली. वाहतुक बाबत माहिती पो.कॉ. मनोजकुमार शेजुळ यांनी दिली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक गोपाल राठोड, धनंजय इंगळे उपस्थित होते. (Raising Day)